Donald Trump VS Joe Biden esakal
ग्लोबल

Donald Trump VS Joe Biden: डोनाल्ड ट्रम्प अन् ज्यो बायडेन यांच्यात लढत! अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष कोण होणार?

दोन्ही नेत्यांच्या नावांची अधिकृत घोषणा येत्या काही महिन्यांत होणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.

सकाळ डिजिटल टीम

वॉशिंग्टन : अमेरिकेत नोव्हेंबर महिन्यात होणाऱ्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठीचे चित्र पुरेसे स्पष्ट झाले असून २०२० प्रमाणेच यावेळीही डोनाल्ड ट्रम्प आणि ज्यो बायडेन यांच्यातच लढत पाहायला मिळणार आहे. उमेदवार निवडीसाठी पक्षांतर्गत घेतल्या जाणाऱ्या प्रायमरीज्‌च्या निवडणुकीत रिपब्लिकन पक्षाकडून ट्रम्प यांना, तर डेमोक्रॅटिक पक्षाकडून बायडेन यांना पक्ष सदस्यांचा आवश्यक तेवढा पाठिंबा मिळाला आहे. दोन्ही नेत्यांच्या नावांची अधिकृत घोषणा येत्या काही महिन्यांत होणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.

रिपब्लिकन पक्षातील निवडणुकीत निकी हॅले यांनी माघार घेतल्याने डोनाल्ड ट्रम्प यांचा उमेदवारी मिळविण्याचा मार्ग अधिकच सुकर झाला होता. सत्त्याहत्तर वर्षांचे ट्रम्प हे सुरुवातीपासूनच उमेदवारी मिळविण्याच्या स्पर्धेत आघाडीवर होते. उमेदवारी निश्‍चित करण्यासाठी आवश्‍यक असलेल्या १,२१५ डेलिगेट्‌सचा पाठिंबा त्यांना आज मिळाला. आता जुलै महिन्यात रिपब्लिकन पक्षाच्या होणाऱ्या अधिवेशनात ट्रम्प यांची अधिकृत उमेदवार म्हणून घोषणा केली जाणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. दुसरीकडे, विद्यमान अध्यक्ष बायडेन यांना त्यांच्या पक्षातून आव्हानच नव्हते. आज त्यांनी चार राज्यांतील पक्षांतर्गत निवडणुकीत विजय मिळवत आवश्‍यक असलेल्या १,९६८ डेलिगेट्‌सचा पाठिंबा प्राप्त केला. ऑगस्ट महिन्यात डेमोक्रॅटिक पक्षाचे अधिवेशन होणार असून त्यावेळी उमेदवार म्हणून ८१ वर्षांच्या बायडेन यांच्या नावाची घोषणा केली जाईल. सलग दुसऱ्या निवडणुकीत त्याच उमेदवारांमध्ये लढत होण्याची अमेरिकेच्या इतिहासातील १९५६ नंतरची पहिलीच घटना असेल.

ट्रम्प यांची ‘हॅट्‌ट्रिक’

प्रसिद्ध उद्योगपती असलेले डोनाल्ड ट्रम्प हे रिपब्लिकन पक्षाकडून उमेदवारी मिळविण्यात सलग तिसऱ्यांदा यशस्वी ठरले आहेत. २०१६ मध्ये त्यांनी सर्वप्रथम निवडणूक लढविताना डेमोक्रॅटिक पक्षाच्या उमेदवार हिलरी क्लिंटन यांचा पराभव केला होता. २०१६ ते २०२० या काळात देशाच्या अध्यक्षपदाची धुरा त्यांनी सांभाळली होती. या काळात घेतलेल्या विविध निर्णयांमुळे त्यांची कारकीर्द अमेरिकेतच नव्हे, तर जगभरात गाजली. २०२० मध्येही पक्षातर्फे पुन्हा उमेदवारी मिळाली असली तरी बराक ओबामा यांच्या काळात आठ वर्षे उपाध्यक्षपद सांभाळलेल्या ज्यो बायडेन यांनी त्यांचा पराभव करत अध्यक्षपद मिळविले होते.

विद्यमान अध्यक्षांचा पराभव होण्याची ती पहिलीच घटना होती. या निवडणुकीवेळी झालेल्या हिंसाचाराच्या आरोपामुळे आणि इतर अनेक आरोपांमुळे ट्रम्प मागील चार वर्षेही चर्चेतच होते. आता त्यांना पुन्हा एकदा उमेदवारी निश्‍चित झाली असून त्यांचा सामना विद्यमान अध्यक्षांबरोबर आहे. यावेळी मात्र लैंगिक अत्याचार, फसवणूक यांसह एकूण ९१ आरोपांचे ओझे खांद्यावर घेऊन त्यांना निवडणूक लढवावी लागणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bride shot at wedding ceremony Video : विवाहमंडपात थरार! नववधूवर माथेफिरू प्रियकरानं सर्वांसमोरच झाडली गोळी

Udgir Gutkha Seized : पाठलाग करून साडेदहा लाखांचा गुटखा पकडला; एक चारचाकी तर एक आरोपी ताब्यात

SL vs NZ, T20 WC: न्यूझीलंडची उपांत्य फेरीच्या दिशेने वाटचाल! श्रीलंकेचे आव्हान संपुष्टात, जाता जाता पाकिस्तानची लावली वाट

Yermala News : कलाकेंद्र चालकाचा नियमांचा भंग; महाकाली कला केंद्राबाबत जिल्हाधिकारी यांचा मोठा निर्णय

Mumbai: चालत्या ट्रेनमधून केसांना धरत तरुणीला बाहेर ओढलं नंतर...; महिलेचं धक्कादायक कृत्य, मुंबई लोकलमधील राड्याचा व्हिडिओ समोर

SCROLL FOR NEXT