Sheikh Hasina sakal
ग्लोबल

Sheikh Hasina : अल्पसूचनेनंतर हसीना भारतात ; जयशंकर

‘‘बांगलादेशाच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांनी अल्पसूचना देत भारतात आश्रय घेतला,’’ अशी माहिती परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी आज संसदेच्या दोन्ही सभागृहांमध्ये दिली.

सकाळ वृत्तसेवा

नवी दिल्ली : ‘‘बांगलादेशाच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांनी अल्पसूचना देत भारतात आश्रय घेतला,’’ अशी माहिती परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी आज संसदेच्या दोन्ही सभागृहांमध्ये दिली. शेख हसीना यांनी बांगलादेशातून पळ काढल्यानंतरही तिथे हिंसाचार सुरू असून आंदोलकांकडून हिंदू अल्पसंख्याकांचे व्यवसाय आणि मंदिरांना लक्ष्य करण्यात येत असल्याबद्दल जयशंकर यांनी चिंता व्यक्त केली.

गेल्या दोन महिन्यांपासून सुरू असलेल्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनामुळे अस्थैर्याच्या गर्तेत सापडलेल्या बांगलादेशातील हिंसक परिस्थितीवर आज परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी राज्यसभा आणि लोकसभेत सविस्तर निवेदन केले. सोमवारी सायंकाळी शेख हसीना यांचे विमान गाझियाबादच्या हिंडन हवाईतळावर उतरल्यापासून भारताने बांगलादेशच्या घडामोडींवर किंवा हसीना यांनी घेतलेल्या आश्रयाबद्दल कोणतेही भाष्य केले नव्हते. पण आज जयशंकर यांनी या मुद्यांवर सरकारची बाजू स्पष्ट केली.

‘‘शेख हसीना यांनी पंतप्रधानपदाचा राजीनामा द्यावा या मागणीसाठी विद्यार्थी आंदोलन करीत होते. सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतरही बांगलादेशातील आंदोलन संपले नाही. शेवटी शेख हसीना यांनी राजीनामा दिला आणि अल्पसूचना देऊन भारतात आश्रयाला येण्यासाठी परवानगी मागितली. बांगलादेशात आंदोलकांकडून हिंदू अल्पसंख्याकांचे व्यवसाय आणि मंदिरांना लक्ष्य करण्यात येत आहे. त्याचा पूर्ण तपशील हाती आलेला नाही. या घडामोडींवर भारताचे लक्ष आहे. काही समूह आणि संस्थांनी अल्पसंख्याकांच्या रक्षणासाठी स्वागतार्ह पुढाकार घेतला आहे. मात्र, कायदा आणि सुव्यवस्थेची स्थिती दृश्य स्वरूपात पूर्वपदावर येईपर्यंत स्वाभाविकपणे आम्हाला चिंता आहे,’’ असे जयशंकर म्हणाले.

‘‘बांगलादेशात १९ हजार भारतीय नागरिक असून त्यात नऊ हजार विद्यार्थी आहेत. जुलै महिन्यात बहुतांश विद्यार्थी भारतात परतले आहेत. आम्ही ढाका प्रशासनाशी तसेच ढाक्यातील भारताच्या उच्चायुक्तालय आणि चितगाव, राजशाही, खुलना आणि सिल्हेट येथील साहाय्यक उच्चायुक्तालयांशी तसेच बांगलादेशाच्या अधिकाऱ्यांशी संपर्कात असून स्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहोत. या गुंतागुंतीच्या परिस्थितीत सीमेवर अतिदक्षतेचा आदेश दिले आहेत,’’ असे जयशंकर यांनी सांगितले.

राष्ट्रीय सहमती असलेल्या महत्त्वाच्या शेजारी देशासंबंधातील संवेदनशील मुद्यांवर सभागृहांकडून समर्थनाची अपेक्षा व्यक्त करीत जयशंकर यांनी निवेदनाचा समारोप केला.

