viral video 
ग्लोबल

ज्वालारसाची नदी? हा व्हिडीओ पाहून तुम्हीही व्हाल थक्क

शर्वरी जोशी

भूगर्भामध्ये शीघ्र हालचाली  झाल्या की भूकवचाला खोल आणि विस्तीर्ण भेगा पडतात आणि या भेगांमधून तप्त ज्वालारस बाहेर पडतो. पृथ्वीच्या गर्भात असलेला तप्त शिलारस बाहेर पडला की तो संपूर्ण जमिनीवर पसरतो आणि थंड झाल्यावर तो खडकात रुपांतरीत होतो. हा ज्वालारस नेमका कसा दिसतो हे साऱ्यांनीच पाहिलं असेल. भगव्या, पिवळ्या आणि लालसर रंगाचा असलेला हा शिलारस प्रचंड तप्त असतो. त्यामुळे साधा फोटो किंवा व्हिडीओ जरी पाहिला तरीदेखील पाहताना अंगावर काटा येतो. यामध्येच सध्या सोशल मीडियावर आइसलँडमधील रेकजाविक येथील एका ज्वालामुखीचा व्हिडीओ तुफान व्हायरल झाला आहे.  या व्हिडीओमध्ये फाग्रादाल्सफजाल या ज्वालामुखीचा उद्रेक झाला असून त्यातून तप्त ज्वालारस बाहेर पडताना दिसत आहे. हा व्हिडीओ ड्रोनने शूट करण्यात आला आहे.

तुम्ही कधी ज्वालारसाची नदी पाहिली आहेत का? अर्थात याचं उत्तर नाही असंच असेल. परंतु. Bjorn Steinbekk या युट्यूबरने त्यांच्या कॅमेरात कैद केलेल्या एका व्हिडीओमध्ये चक्क ज्वालारसाची नदी वाहतांना दिसून येत आहे. रेकजाविक येथे  असलेल्या एका ज्वालामुखीचा उद्रेक झाला असून या ज्वालामुखीतून लाव्हारस उसळून वाहतांना दिसत आहे.

दरम्यान, सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत असून ६ हजारांपेक्षा जास्त जणांनी तो शेअर केला आहे. तर त्यावर असंख्य कमेंट्स आणि लाइक्सचा पाऊस पडत आहे.
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

EPFO Wage Limit Hike : कर्मचाऱ्यांसाठी गुड न्यूज! ईपीएफओची वेतन मर्यादा वाढली; ५१ लाखांहून अधिक जणांना फायदा

Satara Crime : साताऱ्यात दोन गटात हाणामारी, तणावाचे वातावरण; शेवटी २ मंडळांचे केले गणेश विसर्जन, १४ जणांवर गुन्हा दाखल

Team India Update: वरुण चक्रवर्तीच्या जागी आशियाई स्पर्धेसाठी DC चा ऑल राऊंडर; IND vs WI मालिकेत हार्दिक पांड्याचे खेळणे अवघड

मुंबई-नाशिक हायवेवर अपघात, एकाच कुटुंबातल्या चौघांचा मृत्यू, देवदर्शनाहून परतताना २ वर्षांपूर्वी जळालेल्या ट्रकला गाडीची धडक

Marathi News Live Updates : यमुना नदी आणि इतर जलस्रोतांमध्ये मूर्ती विसर्जनास मनाई

SCROLL FOR NEXT