Facts About Halloween esakal
ग्लोबल

Facts About Halloween : भितीदायक सण हॅलोवीन कसा सुरू झाला माहितीये? जाणून घ्या

हॅलोवीन हा सण परदेशातच साजरा होतो. पण याची सुरूवात आयरलँड अँड स्कॉटलँडला झाली. जाणून घेऊया

सकाळ डिजिटल टीम

Facts About Halloween : हॅलोवीन म्हणताच आपल्या डोक्यात वेगवेगळे भितीदायक विचार येतात. हा ख्रिश्चन लोकांचा सण असून दरवर्षी ऑक्टोबर महिन्याच्या शेवटच्या रविवारी साजरा केला जातो.

हॅलोवीनचा इतिहास

इतिहासानुसार दोन हजार वर्षांच्या पूर्वीपासून ऑल सेट्स डे म्हणून संपूर्ण उत्तर यूरोपात साजरा केला जातो. या दिवसाविषयी मान्यता आहे की, मेलेले लोकांच्या आत्मा उठतात आणि पृथ्वीवर जिवंत लोकांसाठी अडचणी निर्माण करतात. या वाईट आत्म्यांविषयीची भिता घालवण्यासाठी लोक राक्षसासारखे कपडे घालतात. तसंच जागोजागे शेकोटी लावून त्यात मेलेल्या जनावरांची हाडं फेकली जातात.

Halloween

सेल्टिक कॅलेंडरचा शेवटचा दिवस

हॅलोवीनला आल हेलोस ईव्ह, आल हेलोस इव्हिनिंग, आलहॅलोविन आणि आल सँट्स ईव्ह, आल सेंट्स डे अशी नावं आहेत. हा दिवस सेल्टिक कॅलेंडरचा शेवटचा दिवस असतो. आल सेंट्स डे १ नोव्हेंबरला साजरा होतो. आल सेंट्स डे च्या एक दिवस आधी आल हेलोस ईव्ह ची संध्याकाळ असते. ज्याला आता हॅलोवीन ईव्ह म्हणून ओळखलं जातं.

Halloween

या उत्सवात मूर्ती पूजा केली जात होती. पण काही पॉप्सने याला इतर ख्रिश्चन धर्मियांशी जोडण्याचा प्रयत्न केल्याने आल सेंट्स डे आणि हॅलेवीन हे एकाच दिवशी साजरा केला जातो.

कसा साजरा करतात

हा सण साजरा करण्याची पध्दत फारच वेगळी आहे. यात लोक भितीदायक वेश परिधान करतात आणि घरोघरी जाऊन चॉकलेट, कँडी भेट देतात. या दिवशी मुलं लाल भोपळ्याच्या आकाराची बॅग घेऊन घरोघरी जातात. पोकळ लाल भोपळ्याच्या आवरणाला बाहेरून डोळे, नाक, तोंड काढून त्यात मेणबत्ती लावतात. तेही भितीदायक पध्दतीने. नंतर नक्षिदार भोपळ्याला पूरलं जातं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dog Bite : पिसाळलेल्या कुत्र्याचा धुमाकूळ; आळे परिसरातील बारा जणांचा घेतला चावा; नऊ जण गंभीर

Italian Style Aloo Paratha: आलू पराठ्याला द्या 'हा' इटालियन ट्विस्ट! चव अशी की रोज हाच पराठा मागाल

आजचे राशिभविष्य - 12 सप्टेंबर 2026

Bidkin News : रस्त्याच्या कामावरून वाद; लोखंडी रॉडने मारहाण करणारे तिघे अहिल्यानगर हद्दीजवळून ताब्यात...

Pune News : राज्यातील ऑनलाइन कामकाज ठप्प; कृषी कर्मचाऱ्यांनी लॅपटॉप जमा केले, आंदोलन तीव्र

SCROLL FOR NEXT