Google-FB 
ग्लोबल

फेसबूक, गुगलने घेतला महत्त्वाचा निर्णय; कर्मचाऱ्यांना देणार...!

वृत्तसंस्था

वॉशिंग्टन : कोरोना साथीचा रोगामुळे जगातील मृतांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. दरम्यान या परिस्थितीत उपाययोजना म्हणून जाहीर करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे जगभराची अर्थव्यवस्था विस्कळीत झाली आहे.

तसेच हा संसर्ग पसरू नये यासाठी अनेक मोठ्या कंपन्यांच्या कर्मचाऱ्यांना वर्क फ्रॉम होम देण्यात आले होते. अशा परिस्थितीमध्ये अमेरिकेतील फेसबूक आणि गूगल सारख्या 'टेक' कंपन्यांच्या कर्मचाऱ्यांना महामारीच्या सुरुवातीच्या काळातच घरून काम करण्यासाठी सांगितले होते.

मात्र सध्या लॉकडाऊन शिथिल करण्यात आला असून काही ठिकाणी ऑफिस पण सुरू झाले आहेत. तर फेसबूक आणि गूगल सारख्या कंपन्यांनी जुलैमध्ये ऑफिस सुरू करण्याचे ठरविले असून कर्मचाऱ्यांना या वर्षाच्या अखेरपर्यंत 'वर्क फ्रॉम होम' काम करण्याची सवलत देण्यात आली आहे. 

फेसबूकने सांगितले की त्यांचे कार्यालय ६ जुलै पासून सुरू होणार आहे, मात्र कर्मचारी डिसेंबरच्या अखेर पर्यंत घरून काम करू शकतील. तर गूगलने सुद्धा आपल्या कर्मचाऱ्यांसाठी वर्क फ्रॉम होमची १ जून पर्यंतची सुविधा आणखीन सात महिन्यांसाठी वाढविली आहे.

या संदर्भात फेसबूकचे प्रवक्ते म्हणाले, "ऑफिस पासून लांब राहणारे कर्मचारी डिसेंम्बरच्या शेवटपर्यंत घरी राहूनच काम करू शकतात. सध्या ही परिस्थिती सातत्याने बदलत असल्यामुळे हे कर्मचारी ऑफिसमध्ये येऊन काम करणे योग्य राहील की नाही या शंकेत आहेत. यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे."

दरम्यान भारतातील इन्फोसिस, एचसीएल सारख्या कंपन्यानीसुद्धा हा संकटाचा काळ संपल्यानंतर कर्मचाऱ्यांना वर्क फ्रॉम होमची सवलत दिली जाईल, असा निर्णय घेतला आहे. 

"कर्मचाऱ्यांना सध्या ऑफिस मध्ये येऊन काम करण्याची गरज नाही. जुलै पासून ते ऑफिस मध्ये येऊन काम करू शकतील. तसेच कर्मचाऱ्यांच्या सुरक्षिततेसाठी कंपनीच्या सर्व शाखांमध्ये विशेष काळजी घेतली जाणार आहे. तसेच ज्या कर्मचाऱ्यांना घरून काम करणे शक्य आहे त्यांनी वर्षाच्या अखेरपर्यंत घरूनच काम करावे." 
- सुंदर पिचाई, मुख्य कार्यकारी अधिकारी- गुगल 

कोरोनाशी संबंधित विदेशातील घडामोडींसाठी येथे ► क्लिक करा

फेसबूकने दिला कर्मचाऱ्यांना बोनस 
कोरोनाच्या सुरवातीच्या काळात कर्मचाऱ्यांना वर्क फ्रॉम होम करण्याचा आदेश देणाऱ्या काही ठराविक कंपन्यांमध्ये फेसबुकचाही समावेश आहे. इतकंच नाही तर फेसबुकद्वारे आपल्या कर्मचाऱ्यांना घरून काम करताना लागणाऱ्या सुविधांसाठी व त्यांच्या मुलांच्या देखभालीसाठी सुमारे ७५ हजार रुपये ( एक हजार डॉलर) बोनसच्या स्वरूपात देण्यात आले होते.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Finance Manager Murder Case : ६ लाखांच्या कर्जासाठी फायनान्स मॅनेजरची हत्या; प्रेमी युगुलाचा धक्कादायक कट

Parent Care: खानगावमध्ये मातृ-पितृ सेवेला सलाम; दशक्रिया विधीत विजय बोंबले दांपत्याचा ‘उत्कृष्ट मातृ पितृ सेवा पुरस्कार’ देऊन गौरव

Duleep Trophy Final : इशान किशनचे दहावे शतक! मोहम्मद सिराजसह सर्व गोलंदाजांना चोप दिला, ४०० पारच्या दिशेने वाटचाल Video

Marathi News Live Updates : पुणे-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात

नवरा असावा तर असा! 'स्वतः भांडी घासतात, किचनही साफ करतात'; पतीबद्दल बोलताना श्रेया घोषाल म्हणाली...'त्यांनी मला कधीच...'

SCROLL FOR NEXT