बर्लिन - इव्हेंट मॅनेजमेंट क्षेत्रातील व्यावसायिकांनी सरकारकडून आर्थिक मदत मिळावी म्हणून बुधवारी मोर्चा काढला. (एएफपी)
बर्लिन - इव्हेंट मॅनेजमेंट क्षेत्रातील व्यावसायिकांनी सरकारकडून आर्थिक मदत मिळावी म्हणून बुधवारी मोर्चा काढला. (एएफपी) 
ग्लोबल

‘लॉकडाउन २’च्या दिशेने युरोप

सकाळ वृत्तसेवा

माद्रिद - कोरोनाच्या जागतिक साथीची दुसरी लाट डोके वर काढत असून स्पेनपाठोपाठ जर्मनी आणि फ्रान्स या दोन प्रमुख देशांनी निर्बंध लागू केले आहे. स्पेनने सहा महिन्यांसाठी रात्रीची संचारबंदी यापूर्वीच लागू केली आहे. फ्रान्सने कडक लॉकडाउन लागू केले, तर जर्मनीत मध्यम स्वरूपाचे लॉकडाउन जाहीर करण्यात आले.

पहिल्या टप्प्यात युरोपमध्ये प्रामुख्याने पश्चिमेकडील देशांना फटका बसला होता. तेव्हा मध्य युरोपातील देश बचावले होते, पण आता तेथेही परिस्थिती गंभीर बनण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत.

इतर देशांतील स्थिती
पोलंड

  • सैनिकांच्या कोरोना चाचण्या सुरु
  • देशातील नव्या रुग्णांच्या संख्येत रोज २० टक्के वाढ, जी भयावह व सामोरे जाण्यास अशक्य असल्याचे ह्रदयविकार तज्ञ डॉ. पिओत्र सुवाल्स्की यांचे मत
  • राजधानी वॉर्सामध्ये सर्व रुग्णालयांत मिळून केवळ १२ व्हेंटीरेटर शिल्लक
  • मोकळ्या मैदानांवर वैद्यकीय केंद्रे उभारून बेडची कमतरता भरून काढण्यासाठी प्रयत्न

चेक प्रजासत्ताक

  • डॉक्टरांच्या मदतीसाठी अमेरिकन नॅशनल गार्डचे जवान वैद्यकीय प्रशिक्षण घेतलेले जवान दाखल होणार
  • रक्ताचे नमुने प्रयोगशाळांमध्ये नेण्यासाठी विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांचा पुढाकार
  • ६००० परिचारिका, २६०० डॉक्टर यांच्यासह १३,२०० वैद्यकीय कर्मचाऱ्यांना संसर्ग अशी संघटनेची माहिती

क्रोएशिया 
रुग्णालयांच्या मदतीसाठी पुढे येण्याचे निवृत्त डॉक्टरांना आवाहन

स्लोव्हेनिया
निवृत्ती फिजीशीयन तसेच वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना आणीबाणीच्या स्थितीसाठी सज्ज राहण्याची सूचना

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

आरोग्यस्थिती गंभीर बनून राष्ट्रीय आणीबाणी लागू होण्याची वेळ टाळण्यासाठी आपल्याला आत्ताच कृती केली पाहिजे. संसर्ग सध्याच्याच वेगाने वाढला तर आरोग्य यंत्रणेची क्षमता आपल्या जेमतेम आवाक्यात राहील.
- अँजेला मर्केल, जर्मनीच्या चॅन्सेलर

