Amber heard vs johnny Depp sakal
ग्लोबल

Amber vs Depp : एलॉन मस्क ते लेस्बियन पार्टनर; एम्बरचे आजवरचे हाय प्रोफाइल रिलेशनशिप

एम्बर हर्डला जॉनी डेपला नुकसान भरपाई म्हणून द्यावे लागणार तब्बल ११६ कोटी रुपये

सकाळ ऑनलाईन

गेल्या कित्येक दिवसांपासून एम्बर हर्ड आणि जॉनी डेप यांचा वाद चर्चित आहे. जॉनी मला दारू पिऊन मारहाण करायचा असा दावा एम्बरने एका लेखात केला होता. याविरुद्ध जॉनी डेपने आपली पूर्वाश्रमीची पत्नी एम्बर हर्ड विरोधात मानहानीचा खटला दाखल केला होता. ज्याचा निकाल जॉनी डेपच्या बाजूने लागला आहे. सात न्यायाधीशांच्या खंडपीठाने दिलेल्याा निकालानंतर एम्बर हर्डला जॉनी डेपला नुकसान भरपाई म्हणून तब्बल ११६ कोटी रुपये द्यावे लागणार आहेत.

आता तस पाहिलं तर एम्बर हर्ड आणि जॉनी डेप या दोघांचे सुद्धा हाय प्रोफाइल रिलेशनशिप राहिले आहेत. अनेक फेमस चेहऱ्यांसोबत या दोघांचीही नाव जोडली गेली. त्यात एम्बर हार्ड कायमच लाइमलाईटमध्ये पाहायला मिळाली. अशातच एम्बरचे काही हाय प्रोफाइल रिलेशनशिप आपण बघूया.

