ग्लोबल

‘त्या’ जनुकामुळे द. आशियाला कोरोना संसर्गाचा धोका

कोरोनाचा संसर्ग झाल्यानंतर व्यक्तीची फुफ्फुसे निकामी होण्‍यास आणि तिच्या मृत्यूला कारणीभूत ठरणाऱ्या जनुकाचा ऑक्सफर्ड विद्यापीठाने शोध लावला आहे.

पीटीआय

लंडन - कोरोनाचा संसर्ग झाल्यानंतर व्यक्तीची फुफ्फुसे निकामी होण्‍यास आणि तिच्या मृत्यूला कारणीभूत ठरणाऱ्या जनुकाचा ऑक्सफर्ड विद्यापीठाने शोध लावला आहे. या नव्या संशोधनामुळेच आता दक्षिण आशियाई देशांत वास्तव्यास असणाऱ्या लोकांना या विषाणूचा अधिक धोका का आहे, हे समजू शकेल.

‘एलझेडटीएफएल-१’ या जनुकाच्या प्रभावामुळेच फुफ्फुसांच्या एखाद्या विशिष्ट संसर्गाला तोंड देण्याच्या क्षमतेमध्ये मोठ्या प्रमाणावर बदल होत असल्याचे आढळून आले असून आतापर्यंतची शोधून काढण्यात आलेली ही सर्वांत मोठी जनुकीय जोखीम असल्याची माहिती संशोधकांनी दिली आहे. ज्यांची पाळेमुळे ही दक्षिण आशियामध्ये आहेत अशा साठ टक्के लोकांमध्ये हे जनुक आढळून येते युरोपीय लोकांमध्ये मात्र त्याचे प्रमाण हे केवळ पंधरा टक्के असल्याचे उघड झाले आहे. जर्नल नेचर जेनेटिक्स या नियतकालिकात हे ताजे संशोधन विस्ताराने प्रसिद्ध झाले आहे. या संशोधनामुळे भारतीय उपखंडातील कोरोनाच्या प्रभावाचा अंशतः उलगडा होण्यास देखील मदत होईल असे संशोधकांनी म्हटले आहे.

या तंत्रज्ञानाचा वापर

‘एलझेडटीएफएल-१’ हे जनुक शोधून काढण्यासाठी संशोधकांनी कृत्रिम बुद्धिमत्ता आणि नव्या मॉलक्यूलर तंत्रज्ञानाचा वापर केला होता. हेच जनुक कोरोना संसर्गाच्या जोखीमेशी संबंधित असल्याचे दिसून आले आहे. फुफ्फुसांतील ज्या पेशी या संसर्गाशी दोन हात करण्याचे काम करतात त्यांनाच हे जनुक रोखत असल्याचे दिसून आले आहे. या पेशी जेव्हा कोरोना विषाणूच्याच्या संपर्कात येतात तेव्हा त्या या जनुकाच्या प्रभावामुळे विषाणूला विरोध करण्याऐवजी त्यांचा स्वीकार करतात असेही दिसून आले आहे. यामुळे पेशींतील ‘एसीई-२’ हे प्रोटीन देखील कमी होत असल्याचे दिसून आले आहे. ज्या लोकांना कोरोना संसर्गाचा धोका अधिक आहे अशांचा प्राधान्याने विचार करून त्यांचे तातडीने लसीकरण करणे गरजेचे आहे, असा सल्लाही तज्ज्ञांकडून देण्यात आला.

कोरोना संसर्गाचा विविध वांशिक गटांना असणाऱ्या धोक्याचे प्रमाणदेखील वेगवेगळे आहे. ताज्या जनुकीय संशोधनामागेदेखील हेच तत्त्व असले तरीसुद्धा हे संशोधन परिपूर्ण आहे असे म्हणता येणार नाही.

- प्रो. फ्रान्सेस फ्लिंटर, संशोधक

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tembhurni Crime : गाडी पार्किंगच्या कारणावरून सुरू असलेले भांडण सोडविण्यास गेलेल्या एकाचा चाकूने भोसकून खून; दोन संशयित आरोपींना अटक

Degloor Crime : बनावट ग्राहकाच्या सापळ्यात मोटारसायकल चोर जेरबंद; १० चोरीच्या दुचाकींसह एक आरोपी ताब्यात, एक फरार

Badnapur News : ‘साहेब, शेतकऱ्यांना भरीव मदत द्या, जनावरांसाठी चारा द्या’; वरुडीतील शेतकऱ्यांची महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे आर्जवी मागणी

Nagpur Crime : दारुड्या प्रवाशाचा हायव्होल्टेज ड्रामा! दारूच्या नशेत पकडली ठाण्यात पोलिसाची कॉलर

Gujarat UCC: गुजरातमध्ये समान नागरी कायदा लागू करण्यास राष्ट्रपतींची मंजुरी; काय असेल नियमावली?

SCROLL FOR NEXT