ग्लोबल

युरोपात कोरोनाचा हाहाकार! आठवड्याभरात १८ लाख रुग्ण, २४ हजार मृत्यू

सकाळ डिजिटल टीम

जागतिक आरोग्य संघटनेनं इशारा दिला आहे की, फेब्रुवारी २०२२ पर्यंत युरोप आणि मध्य आशियात आणखी पाच लाख लोकांचा मृत्यू होण्याची भीती आहे.

दोन वर्षांपासून जगभरात धुमाकूळ घालणाऱ्या कोरोनाने युरोपात पुन्हा डोके वर काढले आहे. युरोपसाठी वाढती रुग्णसंख्या आणि मृत्यू चिंतेचा विषय आहे. जागतिक आरोग्य संघटनेनं इशारा दिला आहे की, फेब्रुवारी २०२२ पर्यंत युरोप आणि मध्य आशियात आणखी पाच लाख लोकांचा मृत्यू होण्याची भीती आहे. त्यामुळे पुन्हा एकदा युरोप कोरोनाचा हॉटस्पॉट होण्याच्या मार्गावर आहे. सध्या अनेक भागात कोरोनाच्या संसर्गात वाढ झाली आहे.

युरोपात जागतिक आरोग्य संघटनेचे संचालक असलेल्या हॅन्स क्लूज यांनी सांगितलं की, युरोपासह मध्य आशियातील ५३ देशांमध्ये सध्या संसर्गाची स्थिती ही चिंताजनक आहे. आता ज्या पद्धतीने संसर्गाचा वेग आणि मृत्यूचे प्रमाण आहे ते पाहता अशीच स्थिती राहिल्यास पुढच्या वर्षी फेब्रुवारीपर्यंत ५ लाख जणांना जीव गमवावा लागू शकतो. गेल्या आठवड्याभरात ५३ देशांमध्ये कोरोनामुळे रुग्णालयात दाखल होणाऱ्यांची संख्या दुप्पट झाली आहे.

क्लूज यांनी सांगितलं की, युरोपात या आठवड्यात १८ लाख नवे रुग्ण आढळले आहेत. गेल्या वर्षीच्या तुलनेत हे प्रमाण सहा टक्क्यांनी अधिक आहे. तर कोरोनामुळे आठवड्याभरात २४ हजारांहून जास्त लोकांचा मृत्यू झाला आहे. मृत्यूचे प्रमाण गेल्या वर्षीपेक्षा १२ टक्क्यांनी जास्त आहे. युरोपात सलग पाच आठवडे कोरोनाच्या रुग्णसंख्येत वाढ झाली आहे. १ लाख लोकांमागे १९२ रुग्ण सध्या सापडत आहेत.

जर्मनीमध्ये सर्वाधिक रुग्ण आढळत असून गुरुवारी ३३ हजार ९४९ नव्या रुग्णांची नोंद झाली. नव्या रुग्णांच्या बाबतीत शुक्रवारी गेल्या वर्षीचा उच्चांक मागे टाकला. शुक्रवारी जर्मनीत ३७ हजार नवे रुग्ण आढळले. ज्यांनी कोरोनाची लस घेतलेली नाही अशा लोकांमध्ये कोरोना होण्याचे प्रमाण जास्त आहे असं आरोग्यमंत्री जेन्स स्पॅन यांनी सांगितलं.

ग्रीस सरकारने लस न घेणाऱ्यांसाठी बंदीची घोषणा केली आहे. आठवड्यातून दोन वेळा कोरोना चाचणी आणि सार्वजनिक सेवा, बँक, दुकान तसंच इतरत्र जाण्यासाठी निगेटिव्ह रिपोर्ट आवश्यक आहे. याशिवाय सरकारने नियम मोडणाऱ्या व्यावसायिकांना दंडातही वाढ केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Supreme Court Crackers Ban : सर्वोच्च न्यायालयाचा फटाक्यांबाबत मोठा निर्णय; देशभरात बंदी घालता येणार नाही पण...

IND vs WI 2nd ODI : वादाला निमित्त! OUT or NOT OUT? नमन धीरचा अफलातून झेल, पण विंडीजला तो नाही पटला... Video पाहून ठरवा

Maratha Reservation: अंतरवालीमधील कोणी टीका केली तर दुर्लक्ष करा ; जरांगे . गावाचे योगदान विसरणार नाही

Latest Marathi News Live Update : काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी सिरीवेल्ली प्रसाद पाच दिवस मुंबई दौऱ्यावर; बैठकांना सुरुवात

OBC Development : ओबीसींच्या विकासासाठी एक रुपयांत जागा;उपसमितीच्या बैठकीत चंद्रशेखर बावनकुळेंचे निर्देश

SCROLL FOR NEXT