नव्या रुग्णांच्या संख्येत वाढ

  • एक लाख रहिवाशांमागे नव्या रुग्णांची संख्या एका आठवड्यात पन्नासच्या वर जात असल्याची नोंद
  • नोव्हेंबरच्या पूर्ण महिन्यात रेस्टॉरंट, पब, चित्रपटगृहे, नाट्यगृहे, फिटनेस सेंटर, औद्योगिक प्रदर्शने बंद ठेवण्याचा सरकार तसेच १६ प्रांतांमधील प्रमुखांचा निर्णय
  • सोमवारपासून अव्वल साखळी फुटबॉलसह सर्व व्यावसायिक क्रीडा स्पर्धांचे सामने प्रेक्षकांविना पार पडणार
  • हौशी क्रीडा उपक्रमांना परवानगी नाही
  • एका वेळा दहा पेक्षा जास्त व्यक्तींना एकत्र येण्याची परवानगी नाही
  • शेजारच्या दोन घरांपुरता वावर मर्यादीत
  • शाळा, नर्सरी सुरू राहणार
  • युरो न्यूजच्या वृत्तानुसार देशातील अतिदक्षता विभागातील केवळ २५ टक्के बेड उपलब्ध
  • कोरोनाचा आधीच फटका बसलेल्या आदरातिथ्य उद्योगविश्वात संतापाची लाट, आर्थिक मदतीसाठी निदर्शने

सर्व शेजारी देशांप्रमाणेच आपण सुद्धा कोरोना विषाणूचा अचानक वेगाने फैलाव झाल्यामुळे कोंडीत सापडलो आहोत, पण हे राष्ट्रीय लॉकडाऊन संपल्यानंतर फ्रेंच कुटुंबे नाताळ आणि नववर्षाचे स्वागत एकत्र येऊन करू शकतील अशी आशा वाटते.
- इमॅन्युएल मॅक्रॉन, फ्रान्सचे अध्यक्ष

घराबाहेर पडण्यासाठी अर्ज भरणे आवश्‍यक

  • एप्रिलच्या प्रारंभापासून कोरोना मृतांचे प्रमाण सर्वाधिक
  • शुक्रवारपासून सुरू होणारे निर्बंध एक डिसेंबरपर्यंत निर्बंध लागू
  • नव्या रुग्णांच्या संख्येतील वाढ तपासण्यासाठी दर १५ दिवसांनी आढावा
  • शाळा आणि पाळणाघरे खुली राहणार
  • घरातून बाहेर पडण्यासाठी योग्य कारण नमूद करणारा अर्ज भरणे पहिल्या लॉकडाउनप्रमाणेच आवश्यक
  • अत्यावशक कामे, वैद्यकीय कारण, किराणा माल खरेदी अशा कारणांसाठी घराबाहेर पडण्याची परवानगी
  • आंतरराष्ट्रीय सीमा बंद राहणार, बाहेरच्या देशांतून येणाऱ्या प्रत्येकाची चाचणी होणार
  • स्वयंरोजगार कमावणारे, दुकानदार, अतिसूक्ष्म, सूक्ष्म आणि मध्यम उद्योग, लॉकडाउनमुळे काम करू न शकणारे आशांसाठी विशेष मदतीची योजना जाहीर होणार
  • येत्या काही आठवड्यांत घरभाडे व खर्चासाठी रोख रक्कम, रजेची योजना तयार होणार

Edited By - Prashant Patil

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vijay Wadettiwar : हेमंत करकरे प्रकरणात वडेट्टीवारांनी दिला 'या' पुस्तकाचा दाखला; उज्ज्वल निकम यांच्यावरही गंभीर आरोप

Sharad Pawar : तब्येतीच्या कारणामुळे शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम रद्द

IPL 2024 LSG vs KKR Live Score: लखनौला बसला दुसरा धक्का, कर्णधार केएल राहुलला हर्षित राणाने धाडलं माघारी

Vijay Wadettiwar : ''हेमंत करकरेंची हत्या पोलिसांकडून'', विजय वडेट्टीवारांचा आरोप अन् फडणवीसांचा पलटवार

IPL 2024: हर्षल तुला निवृत्तीच्या दिवसात CSKचं काँट्रॅक्ट मिळणार नाही! धोनीला शुन्यावर बाद करणारा गोलंदाज होतोय ट्रोल

SCROLL FOR NEXT