Kabul Airport blast 
ग्लोबल

काबूल विमानतळ परिसरात तीन स्फोट; 70 जणांचा मृत्यू

अमेरिकेच्या संरक्षण मंत्रालयाची माहिती

Amit Ujagare (अमित उजागरे)

काबूल : अफगाणिस्तानमध्ये तालिबाननं कब्जा केल्यानंतर तिथली परिस्थिती अधिकच बिघडत चालली आहे. राजधानी काबूलच्या आंतरराष्ट्रीय विमानतळाबाहेर गुरुवारी संध्याकाळी अनेक स्फोट घडवून आणल्याचे वृत्त आहे. अमेरिकेच्या संरक्षण सचिवांच्या हवाल्यानं एएनआयनं याबाबत वृत्त दिलं आहे. या स्फोटांमध्ये सुमारे 70 जणांचा मृत्यू झाला असून यामध्ये लहान मुलांचाही समावेश आहे. 'इसिस' या दहशतवादी संघटनेनं या स्फोटांची जबाबदारी घेतली आहे.

काबूल विमानतळाच्या अॅबे गेटजवळ एक स्फोट झाला असून तर दुसरा स्फोट काबूलच्या एका हॉटेलजवळ झाला आहे. "काबूल विमानतळाबाहेर परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्याचे आमचे प्रयत्न सुरु असून या स्फोटांमुळं तिथल्या नागरिकांना बाहेर काढण्याच्या प्रक्रियेवर परिणाम होण्याची शक्यता आहे," असंही पँटॅगॉननं म्हटलं आहे.

काय घडलंय नक्की?

अमेरिकेच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं की, काबूल विमानतळाच्या एबी गेटच्या बाहेर एका आत्मघाती हल्लेखोरानं हा स्फोट घडवून आणला. हल्लेखोर फायरिंग करत आला आणि त्यानं स्वतःला बॉम्बनं उडवून दिलं. विमानतळाच्या या गेटवर ऑस्ट्रेलियाचे सैनिक तैनात असतात. या हल्ल्याच्या काही काळापूर्वीच इसिसच्या दहशतवाद्यांनी स्फोटाची धमकी दिली होती. या स्फोटाचा हेतू बाहेरच्या सैनिकांना निशाणा बनवणं हा होता. जे अफगाणी शरणार्थींना देशाबाहेर काढण्यासाठी मदत करत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CJP नेत्यांचा मोठा विजय! आंदोलनाला वेग; अखेर अभिजीत दिपके यांच्यासह तिघांची सुटका, आता सर्वोच्च न्यायालयात काय घडणार?

Navratri 2026 Wishes in Marathi: 'उदे ग अंबे उदे'... नवरात्रीनिमित्त व्हॉट्सॲपवर शेअर करा देवी दुर्गेच्या आशीर्वादाचे हे सुंदर शुभेच्छा संदेश

Maharashtra Live News :सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या मतदानाला सुरुवात...

IND vs WI 3rd T20: इंदूरमध्येही आज बॅट विरुद्ध बॅट? दुसऱ्या सामन्यात ५०१ धावांचा पाऊस, आता तिसऱ्या टी-२०मध्येही फलंदाजांचे वर्चस्व राहणार?

Madhya Pradesh: अकराशे विद्यार्थ्यांना मुख्यमंत्र्यांच्या हस्ते मोफत चष्मे वाटप; टीबी रुग्णांना ८ किलोची पोषण आहाराची टोपली

SCROLL FOR NEXT