taliban
taliban  ft
ग्लोबल

अफगाणिस्तानात 24 तासांत 40 मृत्यू; भारताला मदतीची हाक

कार्तिक पुजारी

अफगाणिस्तानमधील (Afghanistan) परिस्थिती दिवसेंदिवस स्फोटक बनत आहे. त्यातच अफगाणिस्तानने भारताला मदतीचे आवाहन केले आहे.

काबूल- अफगाणिस्तानमधील (Afghanistan) परिस्थिती दिवसेंदिवस स्फोटक बनत आहे. त्यातच अफगाणिस्तानने भारताला मदतीचे आवाहन केले आहे. मंगळवारी अफगाणिस्तानचे परराष्ट्रमंत्री मोहम्मद हनीफ अतमार (Foreign Minister Mohammed Haneef Atmar) यांनी भारतीय समकक्ष एस जयशंकर (S Jaishankar) यांच्याशी फोनवर चर्चा केली. यावेळी त्यांनी युद्धग्रस्त अफगाणिस्तानमध्ये तालिबान आणि परदेशी दहशतवादी संघटनांच्या हल्ल्यांमुळे परिस्थिती बिघडत चालली असल्याचं सांगितलं. ही परिस्थिती सुधारण्यासाठी संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेची ( UNSC) इमरजेन्सी मिटिंग बोलवण्याचे आवाहन त्यांनी केले आहे. एएनआयने यासंदर्भातील वृत्त दिलं आहे. (international latest marathi news)

अफगाणिस्तानमध्ये हिंसेचा स्फोट

अफगाण परराष्ट्र मंत्रालयाकडून जारी करण्यात आलेल्या निवेदनानुसार, अमतार यांनी परदेशी शक्ती आणि दहशतवादी संघटनांच्या मदतीने तालिबान करत असलेल्या हल्ल्यांना आंतरराष्ट्रीय कायद्याचे उल्लंघन असल्याचं म्हटलंय आणि क्षेत्रीय सुरक्षा आणि स्थिरतेवर हे परिणाम करणारे असल्याचं म्हटलंय. अतमार यांनी जयशंकर यांच्यासोबत तालिबान आणि दहशतवादी संघटनांकडून वाढत जाणारी हिंसा आणि मानवाधिकारांचे उल्लंघन याबाबत चर्चा केली. त्यांनी प्रस्ताव दिलाय की, अफगाणिस्तानमध्ये हिंसा संपवून तत्काळ शांती प्रस्थापित करण्याकडे लक्ष द्यावं. यासाठी सुरक्षा परिषदचे बैठक आयोजित केली जावी.

तालिबानची शक्ती वाढतेय

भारत ऑगस्ट महिन्यात सुरक्षा परिषदची अध्यक्षता करणार आहे. अफगाण परराष्ट्र मंत्रालयाने म्हटलं की, जयशंकर यांनी अफगाणिस्तानमध्ये वाढत असलेल्या हिंसा आणि मानवाधिकारांच्या उल्लंघनाच्या वाढत्या घटना याबाबत चिंता व्यक्त केली आहे. त्यांनी देशात शांतता प्रस्थापित करण्यासाठी पाऊलं उचलण्याचे आवाहन केले आहे.

अफगाणिस्तानमध्ये हिंसेचा नंगानाच सुरु केला आहे. तालिबान अफगान सैन्यासह नागरिकांच्याही कत्तली करत सुटला आहे. माहितीनुसार, गेल्या २४ तासांच अफगाणिस्तानमध्ये ४० नागरिकांच्या हत्या झाल्या आहेत. अमेरिकी सरकारने सैन्य वापसीची घोषणा केल्यापासून तालिबान अफगाणिस्तानच्या मोठ्या भूभागावर ताबा मिळवला आहे. सर्व क्षेत्रांमध्ये तालिबानचा हस्तक्षेप वाढला आहे. मंगळवारी रात्री तालिबानने अफगाणिस्तानचे कार्यवाहक रक्षामंत्र्यांच्या घरासमोर हल्ला केला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पुन्हा ना'पाक' कृत्य! जम्मू-काश्मीरमध्ये हवाई दलाच्या ताफ्यावर दहशतवाद्यांचा हल्ला

IPL 2024 RCB vs GT Live Score: शुभमन गिलही स्वस्तात बाद! गुजरातच्या दोन्ही सलामीवीरांना सिराजने धाडले माघारी

Congress : ''चार जूननंतर काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! एक काँग्रेस राहुल गांधींची तर दुसरी...'' प्रमोद कृष्णम् यांचा दावा

MPSC : मुख्य परीक्षा होऊन चार महिने झाले तरी निकाल लागेना; गट क संवर्गातील ७ हजार ५१० उमेदवारांचे भवितव्य टांगणीला

Viral Video: 'माझ्या आयुष्यातून निघून जा'; मेट्रोमध्येच भिडलं जोडपं, एकमेकांना मारल्या चापटा

SCROLL FOR NEXT