Elon Musk  sakal
ग्लोबल

एलॉन मस्क भरणार ८३ हजार कोटींचा कर

जगातील सर्वाधिक रक्कम भरणारे करदाते ठरणार

सकाळ वृत्तसेवा

न्यूयॉर्क : टेस्ला या इलेक्ट्रिक मोटार (Tesla electric motor company)उत्‍पादक कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी एलॉन मस्क (Elon Musk)हे या वर्षी ११ अब्ज डॉलर (सुमारे ८३ हजार ६९० कोटी रुपये) कर भरणार आहेत. ही माहिती त्यांनी रविवारी (ता. १९) ट्विटरवर दिली. यानुसार ते जगातील सर्वाधिक कर भरणारे करदाते ठरतील. मस्क यांना टाइम मासिकाने‘पर्सन ऑफ द इयर’ (Person of the Year)म्हणून गौरव केल्यानंतर अमेरिकेतील डेमॉक्रॅटिक पक्षाचे प्रतिनिधी एलिझाबेथ वॉरेन यांनी गेल्या आठवड्यात मस्क यांनी कर भरावा आणि त्यातून सूट मिळण्याची अपेक्षा करू नये,’ असे ट्विटद्वारे सुनावले होते.

याला उत्तर देताना मस्क यांनी ‘इतिहासात एकाही अमेरिकी व्यक्तीने भरला नसेल एवढा कर यंदा मी भरणार आहे, असे स्पष्ट केले. एलॉन मस्क हे जगातील सर्वांत धनाढ्य व्यक्ती आहे. आणि त्यांच्या कंपनीची मालमत्ता एक हजार अब्ज डॉलर (सुमारे ७६ लाख २ हजार १६० कोटी रुपये) एवढी आहे. गेल्या काही आठवड्यांत त्यांनी ‘टेस्ला’चे १४ अब्ज डॉलर (सुमारे एक लाख ६ हजार ३४२ कोटी रुपये) किमतीचे शेअर विकले आहेत.

मस्क यांची कर रक्कम ही ‘यूएस इंटरनॅशनल रेव्हेन्यू सर्व्हिस’मधील उच्चांकी रक्कम असेल. एवढा प्रचंड करभरणा एकाही अमेरिकी नागरिकाने केलेला नाही. ‘ब्लूमबर्ग’नुसार २०२१मध्ये अब्जाधीश एलॉन मस्क यांना दहा अब्ज डॉलरपेक्षा जास्त कर चुकवावा लागणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Yashasvi Jaiswal : अंगावर धावणे महागात पडले, ICCची यशस्वी जैस्वालवर कारवाई! ५ सामन्यांची बंदी की आणखी काही? नेमका काय निर्णय घेतला...

ती गोष्ट घडली आणि लता मंगेशकर यांनी रागात थेट CID च्या निर्मात्यांनाच केलेला फोन केला, इन्स्पेक्टर दयाने सांगितला किस्सा

Nigdi Chakan Metro : भोसरीतील उड्डाणपूल पाडण्यावरून राजकीय मौन; निगडी-चाकण मेट्रो ‘डीपीआर’ला मंजुरीची प्रतीक्षा

Marathi News Live Updates : अमरावतीतील नवजात बालकांच्या मृत्यू प्रकरणात आरोग्य सचिवांच्या नेतृत्वात समिती नेमणार : आरोग्यमंत्री आबिटकर

Bank Strike: सलग 5 दिवस बँका बंद? सप्टेंबरमध्ये पुन्हा संप; पाहा ताजी अपडेट

SCROLL FOR NEXT