Egyptian President confers PM Narendra Modi with Order of the Nile Egypts highest state honour  
ग्लोबल

PM Modi In Egypt : PM मोदींचा पुन्हा एकदा गौरव! इजिप्तने सर्वोच्च पुरस्काराने केलं सन्मानित

रोहित कणसे

PM Modi in Egypt : तीन दिवसांच्या अमेरिका दौऱ्यानंतर पंतप्रधान मोदी शनिवारी इजिप्तची राजधानी कैरो येथे पोहोचले. त्यांनी रविवारी हेलिओपोलिस वॉर मेमोरियल आणि अल हकीम मशिदीला भेट दिली. पंतप्रधानांचा हा दौरा दोन दिवसांचा आहे.

या दौऱ्यादरम्यान इजिप्तचे राष्ट्रपती अब्देल फताह अल-सिसी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना कैरो येथे 'ऑर्डर ऑफ द नाईल' पुरस्काराने सन्मानित केले, 'ऑर्डर ऑफ द नाईल' हा इजिप्तचा सर्वोच्च राज्य सन्मान आहे.

गेल्या नऊ वर्षांच्या कार्यकाळात पंतप्रधान मोदींना अनेक आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळाले आहेत. जगभरातील विविध देशांनी पंतप्रधान मोदींना प्रदान केलेला हा 13 वा सर्वोच्च राज्य सन्मान आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी अमेरिकेच्या दोऱ्यानंतर इजिप्त येथे पोहचले आहेत. या भेटीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इजिप्तचे राष्ट्राध्यक्ष अब्देल फताह अल-सिसी यांची कैरो येथे भेट घेतली. या महत्वपूर्ण बैठकीनंतर द्विपक्षीय चर्चा होणार आहे. यामध्ये अनेक महत्त्वाच्या करारांवर स्वाक्षऱ्या होणार आहेत. तत्पूर्वी, पंतप्रधान मोदींनी इजिप्तमधील ऐतिहासिक अल-हकीम मशिदीलाही भेट दिली. यावेळी त्यांनी मशिदीतील मौलवींचीही भेट घेतली.

रविवारी कैरो येथील अल हकिम मशिदीला त्यांनी भेट दिली. ११व्या शतकात दाऊदी बोहरा समुदायाने या मशिदीचा जिर्णोध्दार केला होता. या व्यातीरिक्त ही मशिद युनेस्को च्या जाकतिक वारसास्थळांमध्ये समील करण्यात आली आहे, या मशिदीत पोहचल्यावर मोदींचं जोरदार स्वागत करण्यात आलं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Surendra Koli : निठारी प्रकरणात निर्दोष मुक्त सुरेंद्र कोलीने जीवन संपवले; २१ वर्षांच्या तुरुंगवासानंतर पुन्हा सुरू केले होते सामान्य आयुष्य

६ वर्षांपासून क्लार्क, पण टायपिंग टेस्टमध्ये तीनदा फेल; जिल्हाधिकाऱ्यांनी डिमोशन करत शिपाई बनवलं

Pune Bus Blaze: शिवाजीनगर चौकात पीएमपी बसला अचानक आग; अग्निशामक जवानाच्या सतर्कतेने प्रवाशांचे प्राण वाचले

Pune Illegal PG Hostels : लोहगावमध्ये ११ बेकायदेशीर पीजी हॉस्टेल सील; विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात घालणाऱ्या जागामालकांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश

Gambling Raid : गंगापूरमध्ये रम्मी जुगार अड्ड्यावर धाड; १.९२ लाखांचा मुद्देमाल जप्त, तिघांसह चौघांवर गुन्हा

SCROLL FOR NEXT