Elon musks tesla in India government rejects tesla tax breaks demand  Sakal
ग्लोबल

...अखेर एलॉन मस्क बनले Twitterचे मालक

एलॉन मस्क यांनी ४४ अब्ज डॉलर्सला ट्विटर खरेदी केलं होतं.

सकाळ डिजिटल टीम

ट्विटर आणि एलॉन मस्क यांच्याबद्दलच्या चर्चा गेल्या काही दिवसांपासून रंगत होत्या. एलॉन मस्क यांनी ४३ अब्ज डॉलर्स किंमतीला ट्विटर खेरदी करण्याचा प्रस्ताव ठेवला होता. यावरून बराच वादही झाला होता. पण काही दिवसांपूर्वीच ट्विटरने त्यांच्या या प्रस्तावाबद्दल विचार केला आणि अखेर ४४ अब्ज डॉलर्स किमतीला ट्विटर एलॉन मस्क यांचं झालं.

मस्क यांच्याशी वाटाघाटीच्या चर्चांदरम्यानच कंपनी आणखी चांगल्या प्रस्तावांच्या शोधात होती. पण अखेर एलॉन मस्क यांचाच प्रस्ताव स्विकारला गेला. बोलण्याचं स्वातंत्र्य मिळण्यासाठी कंपनीचं खासगीकरण होणं गरजेचं असल्याचं एलॉन मस्क यांचं म्हणणं होतं.

ट्विटरमध्ये ९ टक्के भागीदार असलेल्या एलॉन यांनी यासाठीच ट्विटर खरेदी करण्याचा प्रस्ताव ठेवला होता. कारण एवढ्या भागीदारीमुळे त्यांना आवश्यक ते बदल करता येणं शक्य नव्हतं. ट्विटर खरेदी केल्यानंतर आपल्या ट्विटमध्ये एलॉन मस्क म्हणाले की, लोकशाहीसाठी भाषण स्वातंत्र्य अतिशय महत्त्वाचं आहे. पण ट्विटर या तत्त्वांचं पालन करतं की नाही, याबद्दल खात्री नाही. आपण ट्विटरमध्ये अनेक नवे फीचर्स आणणार आहोत, तसंच अल्गोरिदम्स, बॉट्समध्येही बदल करणार आहे. ट्विटरमध्ये मोठी क्षमता आहे. मी या कंपनीसोबत काम करून युजर्सच्या समुदायाला याची क्षमता पूर्णपणे वापरता येईल याची खबरदारी घेईन.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT