emmanuel macron greets angela merkel namaste
emmanuel macron greets angela merkel namaste 
ग्लोबल

Covid19 Impact : मॅक्रॉन-मार्केल यांचे एकमेकांना ‘नमस्ते’

सकाळ डिजिटल टीम

नवी दिल्ली : भविष्यात 2020 वर्ष इतिहासातील सर्वांत भयंकर वर्ष म्हणून गणलं जाईल यात काहीच शंका नाही. कोरोनाने सध्या संपूर्ण जग आपल्या कवेत घेतलं आहे. काही मोजके देश सोडले तर, आज कोरोना महामारी प्रत्येक देशात हाहाकार माजवत आहे. कोरोना हा संसर्गजन्य असल्याने तो आटोक्यात येत नाहीये. यामूळे 'बाहेर पडताना मास्क घालावा तसेच, सोशल डिस्टंस पाळावे आणि गरज असेल तरच बाहेर पडावे' अशा सुचना आपण दररोज कुठेतरी ऐकत असतो. पण, आता या सूचनांकडे बरेच जण कानाडोळा करताना दिसत आहेत. त्यामूळे जगभरात रोज कोरोनाचे नवीन लाखो रुग्ण आढळत आहेत. हा व्हायरस संसर्गाने पसरत असल्याने सामान्य लोकांसह मोठे जागतिक नेतेही सोशल डिस्टंस पाळत आहेत. त्याचाच परिणाम सोशल डिस्टंस पाळण्यासाठी भारतातील हात जोडून 'नमस्ते' करणे ही पारंपरिक पध्दत खूप प्रसिध्द होत आहे.

फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉनही (Emmanuel Macron) भारताच्या या हात जोडून नमस्ते घालण्यच्या पध्दतीने चांगलेच प्रभावित झाले आहेत. कारण काल इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी जर्मनीच्या चॅंसलर अँजेला मर्केलचे (Angela Merkel)  स्वागत करताना पारंपारिक भारतीय पध्दतीने "नमस्ते" म्हणत मध्ये हात जोडले. यास अँजेला मर्केल यांनीही हात जोडून नमस्ते करुन प्रतिसाद दिला.  काल फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन आणि जर्मनीच्या चॅंसलर अँजेला मर्केल यांची  दक्षिण फ्रान्समधील भूमध्य सागराजवळ असणाऱ्या सुट्टी  ब्रेगनकॉनचा किल्ल्यावर भेट झाली. यावेळेस राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्या पत्नीनीही उपस्थित होत्या, त्यांनीही अँजेला मर्केल यांना हात जोडून नमस्ते म्हणत, अभिवादन केले.

कोरोना महामारीच्या जगभर पसरत असताना या दोन नेत्यांनी नमस्ते म्हणत केलेले अभिवादनचा व्हिडिओ जगभर चांगलाच प्रसिध्द होत आहे. या दोन जागतिक मोठ्या नेत्यांची भेट फ्रेंच राष्ट्रपतींच्या उन्हाळ्याच्या निवासस्थानी झाली. हे दोन्ही नेते सर्व जगभर पसरत असलेल्या कोरोना महामारीबद्दल, सध्याची बेलारूसमधील (Belarus ) अशांतता आणि तुर्कीबरोबरचा वाढणारा तणाव (tensions with Turkey) या विषयांवर चर्चा करण्यासाठी भेटले होते. यापूर्वी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (US President Donald Trump) आणि इस्त्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू (Benjamin Netanyahu) यांनीही कोरोनाचे संक्रमण होऊ नये यासाठी हॅंड शेक ऐवजी हात जोडून नमस्ते केले होते. तसेच त्यांनी सोशल डिस्टंस पाळण्यासाठी आव्हानही हॅंड शेक ऐवजी हात जोडून नमस्ते करण्याचे आवाहनही केले होते.

इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू भारतीय शैलीतील नमस्ते म्हणत अभिवादनास मान्यता देणारे पहिले जागतिक नेते होते. "तुम्ही नमस्ते करण्याची भारतीय पध्दत वापरू शकता किंवा हात जोडून 'शॅलोम' सारखा दुसरा शब्द बोलू शकता," असे श्री. नेतन्याहू काही दिवसांपुर्वी म्हणाले होते. याअगोदर मार्चमध्ये डोनाल्ड ट्रम्प आयरिश पंतप्रधान लिओ वराडकर (Leo Varadkar) यांना भेटल्यावर त्यांनी देखील हीच पध्दत वापरली होती.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 LSG vs RR : केएल शेर तर संजू सवा शेर! राजस्थानचा एक पाय प्ले ऑफमध्ये

DC vs MI : गोलंदाजीतली 'गळती' मुंबईच्या मुळावर; बॅटिंगमध्ये फर्स्ट क्लास तर बॉलिंगमध्ये नापास

Jolly LLB 3 : आता रंगणार जॉली विरुद्ध जॉली केस; सिनेमाच्या शूटिंगबाबत महत्त्वाची अपडेट आली समोर

Google वर जाहिराती करण्यासाठी भाजपने खर्च केले 100 कोटी; BJP पहिल्या स्थानावर तर काँग्रेस कितव्या स्थानावर? वाचा सविस्तर...

CM Yogi Aadityanath : ''काशी अन् अयोध्येनंतर आता मथुरेकडे प्रस्थान...'' योगी आदित्यनाथांचे स्पष्ट संकेत

SCROLL FOR NEXT