Imran khan  Sakal
ग्लोबल

भेट म्हणून मिळालेलं नेकलेस विकलं; पाकचे माजी PM इम्रान खान अडचणीत

सकाळ डिजिटल टीम

पाकिस्तानच्या सर्वोच्च तपास संस्थेने माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्या विरोधात तपास सुरु केला आहे. मीडिया रिपोर्टनुसार माजी पंतप्रधान इम्रान खान यांनी त्यांच्या कार्यकाळात भेट म्हणून मिळालेला एक महागडा हार राज्याच्या भेटवस्तू भांडारात जमा करण्याऐवजी 18 कोटी रुपयांना विकल्याच्या आरोपावरून ही चौकशी केली जात आहे.

पंतप्रधान असताना इम्रान खान यांना भेट म्हणून मिळालेले हे नेकलेस तोशा-खाना (राज्य भेटवस्तू भांडार) मध्ये पाठवण्यात आला नव्हता, तर माजी विशेष सहाय्यक झुल्फिकार बुखारी यांना देण्यात आला होता, ज्यांनी तो लाहोरमधील एका ज्वेलर्सला ₹ 18 कोटींना विकला होता, असे एक्सप्रेस ट्रिब्यून वृत्तपत्राने म्हटले आहे.

फेडरल इन्व्हेस्टिगेशन एजन्सीने (एफआयए) खान यांच्या कार्यकाळात भेट म्हणून मिळालेला महागडा हार राज्याच्या भेटवस्तू भांडारात जमा करण्याऐवजी 18 कोटी रुपयांना एका ज्वेलर्सला विकल्याच्या आरोपावरून चौकशी सुरू केली आहे, असे रिपोर्टमध्ये म्हटले आहे .

सार्वजनिक भेटवस्तू त्याची अर्धी किंमत देऊन वैयक्तिक ताब्यात ठेवल्या जाऊ शकतात परंतु गेल्या आठवड्यात संसदेत अविश्वास ठराव गमावलेल्या खान यांनी राष्ट्रीय तिजोरीत काही लाख रुपये जमा केले जे बेकायदेशीर होते, असे म्हटले आहे.

कायद्यानुसार, राज्य अधिकार्‍यांना तोशा-खान्यात मान्यवरांकडून मिळालेल्या भेटवस्तू जमा करणे आवश्यक आहे. जर ते भेटवस्तू सादर करण्यात अयशस्वी झाले किंवा भेटवस्तूच्या किमतीच्या किमान अर्धी रक्कम जमा केली नसेल तर ते बेकायदेशीर ठरते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs NZ, 4th T20I: श्रेयस अय्यरचा विश्वविक्रम, तर भुवीची जागा घेणाऱ्या मयंक यादवचे न्यूझीलंडला ५ ओव्हरमध्येच मोठे धक्के

Malegaon Commissioner ₹80000 Bribe Case : निवृत्तीला अवघे दोन दिवस उरले असताना मालेगाव महापालिकेचा आयुक्त एसीबीच्या जाळ्यात; 80 हजारांची लाच घेताना अटक

बापरे! तेजश्रीच्या पायाला गंभीर दुखापत? दीड महिन्यांपासून असलेलं फ्रॅक्चर दाखवत सांगितलं कारण

दुष्काळाचं सावट, रब्बी हंगामाची चिंता; शेतकऱ्यांसाठी महाबीजने आखलं ३.९८ लाख क्विंटल बियाण्यांचं नियोजन

Marathi News Live Updates : समृद्धी महामार्गावर २ हजार पोलिसांचा बंदोबस्त

SCROLL FOR NEXT