ग्लोबल

भावनिक स्थिरता, कर्तव्यनिष्ठा करिअरला फायदेशीर; अमेरिकेतील ह्युस्टन विदयापीठाचे संशोधन

पीटीआय

ह्युस्टन - कोणत्याही क्षेत्रात करिअर करण्यासाठी किशोरवयीन किंवा तारुण्याचा काळ सर्वाधिक महत्त्वाचा समजला जातो. किशोरवयीन किंवा युवावस्थेतील विविध बदलांतून व्यक्तिमत्व विकासाला चालना मिळते. ते करिअरमधील प्रगतीसाठी फायद्याचे ठरतात, असे एका नव्या संशोधनात आढळले आहे. अमेरिकेतील ह्युस्टन विदयापीठाने हे संशोधन केले असून त्याचे निष्कर्ष ‘सायकॉलॉजिकल सायन्स’ मध्ये प्रकाशित झाले आहेत. 

देशभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

सुमारे १२ वर्षांच्या प्रदीर्घ संशोधनातून हा निष्कर्ष काढण्यात आला आहे. युवावस्थेतील व्यक्तिमत्व विकासाच्या करिअरमधील फायद्यांवर या संशोधनात लक्ष्य केंद्रित केले आहे. शिक्षण संपवून नोकरीला लागण्याच्या काळात कर्तव्यनिष्ठा, भावनिक स्थिरता अधिक असणाऱ्या व्यक्ती करिअरच्या सुरवातीच्या टप्प्यात काही गोष्टींत अधिक यश मिळवितात, असा दावा या संशोधनात केला आहे.   

जगभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

ह्युस्टन विद्यापीठातील प्रा. केविन होफ यांच्या नेतृत्वाखालील गटाने हे संशोधन केले. या गटाने आईसलॅंडमधील काही तरुणांचा १७ ते २९ वर्षाच्या काळात प्रातिनिधिक स्वरूपात अभ्यास केला. यापैकी व्यक्तिमत्वात काही घटक विकसित झालेल्या तरुणांनी इतरांपेक्षा अधिक यश मिळविले. कर्तव्यनिष्ठा, भावनिक स्थिरता, बहिर्मुखता असणारे तरुण करिअरच्या सुरवातीच्या टप्प्यात अधिक यशस्वी ठरले. होफ म्हणाले, की पौगंडावस्थेतील व्यक्तिमत्व विकासाच्या काही ठाराविक पॅटर्नमधून करिअरमधील प्रगतीबद्दल अंदाज वर्तविता येऊ शकतो. पौगंडावस्थेपासून जवळपास एक दशकापर्यंतच्या काळापर्यंत करिअरच्या व्यापक श्रेणीतील परिणामांबाबतचा व्यक्तिमत्व विकासाचा अंदाज वर्तविणारे हे पहिलेच संशोधन आहे. विशेष म्हणजे, आपल्या व्यक्तिमत्वाबाबत समाधानी नसणाऱ्या व त्यासंदर्भात अडचणी अनुभवणाऱ्या किशोरवयीन मुलामुलींसाठीही या संशोधनाने चांगली बातमी दिली आहे. त्यांनी सकारात्मक पध्द्‌तीने काळानुसार व्यक्तिमत्वातील घटक बदलल्यास त्याचा त्यांच्या करिअरवर मोठा परिणाम होऊ शकतो.

भावनिक स्थिरतेचा उत्पनाशीही संबंध
कर्तव्यनिष्ठा,भावनिक स्थिरतेचा करिअरमधील समाधानाबरोबरच उत्पन्नाशी जवळचा संबंध असल्याचेही संशोधकांना आढळले. त्यामुळे, संशोधकांनी उज्ज्वल करिअरसाठी व्यक्तिमत्वात हे पैलू अंतर्भूत करण्याची गरज व्यक्त केली आहे.

किशोरवयातील विविध पैलूंमुळे करिअरमधील यशाबद्दल अंदाज बांधता येतो. व्यक्तीमत्वातील दीर्घकालिन भविष्य वर्तविता येणारी शक्तीही यातून अधोरेखित होते. एकूणच, या संशोधनाने बालपण तसेच पौगंडावस्थेपासूनच्या व्यक्तिमत्व विकासाचे महत्व समोर आणले आहे. 
- प्रा. केविन होफ, संशोधक, ह्युस्टन विद्यापीठ, अमेरिका 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tarachand Agarwal CA Final: मानलं बॉस...! ७१व्या वर्षी पास करून दाखवली कठीण 'CA' परीक्षा अन् स्वप्न पूर्ण केलंच

ENG-U19 vs IND-U19: भारतीय कर्णधाराचे इंग्लंडमध्ये दमदार शतक; १४ चौकार अन् २ षटकारांसह इंग्लंडच्या गोलंदाजांना रडवले

माेठी बातमी! 'जुन्या थकीत कर्जदारांना दिलासा नाही'; जिल्हा बँकेचा शासनाकडे प्रस्ताव, माेठे अपडेट आले समाेर..

Rishabh Pant record: धडाकेबाज रिषभ पंतने लॉर्ड्सवर रचला इतिहास!, सर विव रिचर्ड्स यांचा 'हा' विक्रम मोडला

Latest Marathi News Updates : पुण्यात काँग्रेसला मोठा धक्का; माजी आमदार संजय जगताप यांनी काँग्रेस पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा दिला राजीनामा

SCROLL FOR NEXT