European Union today imposed restrictions on Russia for waging war on Ukraine sakal
ग्लोबल

युरोपचे रशियावर आणखी निर्बंध

युक्रेनवर युद्ध लादल्याबद्दल युरोपीय महासंघाने रशियावर आज आणखी निर्बंध लागू केले

सकाळ वृत्तसेवा

ब्रुसेल्स : युक्रेनवर युद्ध लादल्याबद्दल युरोपीय महासंघाने रशियावर आज आणखी निर्बंध लागू केले. या निर्बंधांमुळे रशियाची आणखी आर्थिक कोंडी होणार असल्याचे युरोपीय आयोगाच्या अध्यक्षा उर्सुला व्हॉन देर लेयेन यांनी सांगितले. निर्बंधांची सविस्तर माहिती अद्याप जाहीर करण्यात आलेली नाही.

युरोपीय महासंघाने काही दिवसांपूर्वीच रशियावर काही निर्बंध लागू केले होते. रशियाकडून आयात केल्या जाणाऱ्या सोन्यावर आणि उच्च तंत्रज्ञान असलेल्या वस्तूंवर निर्बंध लावण्याचीही युरोपमधील देशांकडून मागणी होत आहे. आज निर्बंध लागू केल्याने रशियावर आम्ही दबाव कायम ठेवणार असल्याचा इशारा दिला गेला आहे, असे उर्सुला यांनी सांगितले. रशियामधून सोन्याची मोठ्या प्रमाणावर निर्यात केली जाते. या निर्यातीवर बंधन घातल्यास रशियाला फार मोठा आर्थिक फटका बसू शकतो, असे तज्ज्ञांचे मत आहे. रशियावर निर्बंध घालण्याबरोबरच युक्रेनलाही ५० कोटी युरोची मदत करण्याचा निर्णय आजच्या बैठकीत घेण्यात आला.

युक्रेनला आणखी शस्त्रपुरवठा

वॉशिंग्टन : रशियाचा सामना करण्यासाठी युक्रेनला आणखी शस्त्रे पुरविणार असल्याचे अमेरिकेने जाहीर केले आहे. युक्रेनला लवकरच रॉकेट यंत्रणा, दारूगोळा आणि इतर लष्करी साहित्य पुरविले जाणार आहे. अमेरिकेने पुरविलेल्या रॉकेटच्या साह्यानेच युक्रेनने रशियावर प्रतिहल्ले सुरु करत त्यांचे मोठे नुकसान केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

भाजप कार्यकर्त्याची जेवणासाठी हाणामारी, आमदारांनी घेतलेल्या बैठकीनंतर एकमेकांच्या अंगावर गेले धावून; VIDEO VIRAL

Solapur Pune Highway Accident : ओव्हरटेक करताना कंटेनरला धडक, स्कॉर्पिओचा चुराडा; २२ वर्षीय तरुणाचा मृत्यू, दोघे गंभीर

CNG PNG Supply : सीएनजी-पीएनजी पुरवठ्याला गती; पुणे, पिंपरीमधील गॅस वितरण व्यवस्था अधिक सक्षम

विद्यानंद बापट यांचा २२ वर्षांपूर्वी उदय सामंत यांनी केलेला सत्कार; फोटो होतोय VIRAL

IIT Bombay Hostel: विद्यार्थ्याने गळफास घेतल्यानंतर 'आयआयटी'कडून मोठं पाऊल; छतावील पंख्यांऐवजी भिंतीवरील पंखे मागवले

SCROLL FOR NEXT