Europe News esakal
ग्लोबल

Europe News: युरोपियन खासदाराने का कापले केस?

इराणमध्ये नेमकं घडलं काय?

सकाळ डिजिटल टीम

बेल्जियमः इराणमध्ये सुरु असलेल्या अत्याचारामुळे एका महिला युरोपियन खासदाराने भर सभेत केस कापल्याची घटना घडली आहे. इराणमध्ये सुरु असलेले अत्याचार थांबवण्याची मागणी होत आहे.

स्ट्रासबर्ग येथे भर सभेत स्वीडिश लोकप्रतिनिधी अबीर अल सहलानी यांनी निषेध व्यक्त केला. चर्चेदरम्यानच त्यांनी आपले केस कापले. महिलांवरील अत्याचार थांबले पाहिजेत, अशी मागणी त्यांनी यावेळी केली.

जोपर्यंत इराणच्या स्त्रीया मुक्त होत नाहीत, तोपर्यंत हा लढा सुरु राहिल, अशी भूमिका अल सहलानी यांनी मांडली.

'इराण ह्युमन राईट्स'च्या म्हणण्यानुसार महसा अमिनीच्या मृत्यूच्या निषेधार्थ झालेल्या आंदोलनांमध्ये शंभरहून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. याचाच निषेध अबीर अल सहलानी यांनी केलाय.

मागील काही दिवसांपासून अमिनीच्या मृत्यूच्या निषेधार्थ इराणमध्ये शाळकरी मुली आणि महिला रॅली काढून निषेध नोंदवत आहेत. शिवाय सरकारविरोधात घोषणाबाजी करत अनेक महिलांनी केस कापले आहेत. याच आंदोलनाचं प्रतिनिधीत्व अबीर अल सहलानी यांनी केलं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे होणार MPSCच्या चौकशी आयोगाचे नवे सचिव, शिवेंद्र राजेंची मोठी घोषणा

IND vs WI, 3rd T20I: अभिषेकच्या वादळानंतर अर्शदीपचा अचूक मारा अन् भारताचा वेस्ट इंडिजवर थरारक विजय; मालिकेतही आघाडी

सूर्यदेव तूळ राशीत प्रवेश करताच १२ राशींचं नशिब बदलणार? करिअर, पैसा अन् नात्यांवर कसा होणार परिणाम?

IND vs WI: तिलक वर्माचा ब्रेनफेड मुमेंट... चौकार झाला असं वाटलं अन् झाला विचित्रपद्धतीने रन आऊट; पाहा Video

Latest Marathi News Live Update : महाराष्ट्रापासून दिल्लीपर्यंत आज दिवसभरात काय घडलं? एका क्लिकवर पहा सर्व महत्त्वाचे अपडेट्स

SCROLL FOR NEXT