Attack Sakal
ग्लोबल

Attack By Drone : हल्ल्यांसाठी होतोय सर्रास ड्रोनचा वापर; युक्रेनने सहा प्रांतांना ड्रोन हल्ल्याने केले लक्ष्य

रशिया-युक्रेन युद्धात रशियातील स्कोव्ह शहरातील विमानतळावर ड्रोन हल्ले झाल्याचे रशियाची माध्यम संस्था ‘तास’ने म्हटले आहे.

पीटीआय

मॉस्को - रशिया-युक्रेन युद्धात रशियातील स्कोव्ह शहरातील विमानतळावर ड्रोन हल्ले झाल्याचे रशियाची माध्यम संस्था ‘तास’ने म्हटले आहे. युक्रेनने सहा प्रांतांना ड्रोन हल्ल्याने लक्ष्य करत, आतापर्यंतचा सर्वात मोठा हल्ला केल्याचा दावा रशियाने केला. या हल्ल्यात मालवाहू सैनिकी विमाने नष्ट झाली आहेत. स्कोव्हचे गर्व्हनर मिखाईल वेदरनिकोव्ह यांनी या हल्ल्याला दुजोरा दिला आहे.

त्याचवेळी रशियन सैन्याकडून ड्रोन हल्ले परतवून लावण्याचे प्रयत्न केले जात आहेत. स्कोव्ह विमानतळावरून सर्व उड्डाणे रद्द करण्यात आली असून विमानतळ बंद केले आहे

गर्व्हनर मिखाईल म्हणाले, ‘‘ड्रोन हल्ल्यानंतर झालेल्या हानीचा आढवा घेण्यासाठी स्कोव्हच्या विमानतळाची आणि धावपट्टीची पाहणी करत आहोत. या हल्ल्याला युक्रेन जबाबदार आहे.’ ओरयोल, ब्रायन्स्क, रायझान, कालुगा आणि मॉस्को प्रांतात ड्रोन हल्ले झाले. रशियन टेलिग्रामच्या मते, स्कोव्ह विमानतळावर तब्बल १२ ड्रोन हल्ले झाले.

स्कोव्हचा भाग इस्टोनिया आणि लॅटेव्हिया देशाजवळ असून हे दोन्ही देश नाटोचे सदस्य आहेत. इस्टोनिया देश हा स्कोव्हपासून केवळ ३० किलोमीटर तर लॅटेव्हिया केवळ ६० किलोमीटर अंतरावर आहे. युक्रेनने बेलारुसमार्गे हे ड्रोन स्कोव्हपर्यंत पोहोचविल्याचे सांगितले जात आहे.

रशियन सैनिकांनी काळ्या समुद्रात चार ड्रोन पाडल्याचा दावा केला आहे. रशियाच्या मते, ब्रायन्स्क आणि ओरयोल क्षेत्रावर फिरणारे चार ड्रोन पाडण्यात आले. ड्रोन हल्ले पाहता वेनुकोव्हो विमानतळ बंद केले आहे. यापूर्वीही स्कोव्ह विमानतळावर हल्ला झाला होता. सोशल मीडियावर ड्रोन हल्ल्याचे छायाचित्र व व्हिडियो व्हायरल झाले आहे. या छायाचित्रामध्ये विमानतळ परिसरातून धुराचे लोट बाहेर पडताना दिसत आहेत.

किव्हवर बाँबवर्षाव सुरूच

किव्ह: रशियाकडून युक्रेनची राजधानी किव्हवर हल्ले सुरूच आहेत. ड्रोन व क्षेपणास्त्र हल्ल्यांत दोन नागरिकांचा मृत्यू झाल्याचे सैनिकी प्रशासकीय अधिकारी सर्जेई पोपको यांनी सांगितले. रशियाने विविध भागातून किव्हवर ड्रोन सोडले होते. तसेच ‘टीयू-९० एमएस’ या विमानातून किव्ह शहराला लक्ष्य केले.

यावेळी युक्रेनने प्रतिहल्ला करत वीसहून अधिक ड्रोन पाडल्याचा दावा केला. रशियाकडून किती ड्रोन सोडण्यात आले, हे मात्र समजू शकले नाही. युक्रेनच्या शेवचेन्किवस्की जिल्ह्यात ड्रोन हल्ल्यात व्यावसायिक इमारत कोसळली. ओडेसा आणि चेरकॅसी प्रांतातही स्फोट झाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs NZ 2nd ODI Live : आकिब नबीने विश्वास सार्थ ठरवला... किवींना ११ धावांत २ धक्के; KL Rahul चा अविश्वसनीय झेल Video Viral

Bala Nandgaonkar: विकसकाच्या बाऊन्सर्सचा बंदोबस्त करा; बाळा नांदगावकर; पिंगुळी पाझर तलाव, सासोली जमीन घोटाळाप्रश्‍नी आक्रमक

Pune Markets: दिवाळीनिमित्त व्यापारी पेठा गजबजल्या ;नवीन खतावण्यांची खरेदी; विविध दुकानांमध्ये आकर्षक विद्युत रोषणाई

Latest Marathi News Live Update : शरद पवार यांना आज रुग्णालयातून डिस्चार्ज; सकाळी १० वाजता ब्रीच कँडी रुग्णालयातून घरी सोडण्यात येणार

Amba Ghat Tunnel Project : आंबा घाटाला मिळणार बोगद्याचा पर्याय! कागल ते रत्नागिरी प्रवास आता अवघ्या एका तासात; प्रकल्प अहवाल तयार करण्याची मंत्री गडकरींकडून सूचना

SCROLL FOR NEXT