Ebrahim Raisi Death esakal
ग्लोबल

Ebrahim Raisi Death: इराणच्या राष्ट्राध्यक्षांच्या हेलिकॉप्टर अपघातामागे षडयंत्र आहे का, नेमकं काय घडलं? इस्रायलच्या भूमिकेबाबत मोठा दावा!

Ebrahim Raisi Death : बचाव पथक अपघातस्थळी पोहोचले आहे. घटनास्थळी हेलिकॉप्टरचे अवशेष सापडले आहेत. हेलिकॉप्टर अपघाताची ही घटना कट आहे की अपघात हे स्पष्ट झालेले नाही.

Sandip Kapde

Ebrahim Raisi Death : इराणचे राष्ट्राध्यक्ष इब्राहिम रईसी यांचा हेलिकॉप्टर अपघातात मृत्यू झाला आहे. इराणचे राष्ट्राध्यक्ष इब्राहिम रईसी हे रविवारी (19 मे) अझरबैजानचे राष्ट्राध्यक्ष इल्हाम अलीयेव यांच्यासोबत धरणाच्या उद्घाटनावरुन परत येत होते. यावेळी त्यांचे हेलिकॉप्टर भरकटले. या हेलिकॉप्टरमधील सर्वांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान घटनेमुळे जगाला हादरे बसले आहे. अनेक अटकळा देखील बांधल्या जात आहे.

घटनास्थळी हेलिकॉप्टरचे अवशेष सापडले आहेत. रईसी यांचे हेलिकॉप्टर अपघात हा अपघात की कट? यावर इस्रायलबाबत मोठा दावा केला जात आहे. रईसी यांच्यासोबत इराणचे परराष्ट्र मंत्री होसेन अमीर-अब्दोल्लाहियन हेही हेलिकॉप्टरमध्ये होते.

बचाव पथक अपघातस्थळी पोहोचले आहे. घटनास्थळी हेलिकॉप्टरचे अवशेष सापडले आहेत. हेलिकॉप्टर अपघाताची ही घटना कट आहे की अपघात हे स्पष्ट झालेले नाही. दरम्यान, इस्रायलच्या भूमिकेबाबत मोठे दावे केले जात आहेत. या घटनेनंतर इस्त्रायली वृत्तसंस्थेने कानने दावा केला होता की, कोणीही जिवंत राहण्याची शक्यता नाही. यानंतर इस्रायलवरील संशय आणखी वाढला.

इस्राईलच्या भूमिकेबाबत मोठा दावा-

मात्र, इराणच्या राष्ट्राध्यक्षांच्या हेलिकॉप्टर अपघाताच्या घटनेबाबत इराणकडून जे काही वृत्त येत आहेत, त्यावर इस्राईल बारकाईने लक्ष ठेवून आहे. या घटनेवर इस्राईलने काहीही बोलणे टाळले आहे. मात्र, सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, हेलिकॉप्टर अपघाताच्या या घटनेत आपली कोणतीही भूमिका नसल्याचे इस्राईलने स्पष्टपणे सांगितले आहे. इस्राईली अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे की इराणमधील हेलिकॉप्टर क्रॅशमध्ये इस्राईलच्या कथित सहभागाबद्दल कट असल्याचा आही लोक अफवा पसरवतील.


खराब हवामानामुळे झाला अपघात -

खराब हवामानामुळे हेलिकॉप्टर अपघाताची ही घटना घडल्याचे इस्राईलने म्हटले आहे. या घटनेशी आमचा काहीही संबंध नाही. इराणच्या राजधानीपासून उत्तर-पश्चिम सुमारे 600 किलोमीटर अंतरावर अझरबैजानच्या सीमेजवळ असलेल्या जोल्फा शहरात ही घटना घडली आहे. अझरबैजानचे राष्ट्राध्यक्ष इल्हाम अलीयेव यांच्यासमवेत धरणाचे उद्घाटन करण्यासाठी रईसी रविवारी अझरबैजानमध्ये होते. परतत असताना हा अपघात झाला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Viral Video: पहिली रेल्वे 172 वर्षापूर्वी मुंबईत धावली, पहिल्या यात्रेकरुचा AI व्हिडिओ व्हायरल, 1853 मधील क्षण पाहा...

"सिंगल पालक म्हणून अधिक जबाबदारी" थोडं तुझं फेम अभिनेत्रीने आई म्हणून उलगडला प्रवास ; "मला अभिमान.."

Pune: पुण्यात नामांकित संस्थेच्या कॅम्पसमध्ये विद्यार्थ्यांमध्ये राडा, कोयते आणि हातोड्याने हल्ला, व्हिडिओ व्हायरल

Satara News: 'कऱ्हाड आगाराला आणखी पाच नवीन बस'; एसटी कर्मचाऱ्यांच्या हस्ते लोकार्पण; लोकप्रतिनिधींच्या पाठपुराव्याला यश

Best Airlines: फॅमिली ट्रिपसाठी फ्लाइट बुक करताय? मग आधी बघा कोणती एअरलाइन्स देते सर्वाधिक सुरक्षितता आणि आराम!

SCROLL FOR NEXT