Ebola  Sakal
ग्लोबल

Ebola Outbreak : कोरोना रूग्णवाढीत WHO कडून मोठी घोषणा

WHO च्या या घोषणेमुळे नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.

सकाळ डिजिटल टीम

WHO On Uganda's Ebola Outbreak : कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटमुळे वाढत्या रूग्णसंख्येत जागतिक आरोग्य संघटनेकडून मोठी घोषणा करण्यात आली आहे.

WHO च्या या घोषणेमुळे नागरिकांना मोठा दिलासा मिळाला असून, कोरोना महामारीपूर्वी अस्तित्वात आलेल्या इबोला विषाणुचा उद्रेक संपुष्टात आल्याची घोषणा WHO कडून बुधवारी करण्यात आली आहे.

सलग 42 दिवस या विषाणुची लागण झालेल्या एकाही नव्या रूग्णाची नोंद न झाल्याने या विषाणुचा प्रसार संपुष्टात आल्याची घोषणा करण्यात आली आहे. या विषाणुचा उद्रेक झाल्यापासून आतापर्यंत युगांडात 55 लोकांचा बळी गेला आहे.

गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये या रोगाची लागण झाल्याची नोंद करण्यात आली होती. मात्र, त्यानंतर इबोलाचा प्रादुर्भाव यशस्वीरित्या नियंत्रित करण्यात यश आल्याचे युगांडाचे आरोग्य मंत्री जेन रुथ एसेंग यांनी सांगितले.

युगांडात इबोलाचे आतापर्यंत एकूण 142 बाधितांची पुष्टी करण्यात आली आहे तर, यामुळे 55 नागरिकांचा मृत्यू झाला असून, 87 रुग्णांनी या विषाणुवर यशस्वीरित्या मात केल्याचे WHO ने म्हटले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Martyr constable pension case: हुतात्मा जवानाच्या आईला पेन्शन नाकारली! उच्च न्यायालयाने दिले महत्त्वाचे आदेश

Pune Crime : येरवड्यात दारू पिताना वाद, लाकडी दांडक्याने मित्राचा खून

Maha Shivratri 2026 Travel Tips: महाशिवरात्रीला महादेवाच्या प्रसिद्ध मंदिरांना भेट द्यायला जाताय? मग 'या' 5 गोष्टी नक्की लक्षात ठेवा

RBI Rule: महत्त्वाची बातमी! आता १००% सुरक्षित निधीच मान्य; असुरक्षित हमींना पूर्णविराम, ब्रोकर्ससाठी आरबीआयचे कडक नियम लागू

Maha Shivratri 2026: भगवान भोलेनाथांकडून जीवनातील 'या' 4 महत्त्वाच्या गोष्टी शिका, कधीच येणार नाही अपयश

SCROLL FOR NEXT