hafiz saeed
hafiz saeed 
ग्लोबल

अमेरिकेची हाफिज सईदला पुन्हा अटक करण्याची मागणी 

पीटीआय

वॉशिंग्टन (पीटीआय)- मुंबईवरील 26/11च्या दहशतवादी हल्ल्याचा मास्टर माइंड हाफिज सईद याला पुन्हा त्वरित अटक करून त्याच्या विरोधात खटला चालविण्याची मागणी अमेरिकेने पाकिस्तानकडे केली आहे. हाफिज सईदच्या विरोधात कारवाई करण्यात पाकिस्तानने टाळाटाळ केल्यास त्याचे द्विपक्षीय संबंधांवर परिणाम होतील, असा इशाराही अमेरिकेने दिला आहे. 

बंदी घालण्यात आलेल्या "जमात-उद-दावा' या दहशतवादी संघटनेचा प्रमुख असलेल्या हाफिजला पकडण्यासाठी अमेरिकेने एक कोटी डॉलरचे बक्षीस जाहीर केले आहे. हाफिजला शुक्रवारी पाकिस्तानी न्यायालयाच्या निर्णयानुसार मुक्त करण्यात आले. चालू वर्षी जानेवारीपासून त्याला नजरकैदेत ठेवण्यात आले होते. त्याच्या स्थानबद्धतेच्या काळात वाढ करण्यास नकार देत त्याची सुटका करण्याचा आदेश न्यायालयाने दिला होता. तसेच, सरकारने दुसऱ्या प्रकरणात त्याला अटक केले नाही, तर त्याची मुक्तता करण्यास सांगितले होते. 

हाफिजची मुक्तता करण्यात आल्यानंतर "व्हाइट हाउस'च्या माध्यम सचिव सारा सॅंडर्स यांनी या प्रकाराबद्दल तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली. पाकिस्तानने हाफिजला पुन्हा अटक करावी आणि त्याच्या विरोधात खटला चालवावा, असेही त्या म्हणाल्या. यात टाळाटाळ केल्यास त्याचा द्विपक्षीय संबंधांवर परिणाम होऊ शकतो, असा इशाराही त्यांनी पाकिस्तानला दिला आहे. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ponzi Scam: 100 कोटी रुपयांच्या पॉन्झी घोटाळ्याप्रकरणी ईडीचे पुणे, नाशिक अन् कोल्हापुरात छापे! काय आहे प्रकरण?

Canada Accident: कॅनडात भारतीय आजी-आजोबांसह तीन महिन्याच्या नातवाचा अपघातात मृत्यू; दुतावासही हळहळलं

Ind vs Sa Series : भारत-दक्षिण आफ्रिका खेळणार ODI-कसोटी अन् टी-20 मालिका, 'या' महिन्यात रंगणार थरार

Success Mantra: तुमच्या 'या' सवयींमुळे खराब होऊ शकते करिअर, आजच करा बंद

Kasparov on Rahul Gandhi: माजी बुद्धिबळ चॅम्पियन गैरी कास्परोवनं केलं राहुल गांधींना ट्रोल म्हणाला, आधी रायबरेली...

SCROLL FOR NEXT