ex army officers adil raza claims pakistani actresses being used as honey traps esakal
ग्लोबल

Kubra Khan : 'पुढाऱ्यांना फसवण्यासाठी लष्कराच्या मदतीने अभिनेत्री करतात हनी ट्रॅप'

सकाळ डिजिटल टीम

नवी दिल्लीः एका निवृत्त लष्करी अधिकाऱ्याने यूट्युब व्हीडिओमध्ये देशातील काही अभिनेत्रींचा वापर सेनेकडून हनी ट्रॅपसाठी केला जात असल्याचा आरोप केला आहे. यानंतर खळबळ उडाली असून काही अभिनेत्री भडकल्या आहेत.

पाकिस्तानचे निवृत्त लष्करी अधिकारी आदिल रजा यांनी पाकिस्तानी अभिनेत्री सजल अली, कुब्रा खान आणि मेहविश हयात यांच्याकडे अंगुलीनिर्देश करीत पाकिस्तानी लष्कराकडून त्यांचा वापर होत असल्याचा दावा केला होता. सजल अली या पाकिस्तानी अभिनेत्रीने बॉलिवूडमध्येदेखील काम केलं आहे. श्रीदेवीच्या 'मॉम' सिनेमामध्ये सजल झळकली होती.

सजल अलीने पाकिस्तानी निवृत्त लष्करी अधिकारी आदिल रजा यांच्याविरोधात कारवाई करण्याची मागणी केली आहे. ती म्हणाली की, हे खूप वेदनादायी आहे.आपल्या देशातली परिस्थिती आणखी विदारक होत चालली आहे. कुणाच्या चारित्र्यावर प्रश्न उपस्थित करणं लाजीरवाणं आहे.

अभिनेत्री कुब्रा खान हिने इन्स्टाग्रामवर भलीमोठी पोस्ट लिहिली आहे. आदिल रजा यांनी तीन दिवसांच्या आत आपलं म्हणणं सिद्ध करण्याचं आवाहन तिने केलं आहे. शिवाय तिने रजावर कायदेशीर कारवाई करणार असल्याचं सांगितलं आहे.

कुब्रा पुढं म्हणाली की, मी सुरुवातीला शांत राहिले कारण एक खोटा व्हीडिओ माझ्या अस्तित्वाविषयी महत्त्वाचा ठरु शकत नाही. परंतु आता खूप झालं. कुणीही उठून आमच्याकडे बोट करेल, हे चालणार नाही. आदिल रजा यांनी एवढे आरोप लावण्यापूर्वी पुरावे देणं गरजेचं होतं. तीन दिवसांच्या आत पुरावे द्या, नसता आपल्यावर अब्रूनुकसानीचा दावा ठोकण्यात येईल. मी कुणाच्या बापाला घाबरत नाही, असा इशारा तिने दिला.

दरम्यान, निवृत्त लष्करी अधिकारी आदिल रजा यांनी व्हीडिओमध्ये पाकिस्तानी अभिनेत्रींबद्दल बोलतांना सांगितलं होतं की, राजकीय लोकांना फसवण्यासाठी काही अभिनेत्री जनरल बाजवा आणि माजी आयएसआय प्रमुख फैज हमीदसोबत मिळून काम करत आहेत. या व्हीडिओमध्ये आदिल रजा यांनी थेट अभिनेत्रींचं नाव घेतलं नसलं तरी त्यांच्या शॉर्ट फॉर्मचा उल्लेख केला. यानंतर नेटकऱ्यांनी अभिनेत्रींना ट्रोल करायला सुरुवात केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sahyadri Tiger Reserve : वाघांची डरकाळी सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात घुमणार, आणखी आठ वाघ वास्तव्यास येणार; केंद्र-राज्य शासनाचा निर्णय

PM Narendra Modi : 'ऑपरेशन सिंदूर' वेळी कॉंग्रेस पाकिस्तानच्या लष्कराच्या पाठिशी; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा हल्लाबोल

१६ वर्षांच्या भावाला आणून द्या आणि सामना खेळवा; पहलगाम हल्ल्यात मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांचा भारत-पाकिस्तान मॅचला विरोध

Pune Traffic Update : पादचाऱ्यांच्या सुरक्षेसाठी शास्त्रीनगर चौकात उपाययोजना; वाहतूक कोंडीवर तोडगा

Video : शुभांशु शुक्लांनी सांगितलं, अंतराळात व्यायाम कसा करतात? तशीच आसने पृथ्वीवर केल्यास शरीराला कोणते फायदे होतात, जाणून घ्या

SCROLL FOR NEXT