Eiffel Tower Sakal
ग्लोबल

Eiffel Tower ची उंची 6 मीटरने वाढली, जाणून घ्या कसं ?

आयफेल टॉवर जगातील सर्वात प्रसिद्ध पर्यटन स्थळांपैकी एक असून येथ लाखो पर्यटक भेट देत असतात.

सकाळ डिजिटल टीम

पॅरिस : पॅरिसमधील प्रसिद्ध ऐतिहासिक आयफेल टॉवरची उंची मंगळवारी (दि.15) 6 मीटरने (19.69 फूट) वाढली आहे. आयफेल टॉवरवर नवीन डिजिटल रेडिओ अँटेना बसवल्यानंतर टॉवरच्या उंचीत वाढ झाली आहे. रॉयटर्स या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, 19व्या शतकाच्या उत्तरार्धात गुस्ताव्ह आयफेलने बांधलेल्या या टॉवरची उंची DAB+ (डिजिटल ऑडिओ) अँटेना बसवल्यानंतर आता 330 मीटरपर्यंत वाढली आहे. हा अँटेना हेलिकॉप्टरद्वारे आयफेल टॉवरच्या वरच्या बाजूला नेण्यात आला.

आयफेल टॉवरच्या बांधकामादरम्यान, आयफेल टॉवरने अमेरिकेतील सर्व स्मारकांना मागे टाकत मानव निर्मित जगातील सर्वात उंच वास्तू म्हणून उदयास आले. एवढेच नव्हे तर, आयफेल टॉवरला 4 दशके जगातील सर्वात उंच स्मारक म्हणून बिरुदावली मिळाली होती, त्यानंतर 1929 मध्ये न्यूयॉर्क शहरातील क्रिस्लर बिल्डिंगने हा मान पटकवत सर्वात उंच वास्तूचा मान मिळवला. TripAdvisor च्या मते, हा रॉट आयरनपासून बनवलेला जगातील सर्वात प्रसिद्ध पर्यटन स्थळांपैकी एक असून, गेल्या 100 वर्षांपासून, हे ब्रॉडकास्ट ट्रान्समिशनसाठी देखील वापरले जात आहे. जुना अँटेना बदलल्यानंतर त्याची उंची अनेक वेळा बदलली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

Samarth Movie Review: मनाचे श्लोक, अध्यात्म अन् बाप-लेकाचा संघर्ष; विचार करायला लावणारा 'समर्थ'; कसा आहे चित्रपट?

SCROLL FOR NEXT