Medicine will be more expensive  sakal
ग्लोबल

भारतीयांनो, 'आजीबाईचा बटवा' परदेशी नेताय? ही काळजी घ्या, नाहीतर...

अमेरिकेला जाताना औषधं सोबत बाळगण्यावर निर्बंध लावण्यात आले आहेत.

सकाळ डिजिटल टीम

परदेशात विशेषतः अमेरिकेला जाणाऱ्या भारतीयांसाठी एक महत्त्वाची सूचना. परदेशी जात असताना बऱ्याचदा आपण प्रथमोपचार पेटी बरोबर घेतो. ज्यामध्ये तापापासून अॅसिडिटी, उलट्या-जुलाबासाठी गोळ्या असतात. अर्थात स्वतःची आणि आपल्या सोबतच्या माणसांची काळजी म्हणून आपण औषधांचा बटवा सोबत घेऊन जातो. पण हीच सवय आता महागात पडणार आहे. (Entry to US is restricted if you are found carrying medicines without prescription)

अमेरिकेत औषधं सोबत बाळगण्यासाठीचे नियम फार कडक आहेत. तिथे प्रिस्क्रिप्शनशिवाय औषधं बाळगण्यास परवानगी नाही. मात्र तरीही अनेक भारतीय परदेशी जाताना प्रिस्क्रिप्शनशिवाय औषधं सोबत बाळगतात. कारण त्यांना वाटतं की त्यांच्याकडची औषधं तपासली जाणार नाही. मात्र जर औषधांसोबत प्रिस्क्रिप्शन नसल्याचं आढळून आलं तर मात्र अमेरिकेत जाणं मुश्किल होऊन बसेल.

प्रिस्क्रिप्शनशिवाय औषधं सोबत बाळगण्याने तुम्हाला विमानतळावरच रोखलं जाऊ शकतं. महत्त्वाचं म्हणजे अमेरिकेचा व्हिसाही रद्द होऊ शकतो. अनेक विमानतळांवर भारतीयांना लोणचं , गरम मसाले सोबत नेण्यास परवानगी आहे, मात्र प्रिस्क्रिप्शनशिवाय औषधं नेण्यास सक्त मनाई आहे.

काय आहेत औषधं सोबत बाळगण्याचे नियम? जाणून घ्या...

  • अमेरिकेत औषधं घेऊन येण्यासाठी प्रिस्क्रिप्शन अथवा डॉक्टरांचं पत्र सोबत असणं गरजेचं आहे.

  • ही औषधं त्यांच्या मूळ पॅकिंगमध्येच असायला हवीत आणि त्यावर डॉक्टरांच्या सूचनाही लिहिलेल्या असाव्यात.

  • वैयक्तिक वापरासाठीचीच औषधं फक्त नेता येईल. त्यापेक्षा जास्त औषधं सोबत बाळगता येणार नाहीत.

  • सर्व प्रकारची औषधं, आयव्ही बॅग्ज, सिरिंज, फ्रीझर पॅक्स यावर स्पष्ट लेबल्स असणं गरजेचं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

1980s AI Photo Trend: ChatGPT वरील एक फोटो पर्यावरणाला पडतोय महागात? व्हायरल AI फोटो 'ट्रेंड'मागचं धक्कादायक वास्तव

VARUN CHAKRAVARTHY: अफगाणिस्तानविरुद्ध भारताच्या विजयाला मोठं ग्रहण! वरुण चक्रवर्ती मालिकेतून बाहेर; एशियन गेम्सही मुकण्याची शक्यता

Road Accident: पोळ रांजणगावजवळ भीषण अपघात; अज्ञात वाहनाच्या धडकेत लासूरगावच्या २५ वर्षीय तरुणाचा मृत्यू

Germany Hanau Ganesh Festival: हानाऊमध्ये गणेशोत्सवाचा उत्साह; जर्मनीच्या विविध राज्यांतील भारतीय समुदाय एकत्र

Saudi Arabia: सौदी अरेबियाला मदिनामध्ये सापडला 110 दशलक्ष टन युरेनियमचा प्रचंड साठा, इराणशी तणाव अन् अमेरिकेशी अणुकरार

SCROLL FOR NEXT