सर्वपक्षीय बैठकीत चर्चा

तत्पूर्वी, संसद भवनात झालेल्या सर्वपक्षीय बैठकीत बांगलादेशातील पेचप्रसंगाविषयी जयशंकर यांनी माहिती दिली. या बैठकीला सरकारकडून गृहमंत्री अमित शहा, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, संसदीय कामकाजमंत्री किरण रिजीजू आणि राज्यसभेतील नेते जे. पी. नड्डा, तर विरोधी पक्षांकडून लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी, काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, रामगोपाल यादव, टी. आर. बालू, सुदीप बंडोपाध्याय, सस्मित पात्रा यांच्यासह दोन्ही सभागृहांतील विविध नेते उपस्थित होते. मात्र, राज्यसभा आणि लोकसभेत १३ खासदार असूनही बैठकीचे निमंत्रण न दिल्याने आम आदमी पक्षाचे नेते संजय सिंह यांनी तीव्र रोष व्यक्त केला आहे. लोकसभेत काँग्रेसचे खासदार मनीष तिवारी यांनी बांगलादेशातील घडामोडींकडे लक्ष वेधून या मुद्यावर चर्चेची मागणी केली. सुवेंदू अधिकारी यांनी गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेऊन बांगलादेशातील स्थितीविषयी चिंता व्यक्त केली. परराष्ट्र मंत्री जयशंकर यांनी अमित शहा यांच्यासोबत बांगलादेशातील घडामोडींवर चर्चा केली.

भारतापुढे पेच

बांगलादेशच्या परागंदा माजी पंतप्रधान शेख हसीना राजधानी दिल्लीत किती काळ वास्तव्य करणार हा प्रश्न भारताच्या दृष्टीने डोकेदुखीचा ठरण्याची शक्यता आहे. भारताने या मुद्यावर तूर्तास सावध पवित्रा घेतला आहे. पण त्यावर भारताला लवकरच तोडगा काढावा लागेल. ब्रिटनने शरणागती नाकारल्यानंतर हसीना यांना भारतात आश्रय देणे आणि त्याचवेळी त्यांचा विरोध करणाऱ्या बांगलादेशातील नव्या सरकारशी मैत्रीपूर्ण संबंध ठेवण्याचे अवघड आव्हान केंद्र सरकारपुढे निर्माण होणार आहे. लंडनमध्ये आश्रय मागणाऱ्या शेख हसीना यांच्याविषयी ब्रिटनने नकारात्मक पवित्रा घेतला आहे. ज्या देशात त्या सर्वप्रथम सुरक्षित पोहोचल्या तिथेच त्यांनी आश्रय मागावा, अशी भूमिका ब्रिटनने घेतली आहे. हसीना यांना आश्रय देऊन बांगलादेशाशी संबंध बिघडण्याचा तसेच तेथे भारतविरोधी वातावरण निर्माण होण्याचा पेच उद्‍भवण्याची शक्यता आहे. भारत-बांगलादेश व्यापार संबंधांवरही त्याचा परिणाम होऊ शकतो. शेख हसीना भारतात राहिल्यास बांगलादेशातील हिंदू नागरिकांना तेथील स्थानिकांच्या रोषाचा सामना करावा लागू शकतो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Stock Market Closing: सेन्सेक्स 176 अंकांनी घसरणीसह बंद; मेटल आणि आयटीमध्ये जोरदार विक्री, कोणते शेअर्स वाढले?

IND vs ENG 3rd Test: जसप्रीत बुमराह IN, मग कोण OUT? लॉर्ड्स कसोटीसाठी इरफान पठाणने निवडली Playing XI; अशीच असेल टीम इंडिया

EMI Debt Trap: मध्यमवर्ग ईएमआयच्या जाळ्यात; 5 पैकी 3 लोकांवर तीनपेक्षा जास्त कर्ज, काय आहे कारण?

Latest Maharashtra News Live Updates: पूर्व विदर्भातील पूरस्थिती नियंत्रणात: एसडीआरएफ आणि एनडीआरए यंत्रणा सज्ज

Devendra Fadnavis : ''मीसुद्धा तो व्हिडीओ बघितला, पण...''; संजय गायकवाडांनी केलेल्या मारहाणीवर काय म्हणाले देवेंद्र फडणवीस?

SCROLL FOR NEXT