Justin Trudeau 
ग्लोबल

India Vs Canada: कॅनडाच्या मदतीसाठी 'फाईव्ह आय अलायन्स' धावून येणार? भारतासाठी काळजीची गोष्ट!

कार्तिक पुजारी

What Is Five Eyes Alliance

नवी दिल्ली- खलिस्तानी दहशतवादी हरदीप सिंग निज्जर याच्या हत्येनंतर भारत आणि कॅनडामध्ये संबंध अत्यंत ताणले गेले आहेत.

कॅनडातील खलिस्तानी दहशतवादी निज्जर याच्या हत्येमागे भारताच्या 'रॉ'चा समावेश असल्याचा आरोप कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रूडो यांनी केलाय. दुसरीकडे, भारताने हा आरोप साफ फेटाळला आहे. सध्या कॅनडा 'फाईव्ह आय इंटेलिजन्स अलायन्स'कडून पाठिंबा मिळावा अशी अपेक्षा करत आहे.

फाईव्ह आय इंटेलिजन्स अलायन्स काय आहे?

'फाईव्ह आय इंटेलिजन्स अलायन्स' पाच देशांची आंतरराष्ट्रीय सुरक्षा एजेन्सी आहे. यात अमेरिका, ब्रिटन, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड आणि कॅनडा या देशांचा समावेश होतो.

वॉशिंग्टन पोस्टच्या रिपोर्टनुसार, एजेन्सीने निज्जरच्या हत्येचा मुद्दा खाजगीमध्ये उपस्थित केल्याचं बोललं जातं. विशेष म्हणजे जी-२० परिषदेच्या पूर्वी याची वाच्यता करण्यात आली नव्हती.

पाच देशांच्या एकत्रित एजेन्सीने याबाबत काळजी व्यक्त केली असून काही देशांनी तपास प्रक्रियेमध्ये भारताने कॅनडाशी सहकार्य करावे अशी विनंती केली आहे. पाच पैकी दोन देश, अमेरिका आणि ऑस्ट्रेलिया क्वाड (Quadrilateral Security Dialogue or Quad) चे सदस्य आहेत. क्वाड संघटनेत अमेरिका, ऑस्ट्रेलिया, भारत आणि जपान या देशांचा समावेश आहे.

'फाईव्ह आय इंटेलिजन्स अलायन्स'चे स्थापना आणि कार्य

दुसऱ्या महायुद्धामध्ये सुरक्षा एजेन्सींनी महत्त्वाची भूमिका बजावली होती. त्यानंतर अमेरिका आणि यूकेने १९४६ मध्ये UKUSA करार केला होता.

संघटनेतील सदस्य संख्या दोनदा वाढवण्यात आली. त्यात १९५६ मध्ये कॅनडा, ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडला सहभागी करुन घेण्यात आले. सुरक्षा एजेन्सीमधील पाच देश एकमेकांशी सहकार्य करतात. जगातील इतर देशांमध्ये या संघटनेचे गुप्तहेर काम करत आहेत.

एकमेकांना सहकार्य

एकमेकांना माहिती पुरवणे, मनुष्यबळाचा वापर करणे, सूचना यंत्रणा, सुरक्षा यंत्रणा याचे साहाय्य घेणे, तसेच सॅटेलाईट इमेज, ठिकाणांचा शोध अशाप्रकारचे सहाय्य हे पाच देश एकमेकांना करत असतात. काही मोहिमांमध्ये एजेन्ट एकत्र देखील काम करतात. त्यामुळे इतर देशांच्या भूमिवर काही कटकारस्थान रचला जात असेल तर त्याची माहिती अगोदर मिळवण्यासाठी ही संघटना प्रयत्न करते.

निज्जर याच्या हत्येप्रकरणात अमेरिकेने म्हटलं की, 'आरोप गंभीर आहेत. त्यामुळे भारताने तपासामध्ये कॅनडला सर्वोतपरी मदत करावी. तपासामध्ये पारदर्शकता हवी आहे, जेणेकरुन नेमकं काय झालंय यामागील सत्य समोर येईल.' दुसरीकडे ऑस्ट्रेलियाने याप्रकरणात मौन बाळगणे पसंत केले आहे. (Latest Global News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

India Israel FTA : भारत-इस्राईल मैत्रीचे नवे पर्व सुरू, महाराष्ट्राला महासंधी; ऐतिहासिक मुक्त व्यापार कराराच्या अटी-शर्तींवर स्वाक्षरी

Parli Vaijnath News : सलग दुसऱ्या वेळा राष्ट्रीय पॅरा जलतरण स्पर्धेत आभा मुंडेंने केली पाच सुवर्णपदकांची कमाई

Pune News : मुंढवा जमीन गैरव्यवहार प्रकरणात शीतल तेजवाणीची सहा तास कसून चौकशी

Pune Crime : वडीलांना केलेल्या मारहाणीचा जाब विचारण्यासाठी गेलेल्या मुलास दगडाने मारहाण; दोघांविरोधात गुन्हा दाखल!

Latest Marathi News Update LIVE : सबरीमाला प्रकरण: एसआयटीने माजी टीडीबी अध्यक्ष पद्मकुमार यांना केली अटक

SCROLL FOR NEXT