European Union to send cyber response team to help Ukraine deal with cyber threats  
ग्लोबल

युक्रेनला सायबर हल्ल्याचा धोका; मदतीसाठी EU पाठवणार तज्ञांची टीम

सकाळ डिजिटल टीम

रशिया-युक्रेन (Russia-Ukraine Crisis )यांच्यात सुरु असलेल्या तणावाकडे सगळ्या जगाचे लक्ष लागले आहे. यादरम्यान रशियाने पूर्व युक्रेनच्या दोन प्रदेशांना औपचारिकपणे मान्यता दिल्यानंतर सायबर धोक्यांशी सामना करण्यासाठी युक्रेनला मदत करण्यासाठी सहा युरोपियन युनियन (EU) देश सायबर सुरक्षा तज्ञांची एक टीम पाठवत आहेत. या आठवड्याच्या सुरुवातीला युक्रेनने केलेल्या विनंतीला प्रतिसाद म्हणून लिथुआनिया, नेदरलँड्स, पोलंड, एस्टोनिया, रोमानिया आणि क्रोएशियाद्वारे टीम पाठवली जाईल. इतर EU देशांना मदत करण्यासाठी ही टीम तयार करण्यात आली होती.

लिथुआनियाचे उप परराष्ट्र मंत्री Margiris Abukevicius म्हणाले: "विशिष्ट घटनांना सामोरे जाण्यासाठी किंवा सुरक्षिततेतील कमकुवतपणा दूर करण्यासाठी युक्रेनला त्याच्या पायाभूत सुविधांची चाचणी घेण्याची आवश्यकता असू शकते." ब्रिटनचे संरक्षण सचिव बेन वॉलेस यांनी यापूर्वी सांगितले होते की ब्रिटनचे सायबर तज्ञ रशियाच्या धोक्याचा सामना करण्यासाठी युक्रेनसोबत काम करत आहेत.

युक्रेनच्या बँकिंग आणि सरकारी वेबसाइट्स ब्लॉक करणाऱ्या डिस्ट्रिब्युटेड डिनायल ऑफ सर्व्हिस (DDoS) हल्ल्यांमागे रशियन लष्करी हॅकर्स होते अशी माहिती अमेरिका आणि ब्रिटनने गेल्या आठवड्यात दिली. मात्र, रशियाने DDoS हल्ल्यांमध्ये सहभाग नाकारला आहे . रशियाकडूनही युक्रेनवर इतर मार्गाने दबाव टाकला जात आहे. युक्रेनवर रशियन लष्करी हल्ल्याचा धोकाही कायम आहे. यामुळे अनेक देशांनी आपल्या नागरिकांना युक्रेन सोडण्याचा सल्ला दिला आहे.

सायबर हल्ल्यांमध्ये युक्रेनमधील सर्वात मोठ्या वित्तीय संस्थांपैकी एक असलेल्या Oschadbank स्टेट सेव्हिंग बँक आणि प्रायव्हेट बँक यांना लक्ष्य करण्यात आले. मात्र, हे हल्ले फार मोठ्या प्रमाणावर नव्हते. त्यामुळे फारसा त्रास झाला नाही.

वृत्तसंस्थेने दिलेल्या वृत्तानुसार, युक्रेनमधील अनेक वेबसाइट्सवर हल्ला करण्यात आला, त्यामुळे त्या ब्लॉक करण्यात आल्या. अशा सायबर हल्ल्यांमध्ये, मोठ्या प्रमाणात जंक डेटा पॅकेट पाठवले जात असल्याने वेबसाइट्स अॅक्सेसेबल होतात. दोन्ही बँकांच्या वेबसाईट आता पूर्वीप्रमाणेच कार्यरत आहेत, गेल्या महिन्यातही युक्रेनवर सायबर हल्ला झाला होता. यानंतर, नाटो देशांनी युक्रेनशी सायबर वेलफेअर कॉर्पोरेशन करार करून हल्लेखोरांना प्रत्युत्तर दिले. युरोपियन युनियननेही युक्रेनला मदत करण्यासाठी आपली संसाधने जमा करत असल्याचे सांगितले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 2nd Test: फुल राडा! यशस्वी जैस्वालने DRS घेताच बेन स्टोक्स खवळला; अम्पायरला दाखवलं बोट, प्रेक्षकांचे Booing

IND vs ENG 2nd Test: यशस्वी जैस्वालची विक्रमी कामगिरी! मोहम्मद सिराज लै भारी; टीम इंडियाकडे २४४ धावांची आघाडी

Ranya Rao : रान्या राव ‘Gold smuggling’ प्रकरणी ‘ED’ची मोठी कारवाई!

IND vs ENG 2nd Test: मोहम्मद सिराजच्या सहा विकेट्स, आकाश दीपने फिरवली मॅच; इंग्लंड ALL OUT, भारताकडे मजबूत आघाडी

मोठी बातमी! फार्मसी, बीबीए, बीसीएससह ‘या’ अभ्यासक्रमांसाठी प्रवेश अर्ज भरण्यास प्रारंभ; अर्जाचे शुल्क 800 ते 1000 रुपये; जाणून घ्या, वेळापत्रक...

SCROLL FOR NEXT