Egypt Pyramid  esakal
ग्लोबल

Egypt Pyramid : पिरॅमिडमध्ये सापडली सुरंग; संशोधकांनी शोधलं असं काही की तूमचे डोळेही चकाकतील!

संशोधकांनी कॉस्मिक किरणांच्या मदतीने शोधला भुयारी मार्ग!

सकाळ डिजिटल टीम

इजिप्तच्या वाळवंटांना अनेक वर्षांचा इतिहास आहे. वाळूच्या त्या कणांनी अनेक राजे रजवाडे, जमिनदोस्त झालेले महाल, ममीज अशा अनेक गोष्टी पाहिल्या आहेत. त्या वाळूत अनेक संशोधकही इतिहासातील गोष्टींचा मागोवा घेत जातात.

जगभरात असलेल्या सात आश्चर्यांपैकी इजिप्तचे पिरॅमिड देखील एकेकाळी 7 आश्चर्यांपैकी एक आहेत. हा ऐतिहासिक ठेवा नेहमीच आश्चर्यचकीत करतो. शास्त्रज्ञही नेहमी संशोधन करत असतात. काहीवेळा असे काहीतरी सापडते ज्यामुळे त्याचे नवीन रहस्य उघड होते.

नुकतेच, पिरॅमिडशी संबंधित एक नवीन रहस्य समोर आले आहे. ज्याने शास्त्रज्ञांनाही आश्चर्यचकित केले आहे. एका इंग्रजी वेबसाइटच्या वृत्तानुसार, इजिप्तच्या गिझा पिरॅमिडच्या प्रवेशद्वाराजवळ एक गुप्त भुयारी मार्ग सापडला आहे.

या मार्गाबद्दल शास्त्रज्ञांना यापूर्वी कोणतीही माहिती नव्हती. स्कॅन पिरामिड प्रकल्पाशी संबंधित शास्त्रज्ञांनी 30 फूट लांबीचा हा रस्ता शोधून काढला आहे. या शोधासाठी संशोधकांनी कॉस्मिक किरणांच्या ऊर्जा किरणांची निर्मीती केली. त्यातून हा शोध लागला.

पिरॅमिडमधील भुयारी रस्ता

इजिप्तच्या पुरातन वस्तू जतन करणाऱ्या सर्वोच्च परिषदेचे प्रमुख मुस्तफा वजीरी यांनी सांगितले की, उर्जा किरणांचे हे तंत्र आणखी अनेक शोध लावण्यास मदत करेल. त्यानंतरच्या चाचणीसाठी, शास्त्रज्ञांनी रडार आणि अल्ट्रासाऊंड मशीनचा वापर केला. नंतर दगडांमधील क्रॅकमधून आतमध्ये एक अतिशय लहान कॅमेरा घातला. त्यामूळे आतील रस्ता स्पष्टपणे दिसत होता.

हे पिरॅमिड्स सुमारे 4500 वर्षे जुने आहेत. या मार्गाबाबत अधिक माहिती मिळावी यासाठी भविष्यात आणखी अनेक प्रकारच्या चाचण्या करण्यात येणार असल्याचेही वझिरी यांनी सांगितले. त्यांचा असा विश्वास आहे की, एकतर हा मार्ग इतर अज्ञात गोष्टींकडे नेईल. हा 480 फूट उंचीचा पिरॅमिड गिझा पठारावर फारो खुफू नावाच्या राजाच्या काळात बांधला गेला होता. राजाच्या मृत्यूनंतर त्यांच्या कबरीच्या रूपात बांधला गेला होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Laxman Hake : ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांच्या विरोधात गुन्हा दाखल; मराठा समाजातील मुलींच्या लग्नाबाबतचे 'ते' वक्तव्य भोवले

माेठी बातमी! 'श्रीगोंदेत खंडणीसाठी व्यापाऱ्याचे अपहरण'; अडीच कोटीची मागणी करत ३० लाख स्वाकारले, जिल्ह्यात खळबळ

IND vs PAK, Asia Cup: पाकिस्तानने टॉस जिंकला, पण भारताच्या मनासारखा निर्णय घेतला; पाहा प्लेइंग - ११

Accident News: भीषण अपघात! हरिद्वारहून परतणाऱ्या कुटुंबाच्या गाडीचा अपघात, ७ जणांचा मृत्यू

Leopard Terror : 'नागराळच्या शिवारात बिबट्या आढळल्याने शेतकऱ्याचा जीव टांगणीला'; मुक्तसंचारामुळे सीमेवरील गावात भीतीचे वातावरण

SCROLL FOR NEXT