kabul airport esakal
ग्लोबल

काबुल एअरपोर्टवर पाणी बॉटल 3000, तर राईस प्लेट 7500 रूपये

सकाळ डिजिटल टीम

पिण्यासाठी पाणी नाही, कि खायला अन्न नाही अशा परिस्थितीत अफगणिस्तानी नागरिक (afghanistan citizen) काबुल एअरपोर्टवर (kabul airport) सध्या दिवस काढत आहेत. हो हे खरं आहे... काबुल एअरपोर्टवर परिस्थिती इतकी वाईट आहे की, नागरिकांना एका पाणी बॉटलसाठी 40 डॉलर म्हणजे 3 हजार रूपये मोजावे लागत आहेत. तर एका राईस प्लेटसाठी 100 डॉलर म्हणजे 7 हजार 500 रूपये मोजण्याची वेळ आली आहे. अफगाणिस्तनात तालिबानी दहशतवाद्यांनी (Taliban Terrorist) केलेल्या कहरामुळे अनेक नागरिक देश सोडून जात असल्याची वेळ आली आहे. त्याचाच परिणाम म्हणून सध्या काबुल विमानतळावर नागरिकांचे आता खाण्यापिण्याचे हाल होत आहेत. अशातच एक गंभीर बाब म्हणजे काबूल विमानतळावर मिळणाऱ्या सुविधांही महागड्या आहेत. त्यामुळे नागरिकांवर चक्क उपासमारीची वेळ आली आहे. त्याहूनही गंभीर बाब म्हणजे अफगणिस्तानातील चलनातील नोटांचाही अस्वीकार केला जात आहे.

एअरपोर्टवर फक्त डॉलर्स स्विकारले जात असल्याने नागरिकांचे मात्र प्रचंड हाल होत आहेत. देश सोडून जाण्यासाठी एअरपोर्टवर नागरिकांकडून उपाशीपोटीच रांगेत उभे आहेत. एअरपोर्टवर पोहचूनही पाण्याच्या अनेक पटीने मोजावे लागणारे पैसे आणि जेवणासाठीचे पैसे यामुळे नागरिकही मेटाकुटीला आले आहेत. अशातच सर्वाधिक हाल होत आहेत, ते म्हणजे छोट्या मुलांचे...सध्या काबुल एअरपोर्टवर ५० हजारांहून अधिक लोक हे देश सोडण्याच्या तयारीत आहेत. त्यामुळे एअरपोर्टवर पोहचण्यासाठी अतिशय भयानक अशी वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे. अनेकांना या वाहतूक कोंडीमुळेच एअरपोर्ट गाठणेही कठीण झाले आहे. त्यातच एअरपोर्टवर महागलेल्या गोष्टींमुळे नागरिकांच्या गैरसोईत आणखी भर पडत आहे.

अफगाणिस्तानातील नागरिकांनी रनवेवर मोठ्या प्रमाणात गर्दी केली आहे. काही जणांनाच एअरपोर्टवर जाण्याची परवानगी मिळाली आहे. पण अनेक लोक हे एअरपोर्टच्या बाहेरच प्रवेशासाठीची वाट पाहत आहेत. त्यामुळे एअरपोर्ट परिसरात लांबच लांब अशा रांगा लागल्या आहेत. आपल्याला रांगेत प्रवेशाची संधी कधी मिळेल या आशेवरच अनेक लोकांची गर्दी सध्या काबुल एअरपोर्टच्या बाहेरदेखील जमा झाली आहे. अनेकांचा नाईलाज असल्यानेच रांगेत प्रतिक्षेत थांबण्याशिवाय सध्या कोणताही पर्याय नागरिकांपुढे दिसत नसल्याचे चित्र सध्या दिसत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tamhini Ghat Accident: ताम्हिणी घाटातल्या गूढ अपघाताचा उलगडा… कोकणातून हॉटेल चालकाचा फोन ठरला टर्निंग पाईंट! नाहीतर...

Kolkata Earthquake : भूकंपाच्या धक्क्याने कोलकाता हादरले; लोक घाबरून घरं सोडून पळाले; बांगलादेशातही बसले हादरे

Television Day 2025: स्क्रीनवरचे डाग होतील गायब! ‘या’ 3 उपायांनी करा टीव्हीची परफेक्ट स्वच्छता

Latest Marathi News Live Update : विद्येचे धडे देणाऱ्या मुख्याध्यापकांचा शाळेत मद्यधुंद अवस्थेत धिंगाणा

Ashes 2025 England vs Australia : खरोखरची राख असलेली 'अ‍ॅशेस ट्रॉफी' आता कुठं आहे? त्यात नेमकी कशाची राख आहे? जाणून घ्या...

SCROLL FOR NEXT