Ethiopia Selam Blast eSakal
ग्लोबल

Ethiopia Blast : लष्कर आणि स्थानिक टोळ्यांमध्ये भीषण चकमक; बॉम्ब हल्ल्यात 26 जणांचा मृत्यू

Selam Blast : अजूनही 50 लोकांवर उपचार सुरू असून, मृतांची संख्या वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

Sudesh

Ethiopia Air Strike : इथिओपिया देशात सध्या भीषण हिंसाचार सुरू आहे. स्थानिक गँग आणि देशाचं लष्कर यांच्यामध्ये काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणात चकमकी सुरू आहेत. यातच रविवारी देशाच्या सेलम भागात एक मोठा ब्लास्ट झाला. यामध्ये 26 लोकांचा बळी गेल्याचं समोर आलं आहे.

फिनोट सेलम जनरल हॉस्पिटलचे सीईओ मनये तेनाव यांनी याबाबत माहिती दिली. रविवारी या भागात झालेल्या स्फोटामध्ये आतापर्यंत 26 जणांचा बळी गेल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. अजूनही 50 लोकांवर उपचार सुरू असून, मृतांची संख्या वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. स्फोटापूर्वीच या हिंसाचारांमध्ये जखमी झालेल्या 160 लोकांवर या रुग्णालयात उपचार करण्यात आले आहेत.

तीन ऑगस्ट रोजी अमहारा प्रांतातील सैनिक आणि फानो नावाचा स्थानिक सशस्त्र गट यांच्यामध्ये लढाई सुरू झाली होती. इथिओपिया सरकारने चार ऑगस्टला अमहारा प्रांतात सहा महिन्यांची आणीबाणी जाहीर केली होती. यानंतर हे प्रकरण आणखी चिघळलं. (Global News)

मानवाधिकार आयोगाने व्यक्त केली चिंता

इथिओपियातील मानवाधिकार आयोगाने या सर्व प्रकरणावर चिंता व्यक्त केली आहे. अमहाराच्या कित्येक भागांमध्ये मोठ्या प्रमाणात हिंसाचार झाला आहे. यामध्ये कित्येकांचे बळी गेले असून, सार्वजनिक संपत्तीचं देखील भरपूर नुकसान झालं आहे. सेलम, बहिर डार, गोंदर अशा कित्येक प्रांतांमध्ये अनागोंदी माजली आहे.

नऊ ऑगस्टनंतर याठिकाणी सुरू असलेला हिंसाचार कमी झाला होता. मात्र, रविवारी झालेल्या स्फोटाने पुन्हा एक ठिणगी पाडली आहे. या दरम्यान ऑस्ट्रेलिया, जपान, ब्रिटन, न्यूझीलंड आणि अमेरिका या देशांनी इथिओपियामधील आपल्या नागरिकांसाठी संयुक्त निर्देश जारी केले आहेत. या नागरिकांच्या सुरक्षेसाठी विशेष प्रयत्न करण्यात येत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT