Musk Vs Zuck Cage Fight eSakal
ग्लोबल

Musk Vs Zuck : 'तो या लढाईबाबत गंभीर नाही' मार्क झुकरबर्ग आणि इलॉन मस्कचा एकमेकांवर आरोप! आता पुढे काय होणार?

Elon Vs Mark Cage Fight : काही दिवसांपूर्वीच इलॉन मस्क या लढाईबद्दल सीरियस नसल्याचा आरोप मार्क झुकरबर्गने केला होता.

Sudesh

गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडिया जायंट मार्क झुकरबर्ग आणि टेक जायंट इलॉन मस्क यांच्यामधील लढाईची चर्चा सुरू आहे. इलॉन मस्कने एका ट्विटच्या माध्यमातून मार्कला खुलं चॅलेंज दिलं होतं, त्यानंतर मार्कनेही हे चॅलेंज स्वीकारून लढाईसाठी तयार असल्याचं म्हटलं होतं.

यानंतर या लढाईबाबत सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात चर्चा सुरू होती. मार्क आणि मस्क या दोघांनीही या लढाईसाठी तयारी सुरू केली असल्याच्या बातम्याही समोर येत होत्या. मात्र, या लढाईसाठी समोरची व्यक्ती गंभीर नसल्याचा आरोप या दोघांनीही एकमेकांवर केला आहे.

मार्कने केला होता आरोप

काही दिवसांपूर्वीच इलॉन मस्क या लढाईबद्दल सीरियस नसल्याचा आरोप मार्क झुकरबर्गने केला होता. "या लढाईबाबत आपण मस्कशी चर्चा केली, मात्र तो याबाबत आजिबात गंभीर नाही. त्यामुळे आता आपल्या सर्वांनाच हा विषय सोडून पुढं जावं लागेल." असं मार्कने एका थ्रेड्स पोस्टमध्ये म्हटलं होतं.

मार्क पुढे म्हणाला, "मी मस्कला एक तारीखही ऑफर केली होती. तर, डॅना व्हाईटने ही लढाई चॅरिटीसाठी आयोजित करण्याची ऑफर दिली होती. मात्र, मस्क तारीख ठरवायलाच तयार नाही. आधी तो म्हणाला त्याला सर्जरी करायची आहे, मग म्हणाला माझ्या घराच्या मागे आपण प्रॅक्टिस राऊंड करू."

मस्कचं प्रत्युत्तर

यावर इलॉन मस्कने प्रत्युत्तर देत एक 'एक्स' (ट्विटर) पोस्ट केली आहे. यामध्ये मस्कने आतापर्यंत या सगळ्यात काय घडलं हे सांगितलं आहे. तसंच, मार्क झुकरबर्ग या लढाईसाठी जागा फिक्स करत नसल्याचा आरोपही मस्कने केला आहे.

मस्कची पोस्ट

फाईट रिकॅप : मी 'एक्स' वर झुकरबर्गशी लढाईबद्दल जोक केला. त्यानंतर झुकरबर्ग म्हणाला, "मला लोकेशन पाठव". इटलीने या लढाईसाठी एक कोलोसिअममध्ये जागा ऑफर केली. मात्र, त्याला मार्कने मनाई केली. त्यानंतर मी त्याच्या घरीच लढाई करण्याची ऑफर दिली. मात्र, तो म्हणाला की मी प्रवासात आहे. अशी एखादी जागा आहे का जिथे तो खरंच लढाईसाठी तयार होईल?

यानंतर आता ही लढाई होणार की नाही याबाबत साशंकता निर्माण झाली आहे. इलॉन मस्कवर खरोखरच काही दिवसांमध्ये सर्जरी पार पडणार आहे. त्यामुळे त्यापूर्वी किंवा नंतर ही लढाई होईल; की आरोप-प्रत्यारोपांनंतर ही लढाई रद्दच होईल हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Elderly Woman Property Fraud: ‘ज्येष्ठ महिलेला न्यायासाठी वणवण फिरवू नका!’ ; मुंबई उच्च न्यायालयाकडून पोलिसांना तपासाचा आदेश

Government Job Fraud: सरकारी नोकरीचे आमिष दाखवून सुशिक्षित बेरोजगार तरुणाची २० लाखांची फसवणूक

''...तर मी जीव देईन'' २०१२ मध्ये निवडणुकीपूर्वी मनमोहन सिंग असं का म्हणाले होते? माजी निवडणूक आयुक्तांकडून धक्कादायक खुलासा

संस्कृतच्या विद्यार्थ्यांना दहावीनंतर होता येणार डॉक्टर! साडेसात वर्षांचा नवा अभ्यासक्रम, संस्कृत विद्यापीठाचा निर्णय

Maharashtra Saint Tradition: संत आणि वारीमुळेच महाराष्ट्राची अस्मिता टिकली; सकाळच्या व्याख्यानमालेत डॉ. सदानंद मोरे यांचे प्रतिपादन

SCROLL FOR NEXT