व्हॅलेंटिनो लॅनस माहितीनुसार,एम्बर हर्ड आणि व्हॅलेंटिनो लॅनस २००५ आणि २००६ दरम्यान रिलेशनशिपमध्ये होते. लॅनस हा एक मेक्सिकन अभिनेता आहे, १९९७ मध्ये त्याने टेलीनोव्हेला मारिया इसाबेलमध्ये अँटोनियो म्हणून टेलिव्हिजन इंडस्ट्रीत डेब्यू केला होता. मनोरंजन क्षेत्रात येण्याआधी त्याने मॉडेल म्हणून आपल्या करियरची सुरुवात केली.एम्बर आणि लॅनसची मैत्री त्यांच्या एका म्युच्युअल मित्रांच्यामदतीने झाली होती.
ताय्सा व्हॅन री २००८ मध्ये, हर्डने फोटोग्राफर तस्या व्हॅन री हिच्याशी डेटिंग करण्यास सुरुवात केली. एवढंच नाही तर रिलेशनशिपमध्ये असताना तिचे नाव बदलून व्हॅन री असं ठेवलं होत. व्हॅन री सेलिब्रिटींच्या ब्लॅक अँड व्हाईट फोटोंसाठी, तसेच फॅशन फोटोग्राफीमधील तिच्या कामासाठी ओळखली जाते. या दोघीनी लग्न केल्याचं सुद्धा म्हणतात जात होत, मात्र २०२१ मध्ये त्या दोघी वेगळ्या झाल्या.
जॉनी डेप २००९ मध्ये द रम डायरीजच्या सेटवर भेटल्यानंतर डेप आणि हर्ड यांच्यात डेटिंगच्या अफवा सुरू झाल्या होत्या. त्यावेळी डेप व्हेनेसा पॅराडिससोबत रिलेशनशिपमध्ये होता. मात्र २०११ ला ते दोघे वेगळे झाले, ज्यांनंतर २०१२ च्या सुरूवातीस डेप आणि हर्ड यांनी डेटिंग करण्यास सुरुवात केली. २०१५ मध्ये, डेप आणि हर्डने लॉस एंजेलिसमधील त्यांच्या घरात एका खाजगी समारंभात लग्न केले.पण हळू- हळू दोघांमध्ये वाद व्हायला सुरुवात झाली.आणि वर्षातच म्हणजे २०१६ मध्ये हर्डने घटस्फोटासाठी अर्ज केला होता. हर्डने आरोप केला की, २१ मे रोजी वाद दरम्यान डेपने तिचा फोन तिच्यावर फेकला जो तिच्या चेहऱ्याला लागला आणि तिच्या चेहऱ्यावर जखम झाली. ज्यानंतर २०१७ मध्ये डेप आणि हर्ड वेगळे झाले.
एलन मस्क हर्डने डेपशी घटस्फोटाची केस सुरु असतानाच २०१६ मध्ये जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती इलॉन मस्कशी डेटिंग सुरू केली. पण दोघंही ते अधिकृतरीत्या मान्य करत नव्हते. पण जेव्हा एलन मस्कने तलुलाह रिलेपासून घटस्फोट घेतला तेव्हा दोघांनी आपलं रिलेशनशिप असल्याचं मान्य केलं. पण पाच महिन्यातच हे दोघे वेगळे झाले.
विटो श्नाबेल अब्जाधीश मस्कपासून वेगळं झाल्यानंतर तीन महिन्यांनी हर्डने व्हिटो श्नाबेलला डेट करण्यास सुरुवात केली. व्हिटो श्नाबेल व्हिटो श्नाबेल गॅलरीचा संस्थापक आहे. २ वर्ष हे दोघे एकमेकांना देत करत होते, पण २०१९ मध्ये लॉन्ग डिस्टन्समुळे या दोघांमध्ये वाद झाल्याचं समजत, ज्यांनंतर त्यांनी वेगळे होण्याचा निर्णय घेतला.
आंद्रेस मुशिएटी २०१९ च्या मे महिन्यात हर्डने अर्जेंटिनाचे चित्रपट निर्माते आंद्रेस मुशिएटी यांना डेट केले. हर्ड आणि आंद्रेस यांनी आपलं नातं सिक्रेट ठेवण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे त्यांच्या नात्याबद्दल कोणाला फारशी माहिती नव्हती, परंतु २०१९ च्या शेवटी हे दोघे वेगळे झाल्याचे समजते.
बियान्का बुट्टी पाम स्प्रिंग्समध्ये किस घेतानाचा फोटो व्हायरल झाल्यानंतर हर्डने २०२० मध्ये सिनेमॅटोग्राफर बियान्का बुट्टीशी तिचे नाते मान्य केले. मेजर ऑफ रिव्हेंज, अॅन अमेरिकन इन टेक्सास आणि ग्राफ्टन यांसारख्या चित्रपटांवरील कामासाठी बुट्टी फेमस आहे. या दोघींच्या रिओलेशनशिप दरम्यान हर्डने जाहीर केले की, ती सरोगेसीच्या मदतीने आई झाली आहे. पंगेल्या वर्षी या दोघी वेगळ्या झाल्या. लॉन्ग डिस्टन्समुळे या दोघी वेगळं झाल्याचं समजतंय.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shaktipeeth Highway : नागपूर-गोवा शक्तिपीठ महामार्गाला बांदावासियांचा तीव्र विरोध! 214 एकर जमीन बाधित होणार, ग्रामसभेत एकमुखी ठराव मंजूर

Sparrow Chick Rescue : घरट्यातून पिल्लू खाली पडलं अन्...; चिमणीची लेकरासाठी जीवाचा आकांत करणारी धडपड पाहून उपस्थितांचे डोळे पाणावले, हॉस्पिटलबाहेरील 'तो' प्रसंग नक्की काय?

Vastu Shastra: झाडू ठेवण्याचीही असते योग्य दिशा? वास्तुशास्त्रातील ‘हा’ नियम जाणून घ्या

Latest Marathi News Live Update : चाकणच्या सर्वांगीण विकासासाठी विविध यंत्रणांनी समन्वयाने काम करावे- सुनेत्रा पवार

Raksha Bandhan 2026: पीरियड्समध्ये भावाला राखी बांधता येते का? जाणून घ्या सत्य काय अन् परंपरा काय

SCROLL FOR NEXT