ग्लोबल

असा ड्रायव्हर कधी पाहिला नसेल! काय टर्न घेतलाय; Video Viral

सकाळ डिजिटल टीम

सुरुवातीला जेव्हा व्हिडिओ पाहतो तेव्हा आपल्याला वाटतं की गाडी अडकून पडलीय. मात्र गाडी अडकलेली नाही तर तो ड्रायव्हर युटर्न घेत आहे.

गाडी चालवणारे अनेकदा स्टंटबाजी करत असतात. यात ते जीवही धोक्यात घालतात. मग ते टु व्हीलर चालवणारे असोत किंवा फोर व्हीलर. आता सोशल मीडियावर एका चारचाकी गाडीचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. सुरुवातीला जेव्हा व्हिडिओ पाहतो तेव्हा आपल्याला वाटतं की गाडी अडकून पडलीय. मात्र गाडी अडकलेली नाही तर तो ड्रायव्हर युटर्न घेत आहे. तेसुद्धा अशा ठिकाणी की जिथं थोडीशी जरी चूक झाली तरी गाडी दरीत कोसळेल. गाडीच्या लांबीपेक्षाही रस्त्याची रुंदी लहान आहे. तरीही चालक गाडी वळवतो.

अनेक सोशल मीडिया युजर्सनी हा व्हिडिओ शेअर केला आहे. मात्र व्हिडिओ नेमका कुठला आहे याबद्दल काही माहिती समोर आलेली नाही. व्हिडिओत दिसतं की, निळ्या रंगाची कार एका रस्त्यावर आडवी आहे. यात रस्त्याच्या एका बाजुला डोंगर तर दुसऱ्या बाजुला दरी आहे.

अगदी काठावर गाडी असूनही तो अशी गाडी वळवण्यात निष्णात असल्यासारखा गाडी सहज काढतो. थोडी मागे घेऊन वळवून पुन्हा पुढे घेत तो गाडी तिरकी करतो. काही इंच गाडी मागे घेत तो वळवतो आणि पुन्हा पुढे घेतो. असं करत करत पूर्ण गाडी वळवून रस्त्याने व्यवस्थित नेतो. आता या व्हायरल व्हिडिओवर ड्रायव्हरचं कौतुक केलं जात आहे. काहींनी हा व्हिडिओ एडिट असू शकतो असंही म्हटलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

जंतर मंतर आंदोलन स्थळांच्या यादीतून वगळलं, दिले ३ पर्याय; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारसीनंतर दिल्ली पोलिसांचा निर्णय

Pune News: चाकणमध्ये हृदयद्रावक घटना! मोबाईलवरून वाद, वडिलांच्या दोन थपडा अन् १७ वर्षीय विद्यार्थ्याचा मृत्यू, सायकलनेच दिला सुगावा..

Rahul Gandhi : ज्ञानेश कुमार यांनी माफीचा साक्षीदार व्हावे! राहुल गांधींचा मोर्चाआधी मोठा इशारा, 'एसआयआर' मधील खरे गुन्हेगार दुसरेच..

IND vs NZ : भारतीय संघाला धक्का, स्टार फलंदाजाने लंगडत मैदान सोडले; न्यूझीलंड दौऱ्यासाठी उद्या होणार होता रवाना, पण...

Ladki Bahin Yojana Payment Update : ...तर खात्यात जमा होणार एकत्र 3000 रुपये? लाडकी बहीण योजनेच्या नव्या अपडेटने वाढवली उत्सुकता, नवरात्रीत लाडक्या बहिणींची प्रतीक्षा संपणार?

SCROLL FOR NEXT