Elon Musk_Perfume Burnt Hair 
ग्लोबल

Burnt Hair: इलॉन मस्क परफ्युम व्यवसायात! नाव अन् किंमत ऐकून नेटकरी म्हणाले, मेंटल...

नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया पाहून तुम्हालाही हसावं की रडावं असं होईल.

सकाळ डिजिटल टीम

नवी दिल्ली : जगातील सर्वाधिक श्रीमंत व्यक्ती आणि टेस्ला, स्पेसेक्स कंपनीचे संस्थापक इलॉन मस्क आता परफ्युम व्यवसायात उतरले आहेत. Burnt Hair नावाचा ब्रँड त्यांनी बाजारात आणला असून त्याची किंमती ८,४०० रुपये आहे. मस्क यांच्या परफ्युमचं नाव आणि किंमत ऐकून नेटकरी मात्र सैराट झाले आहेत. त्यांच्या प्रतिक्रिया पाहून तुम्हालाही हसावं की रडावं असं होईल. (Elon Musk launches new Burnt Hair perfume)

मस्क यांनी स्वतः आपल्या ट्विटरवरुन याची घोषणा केली असून त्यांनी आपल्या ट्विटरच्या बायोमध्ये बदल करत परफ्युम सेल्समन असं केलं आहे. तसेच आपल्या Burnt Hair नामक परफ्युम ब्रँडला पृथ्वीवरील सर्वात छान अत्तर असल्याची कॅप्शनही त्यानं दिलं आहे.

मस्क यांनी काय म्हटलंय?

मस्क यांनी याची सविस्तर माहिती देताना म्हटलं की, अत्तराचा व्यवसाय हा टाळता येणारा नाही, त्यामुळं मी इतके दिवस कसा दूर राहिलो? आमचा परफ्युम तुम्ही क्रिप्टो करन्सीद्वारे देखील विकत घेऊ शकता. तसेच डोगच्या स्वरुपात तुम्ही याचे पैसे देऊ शकता. या परफ्युमची किंमत १०० अमेरिकन डॉलर आहे. याच्या १०,००० बॉटलची यापूर्वीच विक्री देखील झाली आहे. यापूर्वी सप्टेंबर महिन्यात मस्क यांनी म्हटलं होतं की, बोअरिंग कंपनी लवकरच पुरुषांसाठी सेंट लॉन्च करणार आहे. हा सेंट त्यांना गर्दीतही उभं राहण्यास मदत करेल.

ट्विटर युजर्सच्या मजेशीर प्रतिक्रिया

दरम्यान, मस्क यांच्या या घोषणेनंतर ट्विटर युजर्सनं मोठ्या प्रमाणावर मजेशीर प्रतिक्रिया दिल्या आहेत. एकानं मस्कला फ्लेम थ्रोअर अर्थात आग लावणारा असं म्हटलं आहे. हा आग लावणार ५०० डॉलरमध्ये मिळेल, असंही त्यानं म्हटलंय. दुसरा म्हणतो, मस्कला नक्कीच आग लावणाऱ्यांकडून याची प्रेरणा मिळाली नसेल. तुमच्या या नव्या व्यवसायासाठी शुभेच्छा. तिसऱ्या एकानं म्हटलं की, मेंटल रॉकेट मॅननं मेंटल गोष्ट बनवलीए. इतिहास याची नोंद घेईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Politics: शिंदेसेनेचा राजकीय गाफीलपणा, चालकांचा जीव धोक्यात; पलावा पूल प्रकरण तापलं

Pune News : न्यायालयाने काय बांगड्या घातल्या आहेत का? म्हणत न्यायालयाचा अवमान

Latest Maharashtra News Updates : पारोळा तालुक्यात पावसाअभावी लघु प्रकल्पांचा घसा कोरडाच

Heavy Rain Alert: विदर्भासाठी अलर्ट! जोरदार पावसाचा इशारा; राज्यातल्या 'या' भागात मुसळधार बरसणार

Manish Kashyap : भाजपला सोडचिठ्ठी दिलेल्या प्रसिद्ध युट्यूबर मनीष कश्यपने सुरू केली नवी राजकीय इनिंग!

SCROLL FOR NEXT