Europe Population sakal
ग्लोबल

Europe Population : युरोपची लोकसंख्या शतकाअखेरीस घटणार; ‘युरोस्टॅट’चा अंदाज

युरोपची लोकसंख्या या शतकाच्या अखेरीपर्यंत सहा टक्क्यांनी घटेल, असा अंदाज ‘युरोस्टॅट’ या संस्थेने व्यक्त केला आहे.

एएनआय

युरोपची लोकसंख्या या शतकाच्या अखेरीपर्यंत सहा टक्क्यांनी घटेल, असा अंदाज ‘युरोस्टॅट’ या संस्थेने व्यक्त केला आहे.

ब्रुसेल्स - युरोपची लोकसंख्या या शतकाच्या अखेरीपर्यंत सहा टक्क्यांनी घटेल, असा अंदाज ‘युरोस्टॅट’ या संस्थेने व्यक्त केला आहे. या अंदाजानुसार, सध्याचे लोकसंख्या वाढीचे प्रमाण लक्षात घेता एक जानेवारी २०२२ ते एक जानेवारी २१०० या कालावधीत युरोपची लोकसंख्या अपेक्षेपेक्षा दोन कोटी ७३ लाखांनी कमी असेल.

कोरोना संसर्गाचा परिणाम म्हणून २०२० आणि २०२१ या कालावधीत युरोपची लोकसंख्या घटली होती. मात्र, २०२२ पासून तिचा वाढीचा वेग पूर्वीप्रमाणे झाल्याचे दिसून आले आहे. युक्रेन युद्धामुळे प्रचंड संख्येने स्थलांतरीत लोक युरोपमध्ये आल्याने यावर्षी एक जानेवारीला या खंडाची लोकसंख्या ४५ कोटी १० लाख इतकी होती.

२०२६ मध्ये या लोकसंख्येत वाढ होऊन ती ४५ कोटी ३० लाखांपर्यंत जाईल. त्यानंतर मात्र लोकसंख्या वाढीचा आलेख खाली जात २१०० या वर्षापर्यंत युरोपची लोकसंख्या ४२ कोटी असेल, असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. युरोपमध्ये सध्या बालके आणि किशोरवयीन मुलांचे एकूण लोकसंख्येच्या तुलनेतील प्रमाण २० टक्के आहे; ते शतकाअखेरीपर्यंत १८ टक्क्यांवर येणार आहे. त्याचप्रमाणे, काम करण्याच्या वयातील (२० ते ६४) लोकांची संख्याही नऊ टक्क्यांनी घसरण्याचा अंदाज आहे. ज्येष्ठ नागरिकांच्या संख्येत मात्र दोन टक्क्यांनी वाढ होईल, असे ‘युरोस्टॅट’च्या अहवालात म्हटले आहे.

वृद्धांची संख्या वाढणार

युरोपमध्ये सध्याच्या लोकसंख्येच्या पिरॅमिडमध्येच दीर्घायुष्य असणाऱ्यांची संख्या अधिक असून कमी मृत्युदर आणि कमी जन्मदर आहे. २१०० या वर्षासाठीच्या लोकसंख्येच्या पिरॅमिडनुसार, लहान मुलांची संख्या कमी होणार असून ८५ वर्षांहून अधिक वय असणाऱ्यांची संख्या मात्र वाढणार आहे. शतकाअखेरीस, शंभरच्या आसपास वय असणाऱ्यांचे प्रमाण वाढणार असून शंभरहून अधिक वय असणाऱ्या महिलांची संख्या सध्याच्या ०.०२ टक्क्यांच्या तुलनेत वाढून ०.३ टक्के होणार असल्याचा अंदाज आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

दादरमध्ये बेस्ट बसची अनेक गाड्यांना धडक, दोघांचा मृत्यू; १० ते १२ जण जखमी

Maharashtra Farmer Loan Waiver : 'या' शेतकऱ्यांना मिळणार नाही कर्जमाफीचा लाभ; पात्र आणि अपात्र शेतकऱ्यांची यादी जाहीर

Latest Marathi News Live Update : ठाणे मनपाच्या चौथ्या मजल्यावर आग, महत्त्वाची कागदपत्रे जळून खाक

Gold Rate Today: सोनं आणखी स्वस्त! सलग 10 व्या दिवशी दर घसरले; उच्चांकापासून 29,000 रुपयांनी स्वस्त, आज महाराष्ट्रात किती भाव?

Konkan Railway Recruitment : कोकण रेल्वेचा अजब कारभार! 132 पदांसाठी भरती कोकणात, पण मुलाखती चक्क आंध्र प्रदेशात; स्थानिक तरुणांमध्ये तीव्र संताप

SCROLL FOR NEXT