Elon Musk Sakal
ग्लोबल

Elon Musk : भारताच्या UNSCमधील स्थायी सदस्यत्वासाठी इलॉन मस्क यांची जोरदार बॅटिंग; उघडपणे केलं समर्थन

टेस्ला या कार कंपनीचे सीईओ इलॉन मस्क यांनी भारताच्या समर्थनात केलेली एक्स पोस्ट सध्या चांगलीच चर्चेत आली आहे.

रोहित कणसे

टेस्ला या कार कंपनीचे सीईओ इलॉन मस्क यांनी भारताच्या समर्थनात केलेली एक्स पोस्ट सध्या चांगलीच चर्चेत आली आहे. मस्क यांनी संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषद (UNSC) मध्ये असलेल्या सदस्य देशांबद्दल वक्तव्य केलं आहे, तसेच UNSC मध्ये भारताला कायम सदस्यत्व नसल्याचा मुद्दा देखील उपस्थित केला आहे.

काही दिवसांपूर्वी संयुक्त राष्ट्रांचे सरचिटणीस अँटोनियो गुट्रेस यांनी यूएनएससीमध्ये आफ्रिकी देशांच्या प्रतिनिधीत्व नसल्याबद्दल खेद व्यक्त केला होता. यावर टेस्लाचे सीईओ इलॉन मस्क यांनी प्रतिक्रिया दिली आहे. जगातील सर्वाधिक लोकसंख्या असलेला देश अजून देखील भारताला संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत (UNSC) मध्ये कायम सदस्यत्व नसणे हास्यास्पद आहे. तसेच त्यांनी UNSC आफ्रिकन देशांना देखील सदस्यत्व असावे असेही मस्क यांनी म्हटलं आहे.

एका टप्प्यावर संयुक्त राष्ट्रांच्या संस्थांमध्ये सुधारणा करणे आवश्यक आहे. अडचण ही आहे की ज्यांच्याकडे जास्त शक्ती आहे ते ती सोडू इच्छित नाहीत. भारत हा जगातील सर्वात जास्त लोकसंख्या असलेला देश असूनही सुरक्षा परिषदेत कायमस्वरूपी जागा नाही. हे हास्यास्पद आहे. आफ्रिकेसाठी कायमस्वरूपी सीट असावी, असे मस्क यांनी म्हटले आहे.

यापूर्वी भारताचे परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर प्रसाद यांनी UNSCमध्ये कायम स्थान मिळावं अशी मागणी करताना कधीकधी जगात काही गोष्टी सहज मिळत नाहीत, कधी-कधी त्या मिळवाव्या लागतात असे म्हटले होते.

संयुक्त राष्ट्रांचे सरचिटणीस अँटोनियो गुट्रेस यांनी UNSCमध्ये आफ्रिकन देशांना स्थान नसल्याचा मुद्दा उपस्थित करत दुखः व्यक्त केलं होतं. त्यांनी जगतीक संस्थांनी आजच्या परिस्थितीनुसार काम केलं पाहिजे. 80च्या दशकात बनवण्यात आलेल्या नियमांनुसार नव्हे. सप्टेंबरमध्ये सम्मेलनात जागतीक स्तरावर विचार केला जाईल आणि विश्वास पुन्हा स्थापन करण्याची ती एक संधी असेल असेही गुट्रेस म्हणाले होते.

दरम्यान त्यांच्या या पोस्टनंतर अमेरिकेतील मूळ इस्त्राइलचे उद्योगपती माइकर इसेनबर्ग यांनी तुमचं भारताबद्दल काय मत आहे असा सवाल उपस्थित केला होता. यूएनला विसर्जीत केलं पाहिजे आणि रियल लीडरशीपसोबत काहीतरी नवीन सुरू केलं पाहिजे असेही ते म्हणाले होते.

UNSC काय आहे?

सुरक्षा परिषद संयुक्त राष्ट्र परिषद ही संयुक्त राष्ट्रांची एक संस्था आहे जी आंतरराष्ट्रीय शांतता आणि सुरक्षा राखण्यासाठी काम करते. यात 15 सदस्य आहेत, ज्यामध्ये पास स्थायी आणि 10 अस्थायू सदस्य आहेत. स्थायी सदस्यामध्ये यूएस, युके, चीन, फ्रान्स आणि रशिया यांचा समावेश आहे, ज्यांना व्हेटो पॉवर आहे. तसेच 10 अस्थायी सदस्य दोन वर्षांसाठी निवडले जातात. भारताला UNSC मध्ये भारताला स्थायी सदस्यता देण्यासाठी अनेकवेळा प्रयत्न झाले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Made in India semiconductor chip: मोदींची मोठी घोषणा! '’वर्षअखेरीस पहिली ‘मेड इन इंडिया’ सेमीकंडक्टर चिप बाजारात येणार'’

Uddhav Thackeray : पाकशी क्रिकेटसाठी परवानगी का? पहलगामच्या वेळी भूतदया कुठे गेली होती

ST Bus: कोकणवासीयांचा प्रवास अधिक सुखद! १९५ एसटी बस पनवेलमध्ये दाखल

Ganeshotsav: गणेशोत्सवनिमित्त हायवेवरील हॉटेल-ढाबा चालकांना पोलीस प्रशासनाच्या सूचना

MP Supriya Sule : ‘मी मटण खाल्लेले पांडुरंगाला चालते’

SCROLL FOR NEXT