Elon Musk To Buy Coca Cola sakal
ग्लोबल

Twitter नंतर Coca Cola कडे मोर्चा, एलॉन मस्क यांची नवी घोषणा

सकाळ डिजिटल टीम

टेस्लाचे सीईओ एलॉन मस्क (Elon Musk) ट्विटरला विकत घेतल्यानंतर सोशल मीडियावर अधिक सक्रीय झाले आहेत. त्यांनी आज सकाळच्या सुमारास ट्विट करून एक मोठी घोषणा केली आहे. मस्क यांनी ट्विटरनंतर त्यांचा मोर्चा कोका-कोलाकडे (Elon Musk To Buy Coca Cola) वळवला आहे. त्यांनी आज सकाळी कोका-कोला विकत घेण्याची घोषणा केली आहे.

आता मी कोका-कोला विकत घेणार आहे. कारण, त्यामध्ये मला कोकेन टाकता येईल, असं ट्विट एलॉन मस्क यांनी केलं आहे. Esha Griggs Candler यांनी 1892 मध्ये The Coca-Cola कंपनीची स्थापना केली. आता ही एक मोठी कंपनी म्हणून विकसित झाली आहे. या कंपनीचे सध्याचे सीईओ जेम्स क्विन्सी आहेत. तसेच कंपनीचे मुख्यालय यूएसमधील जॉर्जिया येथे आहे. आता एलॉन मस्क यांनी ही कंपनी विकत घेण्याची घोषणा केली आहे.

४४ अरब डॉलरमध्ये ट्विटरची खरेदी -

मस्क यांनी ट्विटरमधील ९.२ टक्के हिस्सा खरेदी केला होता. यामुळे ते या कंपनीचे सर्वांत मोठे भागधारक बनले होते. यानंतर मस्क ट्विटर पूर्णपणे खरेदी करणार असल्याची चर्चा सुरू झाली होती. ट्विटर खरेदी करण्याचा प्रस्ताव त्यांनी १४ एप्रिल रोजी दिला होता. अखेर ट्विटरच्या संचालक मंडळाने मस्क यांनी दिलेल्या ४४ अब्ज डॉलरच्या प्रस्तावाला मंजुरी दिल्यानंतर सोशल मीडियातील या सर्वांत मोठ्या कंपनीची मालकी जगातील सर्वांत धनाढ्य उद्योगपतीकडे आली आहे. याची घोषणा कंपनीने केली. कोणत्याही लोकशाहीत काम करण्यासाठी भाषण स्वातंत्र्य खूप महत्त्वाचे आहे. ट्विटर आणखी चांगल्या नवीन वैशिष्ट्यांसह विकसित करायचे आहे. तसेच ट्विटरवर लोकांचा अधिकाअधिक विश्वास कसा होईल यासाठी प्रयत्न करणार आहे. आता ट्विटर मेसेजसाठी देखील एंड टू एंड एन्क्रिप्शन लागू होणार आहे, असं मस्क म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tribal Students Protest : चर्चा फिस्कटल्याने आदिवासी विद्यार्थ्यांकडून आंदोलन तीव्र करण्याचा इशारा; नव्याने दोन अत्यवस्थ विद्यार्थी रुग्णालयात दाखल

Jalkot Water Supply : जळकोटचा पाणीप्रश्न सुटणार; ६२ कोटींच्या नवीन जलवाहिनी व नळयोजनेला नगरपंचायतीची मंजुरी

Ausa News : अभिजित दिपके यांच्यावर गुन्हा दाखल करणाऱ्या शिक्षिकेवरही गुन्हा दाखल करा; आरपीआय आठवले गटाची मागणी

Modi Cabinet Reshuffle : मोदींच्या मंत्रिमंडळात मोठा फेरबदल? महाराष्ट्राला मिळू शकते नवे मंत्रिपद; 'या' मंत्र्यांना डच्चू?

Operation All Out: ‘ऑपरेशन ऑल आऊट’चा धडाका : 12 तासांत 104 गुन्हे, 129 आरोपींवर कारवाई; 75.36 लाखांचा अवैध मुद्देमाल जप्त

SCROLL FOR NEXT