Export of grain from Ukraine begins 
ग्लोबल

आणखी तीन जहाजे बंदराबाहेर

लेबनॉनला करणार धान्यपुरवठा, रशियाचे हल्ले सुरूच

सकाळ वृत्तसेवा

इस्तंबूल - युक्रेनमधून धान्याची निर्यात सुरु झाल्यानंतर आज आणखी तीन जहाजे एकूण ५८ हजार टन मका घेऊन तुर्कियेच्या दिशेने रवाना झाली. येथे या जहाजांची तपासणी होऊन नंतर ती लेबनॉनला पाठविली जाणार आहेत.

तुर्कियेच्या संरक्षण मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, युक्रेनहून निघालेल्या या तीन जहाजांनी काळा समुद्र पार केला असून उद्या (ता. ६) ती तुर्कियेला पोहोचतील. प्रचंड आर्थिक संकटात असलेल्या लेबनॉनला हा धान्यपुरवठा केला जाणार आहे. युक्रेन-रशिया यांच्यातील युद्धानंतर धान्याचे कोठार समजले जाणाऱ्या युक्रेनमधून धान्य निर्यात ठप्प झाली होती. तुर्किये आणि संयुक्त राष्ट्रांच्या मध्यस्थीने ही निर्यात आता पुन्हा सुरु झाली आहे.

दरम्यान, युक्रेनच्या दोनेत्स्क भागातील काही गावांवर रशियाने आज जोरदार बाँबहल्ले केले. या हल्ल्यांमध्ये किमान पाच जणांचा मृत्यू झाल्याचे सूत्रांनी सांगितले. दोनेत्स्कवर रशियाने ताबा मिळविला असला तरी काही गावांमधून अजूनही विरोध होत आहे.

हल्ल्यांमुळे किरणोत्सर्गाचा धोका

रशियाने मायकोलेव्ह आणि झॅपोरिझ्झिया या शहराजवळच्या अणु प्रकल्पांवर हल्ले केल्याने किरणोत्सर्गाचा धोका निर्माण झाला असल्याचा इशारा ब्रिटनच्या गुप्तचर संस्थेने दिला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kolhapur Voter List Revision : कोल्हापूर जिल्ह्यातील साडेचार लाख मतदार वगळणार; 'एसआयआर'चे 99.91 टक्के काम पूर्ण, पाहा विधानसभा मतदारसंघनिहाय चित्र

World Record Tiranga Rally: डोंबिवलीत तिरंग्याचा विश्वविक्रमी डौल, ३५ हजार चौरस फुटांच्या ध्वजासह भव्य रॅली

Palkhed Dam Tricolour Lighting: तिरंग्याच्या रंगात न्हाले धरणः स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून मनमोहक तिरंगी विद्युत रोषणाई

Marathi News Live Updates : भोर तालुक्यातील खड्ड्यांमध्ये भात लावून विद्यार्थ्यांनी वेधले प्रशासनाचे लक्ष

Kamalakar Chaskar Police Medal: चास गावच्या सुपूत्राला केंद्र सरकारच्या गृह मंत्रालयाकडून उल्लेखनीय कामगिरीबद्दल 15 ऑगस्ट रोजी अति उत्कृष्ट सेवा पदक जाहीर

SCROLL FOR NEXT