Taiwan Earthquake esakal
ग्लोबल

Taiwan Earthquake : तैवानला भूकंपाचा धक्का

सात जणांचा मृत्यू; अनेक इमारतींचे नुकसान

सकाळ डिजिटल टीम

तैपेई : तैवानला आज सकाळी जोरदार भूकंपाचा धक्का बसल्याने पायाभूत सुविधांचे मोठे नुकसान झाले. रिश्‍टर स्केलवर ७.२ इतकी तीव्रता असलेल्या या भूकंपात सात जणांचा मृत्यू झाला असून सातशेहून अधिक जण जखमी झाले. तैवानला मागील २५ वर्षांत बसलेला हा सर्वांत मोठा भूकंपाचा धक्का होता.

भूकंपाचा केंद्रबिंदू ह्युॲलिन शहरापासून १८ किलोमीटर दूर आणि ३५ किलोमीटर खोलीवर होता. अमेरिकेच्या भूगर्भशास्त्र विभागाने भूकंपाची तीव्रता ७.८ रिश्‍टर इतकी सांगितली. मोठ्या भूकंपानंतर बराच काळ हादरेही जाणवत होते. त्यातील एक धक्काही ६.५ रिश्‍टर तीव्रतेचा होता, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. भूकंपामुळे सुरुवातीला सुनामीचाही इशारा देण्यात आला होता, तो नंतर मागे घेण्यात आला. सकाळी आठ वाजता गर्दीची वेळ असताना आणि कामाला निघालेले नागरिक मोठ्या संख्येने रस्त्यावर असताना भूकंपाचा धक्का बसला. त्यामुळे अनेक इमारतींच्या काचा फुटल्या, काही भागांची पडझड झाली. भूकंपाचा हादरा वीस ते तीस सेकंद जाणवल्याचे स्थानिकांनी सांगितले. भूकंपामुळे किमान २४ ठिकाणी दरडी कोसळल्या तर ३५ रस्ते, पूल आणि बोगद्यांना तडे गेले. मोठी पडझड झाल्याने, तसेच अपघात झाल्याने सात जणांचा मृत्यू झाला, तर ७३६ जण जखमी झाले.

भूकंपाचा धक्का जाणवताच अनेक जण घाबरून घराबाहेर पडले होते. भूकंपामुळे पूल हेलकावे घेऊ लागल्याने पुलावर असलेले नागरिक प्रचंड धास्तावले होते. ‘आम्हाला भूकंपाच्या धक्क्यांची सवय आहे. मात्र, आज प्रथमच मला एवढी भीती वाटली,’ अशी प्रतिक्रिया एका नागरिकाने व्यक्त केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Accident : आषाढी वारीत दुर्दैवी घटना! जेजुरीजवळ ट्रकची वारकऱ्यांना धडक, ३ महिलांचा मृत्यू, ४ गंभीर जखमी

Ashadhi Wari: पंढरपुरात सायकलवारीचा जल्लोष! महाराष्ट्र-कर्नाटकातील ४ हजार सायकलस्वारांची हरिनामाच्या गजरात नगरप्रदक्षिणा

Nagpur: विक्रेत्याच्या चुकीची शिक्षा आता खरेदीदाराला नाही; जीएसटीच्या नियमांमध्ये होणार बदल

Latest Marathi News Live Update : जेजुरीजवळ ट्रकच्या धडकेत तीन महिला वारकऱ्यांचा मृत्यू; उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांनी रुग्णालयात जाऊन जखमींची केली विचारपूस

Petrol-Diesel Price Today: अमेरिका-इराण संघर्षानंतर देशात इंधनाचे नवे दर जाहीर! 13 जुलैला पेट्रोल-डिझेल किती रुपयांना?

SCROLL FOR NEXT