Falling in mineral oil prices 
ग्लोबल

खनिज तेलाच्या भावात घसरण 

यूएनआय

सिंगापूर (यूएनआय) : जागतिक अर्थव्यवस्थेची वाढ मंदावण्याची शक्‍यता निर्माण झाल्याने खनिज तेलाच्या भावात सोमवारी घसरण झाली. खनिज तेलाचा भाव आज प्रतिबॅरल 71.60 डॉलरवर आला. इराणवरील अमेरिकेच्या निर्बंधांमुळे आगामी काळात तेलाचे भाव भडकण्याचा अंदाज विश्‍लेषकांनी व्यक्त केला आहे. 

चीनमधील औद्योगिक उत्पन्नाचे आकडे निराशाजनक असून, तुर्कस्तानमुळे कमोडिटीजच्या भावांना फटका बसला आहे. विकसनशील अर्थव्यवस्थांबाबत चिंताजनक वातावरण निर्माण झाले आहे. त्यांच्या वाढीचा वेग कमी झाला आहे. यामुळे जागतिक अर्थव्यवस्थेची वाढ मंदावण्याची चिन्हे आहेत. या परिस्थितीत खनिज तेलाला मागणी कमी राहण्याची शक्‍यता आहे. त्यामुळे तेलाच्या भावात आज घसरण झाली. 

पुरवठा कमी झाल्यास भडका 
तेलाच्या भावात घसरण सुरू असली तरी आगामी काळात ते वाढण्याची शक्‍यता विश्‍लेषक व्यक्त करीत आहेत. अमेरिकेने निर्बंध लादल्याने इराणकडून होणारा तेलपुरवठा नोव्हेंबरपासून कमी होईल. इराणचे तेल उत्पादन जुलैमध्ये दररोज 36.5 लाख बॅरल होते. तेल निर्यातदार देशांमध्ये आघाडीच्या देशांमध्ये सौदी अरेबिया आणि इराकनंतर इराणचा तिसरा क्रमांक आहे. यामुळे इराणकडून तेलपुरवठा कमी झाल्यास जागतिक पातळीवर तेलाचे भाव भडकू शकतात. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Madhuri Elephant Nandani : अखेर माधुरी हत्तीण दोन दिवसात कोल्हापुरात येणार! वनतारातून नांदणीकडे प्रस्थान; राजू शेट्टीनी सोशल मीडियावर दिली माहिती

India T20I Squad : हर्षित राणाला नवी दुखापत, अफगाणिस्तान मालिका अन् Asian Games ला मुकणार! विदर्भाच्या खेळाडूला टीम इंडियात संधी

मुंबई गोवा हायवेच्या उद्घाटनाला येणार नाही, लाज वाटते; गडकरींचे विधान, म्हणाले, आता वेगळा वर्ल्ड रेकॉर्ड करायचाय

Maratha Reservation: मनाेज जरांगेंना ज्योती मेटेंचा थेट सवाल; ‘१२ मागण्या मान्य झाल्या, मग मुंबईला जाण्याचा हट्ट कशासाठी?’

Marathi News Live Updates : जरांगेंच्या समर्थनार्थ मराठा तरुणांचा आक्रमक एल्गार, पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलन

SCROLL FOR NEXT