Elon Musk
Elon Musk  Sakal
ग्लोबल

क्या हुआ तेरा वादा...मंगळस्वारीवर नेटीझन्सचा Elon Musk ला सवाल

सकाळ डिजिटल टीम

एलॉन मस्क हा नेहमीच त्यांच्या भन्नाट कल्पनांमुळे नेहमीच चर्चेत असतो. त्याने मंगळावर माणूस पाठवणार अशी जगावेगळी कल्पनी मांडली होती. त्यांने एका मुलाखतीत ही कल्पना मांडली होती. हा इंटरव्ह्यू सध्या पुन्हा व्हायरल होतोय. एका ट्विटर यूजरने त्यांचं या वक्तव्याचा व्हीडीओ देखील ट्विटरवर शेयर केला. जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती असलेल्या एलॉन मस्कने २०११ मध्ये त्यांनी दहा वर्षानंतर आपण मंगळावर माणूस पाठवणार असल्याचं म्हंटलं होतं. आता या वक्तव्याला दहा वर्ष पूर्ण झाले असून, इंटरनेटवर चर्चा रंगल्या आहेत. (Elon Musk's Mars mission)

तुम्ही मंगळावर माणसाला पाठवणार होता त्याचं काय झालं. फक्त मंगळावर माणूसचं पाठवायचं नाहीतर तिथे वस्तीच तयार करण्याचीही त्यांची कल्पना होती. माणूस केवळ एकाच ग्रहावर नाही तर अनेक ग्रहांवर राहणारा माणूस बनावा असं त्याचं स्वप्न आहे. मात्र प्रत्यक्षात तसं काहीच झालेलं नाही. म्हणूनच नेटीझन्स विचारतायत क्या हुआ तेरा वादा ...

एलॉन मस्कच्या या मुलाखतीचा स्क्रिनशॉटसह असलेला ट्विटला नेटीझन्सनी प्रतिसाद देताना सांगितलेल्या तारखेपासून एक -दोन वर्ष इकडे -तिकडे चालतं, तर एका नेटीझन्सने कोरोना काळामुळे सगळ्यावरच परिणाम झाल्याचं म्हंटलंय, काहींनी या मोहीमेसाठी आपण देखील मदत करायला हवी असं मत मांडलंय. एकंदरितच एलॉन मस्कने जरी भन्नाट कल्पना मांडली आणि विसरले तरी नेटाझन्स मात्र विसरले नाहीत.

एलॉन मस्कच्या स्पेस एक्स (space -x) या कंपनीकडून मंगळयानाची निर्मिती प्रक्रियेत आहेच, पण याला २०२९ उजाडु शकतं असं त्यांनी म्हंटलं होतं. तर अमेरिकन संशोधन संस्था 'नासा' ने देखील २०३० पर्यंत अंतराळवीर मंगळावर पाठविण्याची महत्वाकांक्षी मोहीम आखलेली आहे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sharad Pawar: "अरे मामा जरा जपून... तुझं सर्व काढायला वेळ लागणार नाही"; इंदापुरात शरद पवारांचा इशारा!

Shreyas Talpade: कोरोना लसीमुळे हृदयविकाराचा झटका आला? श्रेयस तळपदे म्हणाला,'लस घेतल्यानंतर मला...'

IPL 2024 PBKS vs CSK Live Score : चाहरनं सीएसकेला पाडलं खिंडार, ऋतुराज पाठोपाठ दुबेलाही केलं बाद

Lok Sabha : 'एक भाकरी, एक रूपया द्या.. एका भिक्षुकाला पंतप्रधान करा' म्हणणाऱ्या विजयप्रकाश कोंडेकरांकडे किती आहे संपत्ती?

Latest Marathi News Live Update : राहुल गांधी यांनी वायनाडच्या लोकांशी केलेली फसवणूक - गौरव वल्लभ

SCROLL FOR NEXT