japan 
ग्लोबल

जपान भूकंपाने हादरलं, त्सुनामीचा इशारा; पाहा VIDEO

सकाळ डिजिटल टीम

टोकियो - जपानमध्ये शनिवारी 7.2 रिश्टर स्केल भूकंपाचा धक्का बसला. या भूकंपनानंतर त्सुनामीचा इशारा देण्यात आला आहे. जपानच्या उत्तर पूर्व किनारपट्टीच्या भागात भूकंपाचे धक्के बसले. जपानने दहा वर्षांपूर्वी भीषण भूकंप आणि त्सुनामी अनुभवली होती. नुकतंच 11 मार्चला या कटू आठवणींना दहा वर्षे झाली. जपानच्या वेधशाळेनं शनिवारी त्सुनामीचा इशारा दिला आहे. जपानच्या स्थानिक वेळेनुसार सायंकाळी 6 वाजून 9 मिनिटांनी मायागी प्रांतात भूकंप झाला. जमिनीपासून 60 किमी आत हा भूकंप होता. स्थानिक माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार अजुनतरी या भूकंपामुळे काही नुकसान झाल्याचं समोर आलेलं नाही.

समुद्र किनाऱ्या लगत असलेल्या मियागी प्रांतात शनिवारी 7.2 रिश्टर स्केल तीव्रतेच्या भूकंपाने जपान हादरलं. यानंतर समुद्रात जवळपास एक मीटर उंचीच्या लाटाही उसळल्या. मियागीमध्ये जपानचा एक न्यूक्लिअर पॉवर प्लांट आहे. भूकंपानंतर प्लांट सुरक्षित असल्याचं सांगण्यात येत आहे. भूकंपनांतर जवळपासच्या 200 घरांमधील वीज गेली आहे. 

पूर्व जपानच्या रेल्वे कंपनीने भूकंपानंतर बुलेट ट्रेनची सेवा थांबवली आहे. भूकंपानंतर खबरदारी म्हणून टोहोकू शिंकानसेन बुलेट ट्रेन तात्पुरत्या काळासाठी निलंबित करण्यात आली आहे. आता जपानमधील भूकंप होत असताना त्यावेळचे काही व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. 

जगातील भूकंप प्रवण देशांपैकी एक जपान हा देश आहे. याठिकाणी सातत्यानं भूकंपाचे धक्के बसत असतात. पृथ्वीच्या टेक्टोनिक प्लेट्सची सीमा तयार करणाऱ्या रिंग ऑफ फायरवर हा देश असून भूकंपाच्या दृष्टीने संवेदनशील मानला जातो. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Commonwealth Games 2026 : शेताच्या बांधावर अनवाणी धावणाऱ्या गुलवीर सिंगने राष्ट्रकुल स्पर्धेत इतिहास घडवला; ०.०४ सेकंदाच्या फरकाने जिंकले दुसरे पदक

Commonwealth Games 2026: ७ सुवर्ण, ३ रौप्य.. बॉक्सिंगपटूंची ऐतिहासिक कामगिरी; भारताची Medal Table मध्ये उत्तुंग भरारी, बघा कितव्या स्थानावर पोहोचले

Commonwealth Games 2026: सचिन... सचिन... पंचांनी १ गुण वजा केला, भारताचा बॉक्सर पेटला; तिसऱ्या फेरीत मुक्क्यांची बरसात करून जिंकले सुवर्ण...

Education Initiative: चिमुकल्या इरफानच्या आठवणीत अमळनेरमध्ये शिक्षणसेवेचा संकल्प; गरजू विद्यार्थ्यांना मोफत साहित्य वाटप उपक्रम

Commonwealth Games 2026: धक्कादायक... ऑलिम्पिक पदक विजेत्या लव्हलिना बोरगोहैनचे सुवर्ण हुकलं...

SCROLL FOR NEXT