Escaped
Escaped Sakal
ग्लोबल

तब्बल ५० हजाराचा मेकअप करून मायलेकी ब्युटी पार्लरमधून फरार

सकाळ डिजिटल टीम

ब्रिटन : ब्युटी पार्लरमधून सुमारे ५० हजारांचं बील झाल्यावर एक महिला आणि तिच्या मुलीने पळ काढल्याची घटना घडली आहे. ही घटना ब्रिटनमध्ये घडली आहे. त्यानंतर ब्युटी पार्लरच्या मालकिनीने पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. त्यानंतर तिने सोशल मीडयावरही या घटनेची पोस्ट केली आहे. त्यांची ही पोस्ट चांगलीच व्हायरल झाली आहे.

(Two Ladies Escaped From Beauty Parlour)

पार्लरच्या मालकिनीचे नाव जेम्स एडम्स असं आहे. त्यांनी पोलिस तक्रारीत सांगितलं की, माझ्या ब्युटी पार्लरमध्ये दोन महिला अल्या होत्या. त्यांनी मायलेकी असल्याचं मला सांगितलं. त्या दोघींनी मेकअप बरोबर बोटोक्स ट्रीटमेंट (Botox Treatment) आणि दुसऱ्या महागड्या ट्रीटमेंट करवून घेतल्या. पण जेव्हा ४८ हजार ९४२ रूपये बील देण्याची वेळ आली तेव्हा त्या ब्युटी पार्लरमधून फरार झाल्याचं महिला मालकाने सांगितलं आहे.

Facebok Post

जेम्स एडम्स यांनी आपल्या फेसबुकवर पोस्ट करत या घटनेची माहिती शेअर केली आहे. सदर महिलेचा फोटो शेअर करत त्यांनी या महिला माझ्या पार्लरमध्ये ट्रीटमेंटसाठी आल्या होत्या आणि बील न देता पळून गेल्या आहेत. असं लिहित त्यांनी त्या दोन महिला आयरिश असल्याचा अंदाज व्यक्त केला आहे. दरम्यान या घटनेनंतर पोलिसांत तक्रार दाखल केली आहे.

तिने सांगितलं की, या दोन महिलांनी Botox आणि Lip Fillers ट्रीटमेंटसाठी बुकिंग केली होती. त्यानंतर त्यांनी मेकअप केला आणि ज्यावेळी पैसे देण्याची वेळ आली तेव्हा काहीतरी कारण सांगून बाहेर गेल्या आणि परत आल्या नाही, त्याचं बील ४८ हजार एवढं झालं होतं असं तक्रारीत म्हटलं आहे.

एका महिलेची ट्रीटमेंट झाल्यावर ती वेटिंग एरियात येऊन बसली आणि दुसरीची ट्रीटमेंट झाल्यावर तीही वेटिंग एरियात येऊन बसली. थोड्या वेळाने त्या दोघीही तेथून फरार झाल्या असं एडम्स यांनी सांगितलं आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

घाटकोपर होर्डिंग कोसळण्याच्या घटनेत मृतांच्या संख्येत वाढ, 74 जखमींना वाचवण्यात यश

Ramesh Chennithala : मतदारांचा कल ‘इंडिया’ आघाडीकडे

Loksabha Election 2024 : मोदी, ठाकरे, गांधी, पवार यांचीच हवा

Election Commission : निवडणूक आयोगाकडून तंत्रज्ञानस्नेही कारभाराला प्राधान्य

Devendra Fadnavis : कल्याण-मुरबाड रेल्वेमार्ग नगरपर्यंत नेणार

SCROLL FOR NEXT