mahatma gandhi_New York 
ग्लोबल

अमेरिका : न्यूयॉर्कमध्ये महात्मा गांधींच्या पुतळ्याची तोडफोड!

भारतीय कॉन्स्युलेटनं नाराजी व्यक्त केली असून स्थलांतरीत भारतीयांनी देखील याप्रकरणी संताप व्यक्त केला आहे.

Amit Ujagare (अमित उजागरे)

न्यूयॉर्क : अमेरिकेतील न्यूयॉर्क शहरातील मॅनहॅटन इथं महात्मा गांधी यांच्या पुतळ्याची शनिवारी काही समाजकंटकांनी तोडफोड केली. या घटनेवर भारतीय कॉन्सुलेटनं जाहीर नाराजी व्यक्त केली आहे. तसेच स्थलांतरीत भारतीयांनीही या घटनेवर संताप व्यक्त केला आहे. (eitght foot high statue of Mahatma Gandhi vandalised in New York)

या घटनेवर प्रतिक्रिया देताना भारतीय वाणिज्य दूतावासानं म्हटलं की, ही घटना शनिवारी पहाटेच्या सुमारास घडली असून काही अज्ञात लोकांनी महात्मा गांधींच्या ब्रॉझच्या पुतळ्याची तोडफोड केली आहे. या घटनेची आम्ही तीव्र शब्दांत निंदा करतो. याप्रकरणाची तक्रार स्थानिक अधिकाऱ्यांकडे करण्यात आली आहे.

दूतावासाच्या माहितीनुसार, अमेरिकेच्या परराष्ट्र विभागासमोर या प्रकरणाच्या तात्काळ चौकशीची मागणी केली आहे. अधिकाऱ्यांनी या घृणास्पद कृत्यासाठी ज्या लोकांना जबाबदार धरलं आहे, त्यांच्यावर कडक कारवाई करण्यातचं आवाहन करण्यात आलं आहे. गांधी मेमोरियल इंटरनॅशनल फाउंडेशनने ही आठ फुटांची गांधीजींची प्रतिमा दान दिली आहे. गांधीजींच्या ११७ व्या जयंतीच्या मुहूर्तावर २ ऑक्टोबर १९८६ या पुतळ्याची स्थापना केली होती.

दरम्यान, या पुतळ्याला २००१ मध्ये हटवण्यात आलं होतं तसेच एका वर्षानंतर २००२ मध्ये त्याची पुनर्रस्थापना करण्यात आली होती. गेल्या वर्षी देखील काही अज्ञात व्यक्तींनी याच प्रकारे अमेरिकेच्या कॅलिफोर्निया राज्यातून गांधीजींच्या आणखी एक पुतळ्याची विटंबना केली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Meenatai Thackeray statue case Update: मोठी बातमी! मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर रंग फेकणाऱ्यास २४ तासांच्या आत अटक; गुन्हाही केला कबूल

Disha Patani’s house firing incident: दिशा पटानीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या दोन शूटर्सचा अखेर गाझियाबादमध्ये खात्मा!

Nagpur Crime : अपघाताच्या विम्याच्या कागदपत्रासाठी मागितले आठ हजार; उपनिरीक्षक, हेडकॉन्स्टेबल एसीबीचा जाळ्यात

Shital Mahajan : स्पेनमध्ये स्कायडायव्हिंग करून शीतल महाजन यांच्या पंतप्रधानांना शुभेच्छा

INDW vs AUSW: टीम इंडियाच्या नारी शक्तीचा ऐतिहासिक विजय! ऑस्ट्रेलियाचा वन डे क्रिकेट इतिहासात असा पराभव कुणी केलाच नव्हता...

SCROLL FOR NEXT