England will be first country to access seven minute cancer treatment jab know details  
ग्लोबल

Cancer Treatment : अवघ्या ७ मिनीटात दिलं जाणार कॅन्सरचं इंजेक्शन! ब्रिटन ठरणार जगातील पहिला देश

रोहित कणसे

कॅन्सर रुग्णांसाठी मोठी बातमी समोर आली आहे. ब्रिटन हा जगातील पहिला असा देश बनला आहे जो सात मिनिटांत कॅन्सर रुग्णांना इंजेक्शन देईल. ब्रिटनची राष्ट्रीय आरोग्य सेवा (एनएचएस) ही जगातील पहिली अशी सेवा ठरणार आहे, जी देशातील शेकडो कॅन्सर रुग्णांवर अल्पावधीत एकाच इंजेक्शनद्वारे उपचार करू शकते आणि उपचारांचा कालावधी तीन चतुर्थांशपर्यंत कमी करू शकते.

ब्रिटिश मेडिसिन अँड हेल्थकेअर प्रॉडक्ट्स रेग्युलेटरी एजन्सी (एमएचआरए) कडून मान्यता मिळाल्यानंतर एनएचएसने मंगळवारी माहिती दिली की, इम्युनोथेरपीद्वारे उपचार घेत असलेल्या शेकडो कर्करोगाच्या रूग्णांना आता त्वचेखाली अॅटेझोलिझुमॅबचे इंजेक्शन देण्याची तयारीत आहे. यामुळे कर्करोगाच्या उपचारासाठीचा वेळ कमी लागणार आहे.

एनएचएसने दिलेल्या माहितीनुसार, अॅटेझोलिझुमॅब, ज्याला टेकेंट्रिक म्हणून देखील ओळखले जाते, साधारणपणे हे रुग्णांना ड्रिप द्वारे थेट त्यांच्या नसांमध्ये दिले जाते. या प्रक्रियेस काही रूग्णांसाठी सुमारे 30 मिनिटे किंवा एक तासापर्यंत वेळ लागतो. रुग्णांच्या नसा सापडत नसल्यास अनेक रुग्णांमध्ये हा वेळही जास्त लागतो, परंतु आता नव्या पद्धतीमुळे हे औषध यापुढे नसांमध्ये न देता त्वचेखाली इंजेक्शन दिले जाणार आहे. अशी कामगिरी करणारा इंग्लंड हा पहिला देश असेल. टेकेंट्रिक एक मोनोक्लोनल अँटीबॉडी आहे जी कर्करोगाच्या रूग्णांच्या शरीराच्या रोगप्रतिकारक शक्तीच्या कामावर परिणाम करते.

रॉयटर्सने दिलेल्या रिपोर्टनुसार, वेस्ट सफोल्क एनएचएस फाऊंडेशन ट्रस्टचे सल्लागार ऑन्कोलॉजिस्ट डॉ. अलेक्झांडर मार्टिन म्हणाले की,या मंजुरीमुळे आम्हाला आमच्या रूग्णांची सोयीस्कर आणि जलद काळजी घेणे शक्य होईल, तसेच आमच्या टीम्सना दिवसभरात अधिक रुग्णांवर उपचार करणे शक्य होईल. तसेच रोश प्रॉडक्ट्स लिमिटेडचे वैद्यकीय संचालक मारियस शुल्ट्झ यांनी यासाठी सुमारे सात मिनिटे लागतात, तर सध्याच्या ड्रिप पद्धतीसाठी 30 ते 60 मिनिटे लागतात अशी माहिती दिली आहे.

अॅटेझोलिझुमॅब हे रोश कंपनीचे हे एक इम्यूनोथेरपी औषध आहे जे कर्करोगाच्या पेशी शोधण्यासाठी आणि नष्ट करण्यासाठी रुग्णांच्या रोगप्रतिकारक शक्तीस सक्षम करते. याचा उपयोग करून सध्या फुफ्फुस, स्तन, यकृत आणि मूत्राशयाच्या कर्करोगासह विविध प्रकारच्या कर्करोगाने ग्रस्त रुग्णांवर उपचार केले जातात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Police Department : गुन्हेगारी कमी कशी व्हायची? मोक्का रद्द करतो, गुन्हेगारांच्या टोळीकडे पोलिसानेच मागितले ६५ लाख; सहाय्यक फौजदार निलंबित

दुर्मीळ घटना! नवजात बाळाच्या पोटात आढळला दुसरा गर्भ; भारतात नोंदवलेला पहिलाच प्रकार, काय म्हणाले डॉक्टर?

Latest Marathi News Live Update : चंद्रकांत पाटलांना जाब विचारणार, घायवळ प्रकरणावरून रवींद्र धंगेकर आक्रमक

Solapur News: 'मूर्तिकारांच्या अतिक्रमित २० झोपड्या जमीनदोस्त'; महापालिका अतिक्रमण प्रतिबंधक, मंडई विभागाची संयुक्त कारवाई

Pune News : बळकावलेल्या जमिनींपासून बंदूकीच्या गोळ्यांपर्यंत! पुणे पोलिसांनी निलेश घायवळभोवती आवळला फास, घरावर छापेमारी, हाती लागलं मोठं घबाड

SCROLL FOR NEXT