Facebook e sakal
ग्लोबल

फेसबुकची तालिबानवर बंदीची कारवाई; संबंधित अकाउंट्स होणार बॅन

विनायक होगाडे

नवी दिल्ली : तालिबान या संघटनेनं अफगाणिस्तान देशावर ताबा मिळवला आहे. सध्या संपूर्ण जगाचं लक्ष अफगाणिस्तानकडे आहे. तालिबान ही दहशतवादी संघटना अफगाणिस्तानातील एकेक शहरांचा पाडाव करत निघाली आणि सरतेशेवटी तिने राजधानी काबूलला आपल्या विळख्यात घेतलंय. त्यानंतर अफगाणिस्तानचे राष्ट्राध्यक्ष अश्रफ घनी यांनी पोबारा केला. तालिबानींनी राष्ट्रपती भवनावर देखील ताबा घेतल्याचं दिसून आलं. सध्या संपूर्ण देश तालिबान्यांच्या ताब्यात आहे. या पार्श्वभूमीवर आता जगातील सर्वांत मोठी सोशल मीडिया कंपनी फेसबुक कंपनीने मोठा निर्णय घेतला आहे.

फेसबुकने तालिबानच्या विरोधात मोठी कारवाई केली आहे. फेसबुकने म्हटलंय की, अमेरिकेच्या कायद्याअंतर्गत तालिबान एक दहशतवादी संघटना आहे. आणि आम्ही आमच्या Dangerous Organisation Policies अंतर्गत त्यांच्यावर बंदी घातली आहे. त्यामुळे तालिबानसाठी फेसबुकच्या सर्व सेवा बंद करण्याचा मोठा निर्णय घेण्यात आला आहे. याशिवाय तालिबानसंदर्भातील सगळे अकाउंट डिलीट केले जातील. तसेच तालिबानच्या समर्थनार्थ पोस्ट करणाऱ्या सर्व अकाउंट्सवर बंदी घातली जाईल. फेसबुकच्या प्रवक्त्यांनी म्हटलंय की, कंपनीकडे दरी आणि पश्तो भाषेतील तज्ज्ञ लोकांची संपूर्ण टीम आहे जी स्थानिक कंटेटवर लक्ष ठेवून आहे तसेच आम्हाला त्यासंदर्भात माहिती देत आहे.

फेसबुकने म्हटलंय की, गेल्या अनेक वर्षांपासून तालिबानचे अनेक नेते आणि प्रवक्ते फेसबुकवर आहेत, ज्यांच्या फॉलोवर्सची संख्या लाखोंच्या संख्येने आहे. फेसबुक, फेसबुक मॅसेंजर, इन्स्टाग्राम आणि व्हॉट्सऍपवरुन देखील तालिबानला बॅन करण्यात आलंय.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ड्रायव्हरच्या बाजूला मान खाली घालून बसलेले मनोज जरांगे; तब्येत अचानक बिघडली, डॉक्टरांच्या देखरेखीखाली उपचार सुरू, नेमकं काय झालं?

Devbhumi Jat Name Change Latest News : सांगलीकरांसाठी आनंदाची बातमी! 'देवभूमी जत' नामकरणाचा मार्ग मोकळा, गॅझेट नोटिफिकेशन लवकरच; पालकमंत्री चंद्रकांतदादांची माहिती

Chamoli Tunnel Tragedy: ३० तासांनंतरही ३ मजूर बेपत्ता; बोगद्यातील साचलेले पाणी ठरतेय रेस्क्यू ऑपरेशन्समध्ये मुख्य अडथळा

Marathi News Live Updates : पुण्यातील डेक्कन परिसरातील कॅफेत पहाटे कोयता गँगचा धुमाकूळ

Khambatki Ghat Traffic : पुणे-सातारा महामार्गावर खंबाटकी घाटात वाहनांच्या लांबच लांब रांगा; पारगाव-खंडाळा परिसरात वाहतूक ठप्प, प्रवाशांचे हाल

SCROLL FOR NEXT