Earthquake 
ग्लोबल

Earthquake News : नेपाळमध्ये पहाटे ५.३ तिव्रतेचा भूकंप; बिहारमध्ये देखील हादरली जमीन

नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजीने याबद्दल माहिती दिली आहे

रोहित कणसे

भारताचा शेजारी देश नेपाळमध्ये आज सकाळी ५.३ रिश्टर स्केलचा भूकंपाचे धक्के जाणवले. नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजीने याबद्दल माहिती दिली आहे. भारतात देखील बिहारच्या अनेक भागात देखील भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. रविवारी सकाळी झालेला हा भूकंप पाटणासह अनेक भागात जाणवला.

भारतात देखील बिहारच्या अनेक भागात भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. पाटणा, पश्चिम चंपारण, सारण, सिवान, गोपालगंज आणि नेपाळलगतच्या काही जिल्ह्यांमध्ये रविवारी सकाळी भूकंपाचे धक्के जाणवले. मात्र, रिश्टर स्केलवर त्याची तीव्रता कमी होती, त्यामुळे आतापर्यंत कोणतेही नुकसान किंवा जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही. रविवारी सकाळी 7.24 वाजता भूकंपाचे धक्के जाणवले.

भूकंपाची तीव्रता 5.3 नोंदवण्यात आली

मिळालेल्या माहितीनुसार भूकंपाचे केंद्र हे काठमांडू, नेपाळजवळ होतं. तसेच रिश्टर स्केलवर त्याची तीव्रता 5.3 नोंदवण्यात आली. भूकंप जमिनीपासून 10 किलोमीटर खाली झाला. बिहारमध्ये आणि नेपाळच्या लगतच्या तराई भागात त्याचा सौम्य प्रभाव जाणवला.

नेपाळ, बिहार, पूर्व उत्तर प्रदेशत बसले धक्के

नेपाळपासून सुरू झालेल्या भूकंपाचे हादरे भारतात बिहार-यूपी व्यतिरिक्त झारखंड, पश्चिम बंगालपर्यंत जाणवले. उत्तर प्रदेशातील महाराजगंज, थूठीबाडी, सौनोली, सिद्धार्थनगर, बहराइच, श्रावस्ती, लखनौ, प्रयागराज येथे भूकंपाचे धक्के जाणवले. बिहारमध्ये रक्सौल आणि मधुबनीसह सीमावर्ती जिल्ह्यांमध्ये याचा प्रभाव अधिक होता. तसेच पाटणा, गया, पश्चिम चंपारण, सारण, सिवान, गोपालगंज, वाल्मिकीनगर, बेतिया, मोतिहारी येथेही भूकंपाचे धक्के जाणवले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nipah Virus Alert : सावधान! पश्चिम बंगालमध्ये आढळले ‘निपाह’ विषाणूचे रूग्ण; केंद्र सरकारकडून हालचालींना वेग

Pune News : सिंहगड रोड परिसरातील नागरिकांचा एल्गार; बिनविरोध निवडणूक प्रक्रिया रद्द करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांचे दार ठोठावले!

Bhogi Horoscope : भोगीनंतर 'या' 5 राशींचे भाग्य बदलणार; अचानक मिळतील पैसे, रखडलेली कामे पूर्ण होणार अन् ऑफिसमधून मिळेल खुशखबर

PMC Abhay Yojana : पुणेकरांनो घाई करा! अभय योजनेचे शेवटचे ७२ तास शिल्लक; ७५ टक्के सवलत गमावू नका!

Vande Bharat Sleeper Train: प्रतीक्षा संपली! देशातील पहिली ‘वंदे भारत स्लीपर ट्रेन’ शनिवारपासून धावणार

SCROLL FOR NEXT