Mark Zuckerberg Love story
Mark Zuckerberg Love story sakal
ग्लोबल

Facebook Founder : वॉशरुमच्या वेटींग लाईनवर रंगली होती मार्क जुकरबर्गची अनोखी Love Story

निकिता जंगले

Mark Zuckerberg Lovestory : आज फेसबूकचा स्थापना दिवस आहे. 4 फेब्रुवारी 2004 ला 'द फेसबुक' नावाने सोशल नेटवर्कींग साईटची सुरवात करण्यात आली होती. फेसबुकचे संस्थापक मार्क जुकरबर्ग यांनी फेसबूक ही सोशल नेटवर्कींग साईट आणून सोशल मीडियावर क्रांती घडवून आणली. त्यानंतर 26 सप्टेंबर 2006 ला भारतात फेसबूकची सुरवात झाली.

फेसबूकचे संस्थापक मार्क जुकरबर्ग याला कोण ओळखत नाही. अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वच त्याला ओळखतात. एक बिझिनेसमॅन म्हणून तुम्ही त्यााल ओळखत असला तरी जुकरबर्गच्या वैयक्तीक आयुष्याविषयी तुम्हाला माहिती आहे का? आज आपण त्याविषयी जाणून घेणार आहोत. चला तर जाणून घेऊया. (Facebook founder Mark Zuckerberg love story wife Priscilla Chan)

जुकरबर्गची अनोखी लव्हस्टोरी

मार्क जुकरबर्ग हा जगातील श्रीमंत व्यक्तींपैकी आहे. त्याच्याकडे सात लाख 20 हजार कोटीपेक्षा अधिक संपत्ती आहे. फेसबुक त्याने तेव्हा सुरू केले जेव्हा तो विश्व प्रसिद्ध हार्वर्ड यूनिवर्सिटीमध्ये शिकायचा. त्यादरम्यानच त्याला पहिल्यांदा प्रिस्किल्ला चान नावाची मुलगी भेटली जी आता त्याची पत्नी आहे.

ही गोष्ट आहे 2003 या वर्षीची. मार्क आणि प्रिस्किल्ला दोघेही एकाच पार्टीत आले होते. मात्र ते एकमेकांना ओळखायचे नाही. त्यांची पहिली भेट ही तेव्हा झाली जेव्हा दोघेही वॉशरूमच्या वेटींग लाइन वर उभे होते. हळू हळू दोघांमध्ये बातचीत सुरू झाली. त्यानंतर या दोघांनीही एकमेकांना कित्येक वर्ष डेट केले.

19 मे, 2012 रोजी मार्क जुकरबर्ग आणि प्रिस्किल्ला चान लग्नबंधनात अडकले पण तुम्हाला त्यांच्या लग्नाची एक अनोखी कहानी माहित आहे का? बिझिनेस इनसाइडरच्या एका रिपोर्टनुसार त्यांच्या लग्नात आलेल्या पाहूण्यांना हे सुद्धा माहित नव्हतं की मार्क आणि प्रिस्किल्ला लग्न करताहेत. पाहूण्यांना वाटले की प्रिस्किल्लाच्या ग्रॅजुएशन पार्टीमध्ये जायचं आहे.

मार्क जुकरबर्ग आणि प्रिस्किल्ला चान यांना दोन गोंडस मुली आहे. 2015 मध्ये प्रिस्किल्लाला पहिल्या मुलीला जन्म दिला. तिचं नाव मॅक्सिमा चान जुकरबर्ग आहे तर दुसऱ्या मुलीचा जन्म 2017 ला झाला. अगस्त चान जुकरबर्ग असं तिचं नाव आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024, KKR vs SRH: कोण गाठणार फायनल? कोलकता-हैदराबादमध्ये रंगणार ‘क्वॉलिफायर वन’चा थरार

Pune Porsche Car Accident : ''जबाबदार लोकप्रतिनिधी म्हणून मी घटनास्थळावर पोहोचलो अन्...'', आमदार टिंगरेंनी अपघाताबद्दल आरोपावर स्पष्टच सांगितलं

Beed Bogus Voting : ''बोगस वोटिंग प्रकरणात कठोर कारवाई करा'' बीडच्या प्रकरणात शरद पवारांनी घातलं लक्ष

Nashik Crime News: आयुक्तालय हद्दीत आचारसंहिता भंगचे 7 गुन्हे! विविध पोलीस ठाण्यांमध्ये अदखलपात्र गुन्हे दाखल

Julian Assange : 'विकीलिक्स'चे संस्थापक असांज यांना लंडनमधील कोर्टाचा मोठा दिलासा! प्रत्यार्पणाला देता येणार आव्हान

SCROLL FOR NEXT