Elon Musk  esakal
ग्लोबल

Elon Musk: ट्विटर खरेदी करायचं, प्लिज माझा परफ्यूम विकत घ्या; मस्क यांचं अजब आवाहन

सकाळ डिजिटल टीम

नवी दिल्ली - टेस्लाचे सीईओ एलोन मस्क यांनी ट्विटरला प्रति शेअर $ 54.20 मध्ये खरेदी करण्याची नवी ऑफर दिली आहे. 44 अब्ज डॉलरचा अधिग्रहण करार समाप्त करण्यापूर्वी मस्क यांनी एप्रिलमध्ये प्रस्तावित केलेली हीच किंमत आहे. ही डील सुरुवातीपासूनच चर्चेत होती. आता या डीलसाठी पैसे उभे करण्यासाठी मस्क यांनी अवलंबलेली पद्धत चर्चेत आली आहे.

इलॉन मस्क यांनी ट्विटर म्हटलं की, हा करार पूर्ण करण्यासाठी त्यांना परफ्यूम विकावे लागेल. एवढेच नाही तर आपल्या फॉलोवर्सला परफ्यूम विकत घेण्याचे आवाहनही मस्क यांनी केले आहे.

इलॉन मस्क यांनी आपल्या फॉलोवर्सला चेष्टेने सांगितलं असलं तरी त्यांच्या समर्थकांनी मस्क यांचं आवाहन गांभीर्याने घेतलं आहे. मस्क यांच्या चाहत्यांनी ब्रंट हेअर परफ्यूम मोठ्या प्रमाणात खरेदी करण्यास सुरुवात केली आहे. मास्क यांनी ट्विटरवर लिहिले, कृपया माझे परफ्यूम खरेदी करा जेणेकरून मी ट्विटर खरेदी करू शकेन." त्यांच्या या ट्विटला उदंड प्रतिसाद मिळाला आहे.

बिझनेस टुडेच्या रिपोर्टनुसार, इलन मस्कच्या ट्विटनंतर ब्रंट हेअर परफ्यूमची विक्री वाढली आहे. हे लक्षात घेऊन ट्विटरवर मस्कने त्यांचे बायो बदलून ‘परफ्यूम सेल्समन’ केले आङे. ब्रंट हेअर परफ्यूमच्या बाटलीची किंमत 8,400 रुपये आहे. हे द बोरिंग कंपनीच्या वेबसाइटवरून ऑनलाइन खरेदी केले जाऊ शकते. हा परफ्यूम क्रिप्टोकरन्सी डॉज कॉईन भरूनही खरेदी करता येईल, असे मस्क यांनी स्पष्ट केले. भारतीय ग्राहकांना ते Google Pay द्वारे खरेदी करण्याचा पर्याय देण्यात आला आहे.

मस्क यांनी परफ्यूम खऱेदी करण्याचे आवाहन केल्यानंतर जगभरात परफ्यूमच्या २० हजार बाटल्या विकल्या गेल्या आहेत. याची एकूण किंमत 8,22,72,499 रुपये आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Artemis 2 mission: ऐतिहासिक क्षण! ५० वर्षांनंतर मानव पुन्हा चंद्राकडे; मानवाच्या इतिहासातील सर्वात दूरचा अंतराळ प्रवास

Divyang Students: राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय! दिव्यांग विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीत भरीव वाढ; अभ्यास दौऱ्यासाठी मिळणार अर्थसाह्य..

Latest Marathi News Live Update : हनुमान जयंतीनिमित्त नाशिकच्या अंजनेरीत भाविकांची दर्शनासाठी मोठी गर्दी

Chhatrapati Sambhajinagar: अजिंठा घाटात ट्रक अपघात, वाहतूक सुमारे एक तास ठप्प; पंढरपूर-जळगाव ट्रकचा ब्रेक फेल; समोरील ट्रकला धडक

US Iran Conflict End : ट्रम्प यांचे मोठे वक्तव्य! इराण युद्ध संपण्याच्या उंबरठ्यावर, इस्रायल, यूएई, सौदीचे मानले आभार

SCROLL FOR NEXT