US Music Festival  Team eSakal
ग्लोबल

US म्युझिक फेस्टिवलमध्ये चेंगराचेंगरी; आठ जणांचा मृत्यू

चेंगराचेंगरीमध्ये अनेकजण जखमी झाले आहेत.

सुधीर काकडे

अमेरिकेत शुक्रवारी एक गंभीर घटना घडली. दक्षिन अमेरिकेत एका कार्यक्रमात झालेल्या चेंगराचेंगरीमध्ये तब्बल ८ लोकांनी आपला जीव गमावला आहे. या घटनेत अनेकजण जखमी झाले आहेत. रात्री 9 ते 9:15 च्या सुमारास गर्दी स्टेजकडे येण्याचा प्रयत्न करत असताना ही घटना घडली. दोन दिवसांच्या या कार्यक्रमात 50,000 लोकांची गर्दी झाली होती.

दक्षिण अमेरिकेत शुक्रवारी अॅस्ट्रोवर्ल्ड म्युझिक फेस्टिव्हलमध्ये झालेल्या चेंगराचेंगरीच्या घटनेत किमान आठ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेत अनेकजण जखमी झाले आहेत असे अधिकाऱ्यांनी सांगितले.

ह्यूस्टनचे अग्निशमन दलाचे प्रमुख सॅम्युअल पेना यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, "जमाव स्टेजच्या समोरच्या दिशेला येण्याचा प्रयत्न करत असताना चेंगराचेंगरी झाली. यावेळी चेंगराचेंगरी झाल्याने आठ जणांचा मृत्यू झाला. आमच्याकडे रात्रीपर्यंत किमान आठ मृत्यू झाल्याची माहिती आली होती. वैद्यकीय तपासणी पूर्ण होईपर्यंत मृत्यूचे कारण निश्चित केले जाऊ शकत नाही." दरम्यान, या घटनेमुळे परिसरात खळबळ निर्माण झाली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

अग्रलेख : शोध हरवलेल्या आवाजाचा!

आजचे पंचांग आणि दिनविशेष - 5 जुलै 2025

Latest Maharashtra News Updates : विजयी मेळाव्यानिमित्त ठाकरे बंधू येणार एकाच व्यासपीठावर, शिवसेना-मनसेचा आज भव्य मेळावा

मन, मेंदू आणि आपण

हौस ऑफ बांबू : सहासष्ट आणि नव्याण्णव..!

SCROLL FOR NEXT